नोकरीची संधी! महापालिकेत ७०८ पदांसाठी भरती प्रक्रिया, अद्याप २४ हजार अर्ज प्राप्त! – Thane mahanagar Palika Exam Updates

Thane mahanagar Palika Exam Updates – ठाणे महापालिकेत चालक, इंजिनीयर आणि फायरमन या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. ७०८ पदांसाठी तब्बल २४ हजार बेरोजगारांचे अर्ज आले असून येत्या १ आणि २ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान ठाणे पालिकेच्या नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष आता परीक्षेकडे लागले आहे. ठाणे महापालिकेने १० ऑगस्ट २०२५ मध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र फायरमन पदांच्या आरक्षणामध्ये शासनाच्या निर्णयानुसार आवश्यक तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेने आता नवे पत्रक काढून फायरमन पदांच्या आरक्षणात सुधारणा कैली आहे. शासनाच्या ५ फेब्रुवारी २००८च्या निर्णयानुसार किमान तीन वर्षे सेवा केलेल्या होमगार्ड जवानांसाठी फायरमन संवर्गात पाच टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार फायरमनच्या एकूण ३८१ पदांपैकी १९ पदे होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

Thane mahanagar Palika Exam Updates

भरतीमध्ये फायरमन अर्थात अग्निशामक पदाच्या ३८१ जागा असून, चालक-यंत्रचालकाची २०७ पदे आहेत. सहाय्यक फायरमनच्या १३ जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ठ अभियंता (नागरी) पदासाठी २४, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदासाठी १६ आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी ४ जागा उपलब्ध आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता किंवा स्थळ पर्यवेक्षक पदाच्या ६३ जागांसाठीही भरती केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी २४ हजार अर्ज प्राप्त झाल्याने स्पर्धा मोठी असणार आहे. १ आणि २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेत उमेदवारांच्या तयारीची कसोटी लागणार असून, ठाणे महापालिकेतील या भरतीतून नोकरी मिळवण्यासाठी हजारो तरुण आता परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. अत्यावश्यक सेवांमधील अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील पदांचीच भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या इतर संवर्गातील पदांची भरती स्वतंत्रपणे केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ७०८ पदांसाठी सुमारे २४ हजार अर्ज आल्याने प्रत्येक पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेनंतर एमपीएससीच्या धर्तीवर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.

Admit Card Download Link 

गावदेवी अग्नितांडवानंतर जाग
गावदेवी मंडई येथील आगीच्या दुर्घटनेनंतर पालिकेच्या अग्निशमन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेत अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यासह एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. दरम्यान गावदेवी अग्नितांडवानंतर अग्निशमन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड