पालघर जिल्ह्यातील शुध्दीपत्रक तलाठी पदभरती 2023 व सुधारित निवड यादी व सुधारित प्रत- Talathi Document Verification List
Talathi Document Verification List
Palghar Talathi Document Verification Date 2024
महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरती २०२३ निवड यादी मधील उमेदवार यांची कागदपत्रे छाननी (DOCUMENT VERIFICATION) वेळापत्रक मा. राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे नियंत्रणाखाली TCS या कंपनी मार्फत ऑनलाईन पध्दतीने तलाठी पदाकरीता दि.१७.०८.२०२३ ते १०.०९.२०२३ या कालावधीत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आलेली आहे.तसेच तलाठी भरतीला लागणारी कागदपत्रे यादी येथे डाउनलोड करा. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पालघर जिल्हाधिकारी आस्थापनेवरील तलाठी पदभरती २०२३ परिक्षेतील परिक्षार्थीची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी (सामान्यीकृत गुण) Normalization Score दि.११.०३.२०२४ रोजी मा. प्रभारी राज्य परीक्षा राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली
आहे. मा. प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन प्राप्त गुणांच्या माहितीच्या आधारे प्रवर्गनिहाय उमेदवारांची समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड यादी व प्रतिक्षा यादी https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर तसेच पालघर जिल्हयाचे www.palghar.nic.in या संकेतस्थळावर दि.१४.०३.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर यादीत अल्पशः बदल करुन सुधारित यादी दि.०३.०७.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
सुधारित निवड व सुधारित प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांची टीसीएस कंपनीमार्फत बायोमॅट्रीक तपासणी तसेच मुळ कागदपत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पडताळणी करावयाची असून खाली नमूद दिनांकास व वेळी संबंधित यादीमधील उमेदवांरानी त्याचे मुळ कागदपत्रे तसेच संबंधित छायांकित प्रतीच्या (दोन) संच घेऊन उपस्थित राहावे. सदर दिवशी व वेळी संबंधित उमेदवांर उपस्थित न राहिल्यास त्यांना शासन सेवेत इच्छूक नसल्याचे ग्राहय धरुन त्यांच्या पुढील उमेदवांरास संधी देण्यात येईल यांची नोंद घ्यावी. कागदपत्र छाननीची यादी सोबत जोडली आहे. संबंधित उमेदवारानी आपली कागदपत्र घेऊन दि.१०.०७.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे उपस्थित राहावे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सुधारित निवड मध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र छाननी (DOCUMENT VERIFICATION) करण्यापूर्वी खालील प्रमाणे बाबी अधोरेखीत करण्यात येत आहे.
१. निवड यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांना गुणानुक्रमे कागदपत्रांसह बोलविण्यात आलेले आहे यांचा अर्थ आपणास नियुक्ती दिली असे समजण्यात येऊन नये.
२. निवड यादी ही उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये भरलेल्या माहिती आधारे तयार करण्यात आलेली असून तपासणीचे दिनांकास ऑनलाईन भरण्यात आलेली माहिती चुकीची तफावत आढळल्यास असत्य/कोणतेही कारण नदेता संबंधीत उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
३. समान गुण असणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि.०४.०५.२०२२ मधील तरतूदी व निकषानुसार निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
४. अंशकालीन उमेदवार यांचे अंशकालीन प्रमाणपत्र संबंधीत तहसीलदार व जिल्हा सेवायोजना कार्यालयाकडून पडताळणी करुन प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल.
५. प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त, दिव्यांग व अनाथ या समांतर आरक्षणामधून निवड झालेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाकडून पडताळणी झाले नंतरच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.
६. विहीत दिनांकास व वेळेत उपस्थित न राहिल्यास आपणास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन त्या प्रवर्गातील प्रतिक्षा यादीतील उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
तलाठी पदभरती २०२३
सुधारित निवड व सुधारित प्रतिक्षा मध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्रे छाननी ((DOCUMENT VERIFICATION) साठी घेऊन यावयाचे कागदपत्रांची यादी.
१) संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाची मुळ प्रत (PRINT OUT)
२) छायाचित्र असलेले मुळ ओळखपत्र पुरावा (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र
इ. पैकी कोणतेही एक) प्रत
३) भारतीय नागरीक असल्याबाबतचे प्रमाणपत्राची (NATINALITY) मुळ प्रत. ४) महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेले प्रमाणपत्राची (DOMICILE) मुळ प्रत.
५) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेबाबतचे गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्राची (DEGREE CERTIFICATE) मुळ प्रत (तलाठी जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.४५/२०२३ मधील अ.क्र.७ नुसार)
६) वयाचा पुरावा म्हणून जन्म नोंदीचा मुळ दाखला/शाळा सोडल्याचा मुळ दाखला/मुळ आधार कार्ड/मुळ पॅन कार्ड/इयत्ता १० वी. उत्तीर्ण मुळ प्रमाणपत्र/मुळ ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी पैकी कोणतेही एक (तलाठी जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.४५/२०२३ मधील अ.क्र. ८ नुसार)
७) मागासप्रवर्गातील उमेदवारांनी मुळ जात प्रमाणपत्र तसेच असल्यास मुळ जात वैधता (VALIDITY) प्रमाणपत्र (तलाठी जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.४५/२०२३ मधील अ.क्र.६.४ व ६.५ नुसार)
८) मागास प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अनुसूचित जाती/जमाती वगळुन जाहिरातीमध्ये नमुद अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांका पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉनक्रिमिलेयर) मुळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
९) महिला आरक्षणा अंतर्गत अर्ज केलेल्या महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमुद अर्ज स्विकारण्याच्या अंतीम दिनांक पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याने (नॉनक्रिमिलेयर) मुळ प्रमाणपत्र. (तलाठी जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.४५/२०२३ मधील अ.क्र. ४.४ नुसार)
१०) अशंकालीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडे केलेल्या नोंदणीचे प्रमाणपत्र व अंशकालीन कर्मचारी म्हणून कामकाज केले असल्याबाबतचे तहसीलदार यांचे मुळ प्रमाणपत्र. (तलाठी जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.४५/२०२३ मधील अ.क्र. ४.२२ )
प्रसिध्दीपत्रक तलाठी पदभरती कागदपत्रे पडताळीबाबत 2023. | प्रसिध्दीपत्रक तलाठी पदभरती कागदपत्रे पडताळीबाबत 2023. | 03/07/2024 | 31/07/2024 | पहा (1 MB) |
शुध्दीपत्रक तलाठी पदभरती 2023 व सुधारित निवड यादी व सुधारित प्रत. | शुध्दीपत्रक तलाठी पदभरती 2023 व सुधारित निवड यादी व सुधारित प्रत. | 03/07/2024 | 31/07/2024 | पहा (5 MB) |
Gadchiroli Talathi Document Verification Date 2024
गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची दिनांक १९ जून, २०२४ ते दिनांक २० जून, २०२४ या कालावधीमध्ये पडताळणी करण्यात येणार आहे. तरी निवड व प्रतिक्षा यादीमध्ये अंतर्भुत असलेल्या उमेदवारांनी समवेत जोडलेल्या वेळापत्रकानुसार, त्यांचे मुळ कागदपत्रे व कागदपत्रांच्या छायांकीत सांक्षाकीत प्रतीसह जिल्हा नियंत्रण कक्ष, पहिला मजला (जुने नियोजन भवन), जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थित राहावे. तसेच तलाठी भरतीला लागणारी कागदपत्रे यादी येथे डाउनलोड करा. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जाहीर सुचना तलाठी पद भरती २०२३ गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक १४ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवार यांचे मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक १९/०६/२०२४ ते २०/०६/२०२४ करीता हजर राहण्याबाबत.
विषयांकीत पदभरतीच्या अनुषंगाने संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची दिनांक १९ जून, २०२४ ते दिनांक २० जून, २०२४ या कालावधीमध्ये पडताळणी करण्यात येणार आहे. तरी निवड व प्रतिक्षा यादीमध्ये अंतर्भुत असलेल्या उमेदवारांनी समवेत जोडलेल्या वेळापत्रकानुसार, त्यांचे मुळ कागदपत्रे व कागदपत्रांच्या छायांकीत सांक्षाकीत प्रतीसह जिल्हा नियंत्रण कक्ष, पहिला मजला (जुने नियोजन भवन), जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थित राहावे.
सर्व उमेदवारांनी समवेत जोडलेल्या तपासणी सुचीमध्ये सर्व मुळ कागदपत्र सोबत आणावीत. विहित दिनांकास जे उमेदवार उपस्थित राहणार नाही अशा उमेदवारांचा पुढील भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. मूळ कागदपत्रे तपासणीकामी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवासभत्ता देय राहणार नाही. तसेच मूळ कागदपत्रे तपासणीस बोलविले म्हणजे अंतिम निवड झाली असा समज उमेदवारांनी करु नये. मूळ कागदपत्रांची तपासणी झालेनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कागदपत्रांची सुची
१. संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाची प्रत.
२. परीक्षेचे प्रवेश पत्राची प्रत.
३. भारतीय नागरिक असल्याबाबतचे प्रमाणपत्राची मुळ प्रत.
४. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्राची मुळ प्रत.
५. शाळा सोडल्याचा दाखला (मुळ/सत्यप्रत).
६. जन्म दाखला.
७. माध्यमिक शालांत परिक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्राची मुळ प्रत.
८. उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्राची मुळ प्रत.
९. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी प्राप्त असलेबाबत गुणपत्रक व प्रमाणपत्राची मुळ प्रत.
१०. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मुळ जात प्रमाणपत्र.
११. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मुळ जात वैधता प्रमाणपत्र.
१२. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मुळ नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र (अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे)
१३. संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याबाबतचे मुळ प्रमाणपत्र.
१४. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडु , दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा.
१५. नावात बदल असल्यास त्याचा पुरावा.
१६. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
१७. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (सोबतच्या विहीत नमुन्यात)
१८. उमेदवाराचे आधारकार्ड/पॅन कार्ड/निवडणूक ओळखपत्र / Driving Licence यापैकी एक.
जाहीर सुचना तलाठी पद भरती २०२३ गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक १४ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवार यांचे मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक १९/०६/२०२४ ते २०/०६/२०२४ करीता हजर राहण्याबाबत. | जाहीर सुचना तलाठी पद भरती २०२३ गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक १४ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवार यांचे मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक १९/०६/२०२४ ते २०/०६/२०२४ करीता हजर राहण्याबाबत. | 14/06/2024 | 20/06/2024 | पहा (1 MB) |
Yavatmal Talathi Document Verification Date 2024
जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचे आस्थापनेवरील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याकरीता तलाठी पदभरती-2023 चे अनुषंगाने प्रारुप निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रीक तपासणी व कागदपत्र पडताळणीकरीता आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 15 व 16 मे, 2024 रोजी बळीराजा चेतना भवन (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे उपस्थित राहण्याबाबतची सूचना जिल्हयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करुन तसेच तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सर्व उमेदवारांना कळविण्यात आले होते. तथापि उपरोक्त दिनांकास प्रारुप निवड यादीतील 14 व प्रारुप प्रतिक्षा यादीतील 21 असे एकूण 35 उमेदवार अनुपस्थित होते. अंतिम संधी म्हणून बायोमेट्रीक तपासणी व कागदपत्रांची पडताळणी दिनांक 28 में, 2024 रोजी सकाळी 10.00 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येत आहे.. तसेच तलाठी भरतीला लागणारी कागदपत्रे यादी येथे डाउनलोड करा. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी उपरोक्त दिनांकास अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना अंतिम संधी म्हणून बायोमेट्रीक तपासणी व कागदपत्रांची पडताळणी दिनांक 28 में, 2024 रोजी सकाळी 10.00 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येत आहे.
तरी उपरोक्त उमेदवारांनी दिनांक 28 मे, 2024 रोजी सकाळी 10.00 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे बायोमेट्रीक व कागदपत्र पडताळणीकरीता न चुकता उपस्थित राहावे.
दिनांक 28 मे, 2024 रोजी उपरोक्त उमेदवार अनुपस्थित असल्यास त्यांनतर त्यांची बायोमेट्रीक व कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही व त्यांची कोणतीही सबब ऐकून घेतल्या जांणार नाही व नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, याबाबत संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Talathi Recruitment Biometric and Document Verification |
Talathi Recruitment Biometric and Document Verification
|
25/05/2024 | 31/05/2024 | View (387 KB) |
Talathi Document Verification List
Talathi Document Verification List: Biometric and Documents Verification for Talathi Recruitment – 2023 on date 15th May 2024 is postponed till next date. Sorry for inconvenience.
तलाठी भरती – 2023 साठी 15 मे 2024 रोजी होणारी बायोमेट्रिक आणि दस्तऐवज पडताळणी पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच तलाठी भरतीला लागणारी कागदपत्रे यादी येथे डाउनलोड करा. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
Talathi Recruitment – 2023- Notice | Talathi Recruitment – 2023- Notice | 14/05/2024 | 14/11/2024 | View (478 KB) |
Talathi Document Verification Date
Talathi Document Verification List: The format selection list for Talathi Post Recruitment-2023 has been published. Candidates in the draft selection as well as waiting list are informed that, on date 6, 2024 Rosary at 10.30 am. The document verification of the candidates selected in the pass draft selection list will be conducted at Niyojan Bhawan, District Magistrate Office Complex, Chandrapur. Also on 7th May, 2024 Rosi at 10.30 am. Document verification of the candidates who are waitlisted in the Pasun draft selection list will also be conducted at Niyojan Bhawan, District Magistrate Office Complex, Chandrapur.
तलाठी पदभरती-2023 चे अनुषंगाने प्रारुप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रारुप निवड तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सुचित करण्यात येते की, दिनांक 6 में, 2024 रोजी सकाळी 10.30 वा. पासुन प्रारुप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तएवज तपासणी ही नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 7 मे, 2024 रोजी सकाळी 10.30 वा. पासुन प्रारुप निवड यादीमध्ये प्रतिक्षा सुचीत असलेल्या उमेदवारांचे दस्तएवज तपासणी सुद्धा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे. तसेच तलाठी भरतीला लागणारी कागदपत्रे यादी येथे डाउनलोड करा. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तलाठी पदभरती – २०२३ चे दस्तएवज तपासणी अनुषंगाने सुचना
वरीलप्रमाणे नोंद घेवून उमेदवारांचे दस्तएवज पडताळणीकरीता नमुद केलेल्या दिनांकास खालील दस्तएवजाचे स्वक्षाकीत प्रतीचे 2 संच (क्रमानुसार) घेवून प्रारुप निवड तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे.
1. अर्जातील नावाचा पुरावा (प्रवेशपत्र / ऑनलाईन अर्ज)
2. वयाचा पुरावा (जन्मतारखेचा पुरावा)
3. शैक्षणीक अर्हता (10/12/पदवी (इ. पुरावा)
4. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. (जातीचे प्रमाणपत्र)
5. जात वैधता प्रमाणपत्र
6. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (उन्नत/प्रगत गटात
मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र)
7. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सौनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अशंकालिन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा
8. अधिवास प्रमाणपत्र
9. नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
10. संगणक प्रमाणपत्र
11. आत्महत्याग्रस्त शेतक-याचे पाल्य असलेबाबतचे प्रमाणपत्र
12. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. (सोबतच्या विहीत नमुन्यात)
13. उमेदवाराचे आधारकार्ड / पॅन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / Driving Licence यापैकी एक
Download Chandrapur Talathi Document Verification Date
Talathi Document Verification Date
Talathi Document Verification List: The result of the much talked about Talathi recruitment for the reserved 13 districts of non-salaried posts has been declared a fortnight ago. Along with the selection list of 173 people in Nashik, a waiting list of 172 people has been announced. After the publication of this list, the document verification work of the candidates has been given time on Tuesday (26th). On the first day, the documents and biometrics of 76 candidates from the reserved posts i.e. backward classes were checked. Documents of 76 candidates of unreserved i.e. open category will be checked on Wednesday (27th). After that, a decision will be taken regarding the candidates in the waiting list.
बहुचर्चित तलाठी भरतीचा राखीव १३ जिल्ह्यांतील बिगर पेसा क्षेत्रातील पदांचा निकाल पंधरवड्यांपूर्वीच जाहीर झाला आहे. त्यात नाशिकमधील १७३ जणांची निवड यादी अन सोबतच १७२ जणांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या कामाला मंगळवारी (दि. २६) मुहूर्त लाभला आहे. पहिल्या दिवशी राखीव पदांवरील अर्थात मागासवर्गीय ७६ उमेदवारांची कागदपत्रे आणि बायोमेट्रिकची तपासणी करण्यात आली. बुधवारी (दि. २७) अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गातील ७६ उमेदवारांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यानंतर लागलीच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच तलाठी भरतीला लागणारी कागदपत्रे यादी येथे डाउनलोड करा. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची बायोमेट्रिकद्वारे तपासणी; आज खुल्या प्रवर्गाची पडताळणी
जाहिरात प्रसिद्धी आणि अर्ज स्वीकृतीपासूनच चर्चेत असलेल्या तलाठी भरतीची प्रक्रिया तब्बल वर्षभरापासून सुरूच आहे. परीक्षेतील गैरप्रकार, निकालातील गोंधळ या सर्वच बाबींमुळे शासनालाही या भरतीमुळे प्रचंड टीकेचे धनी व्हावे लागले. प्रथम पेसा क्षेत्रामुळे जिल्ह्याच्या निकालासह निवड यादीही राखून ठेवण्यात आली होती. परंतु, त्यानंतर बिगर पेसा क्षेत्रातील जागांवरील निकाल जाहीर करण्यासह यादीही जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील १७३ उमेदवारांची यादी आणि १७२ उमेदवारांची सोबतच प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. अद्यापही पेसा क्षेत्रातील १०१ पदांचा निकाल आणि निवड यादी राखून ठेवण्यात आली आहे. जाहीर झालेल्या १७३ पैकी राखीव प्रवर्गासाठी असलेल्या ७६ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आली. त्यामध्ये जन्मतारीख, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयरसह इतर आवश्यक सर्वच प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे अर्ज भरताना तसेच परीक्षेच्या वेळी घेण्यात आलेले बायमेट्रिक ठसे, डोळ्यांचे ठसे यांची यावेळी फेर पडताळणी करण्यात आली. परीक्षा दिलेला उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी आला आहे का, याची खात्री करून घेण्यात आली.
१०१ पेसाच्या जागांची प्रतीक्षा
पेसा क्षेत्र १०० टक्के, ७५ टक्के ५० व २५ टक्के असे प्रमाण आहे. त्यानुसार १०१ जागा राखीव आहेत. या जागांवर अर्ज भरतानाच उमेदवारांना पर्याय देण्यात आलेला होता. त्याचा निकाल अद्यापही राखीव ठेवण्यात आलेला आहे.
Talathi Document Verification List – Maharashtra Talathi Bharti Document Verification List is published. As you the Merit List, Waiting list are published by Mahsul Vibhag. Now the candidates are waiting for the Document verification Process. The Date of Document verification of various districts is mentioned below. We will keep adding all districts updates on this page.
तलाठी भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट जाहीर झाली असून खालील लिंक वरून आपण बघू शकता. लवकरच सर्व जिल्ह्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच वेळापत्रक तारखा जाहीर होतील. आम्ही या संदर्भातील सर्व अपडेट्स महाभरती वर प्रकाशित करू. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तलाठी पदभरती २०२३ पात्र निवड यादीतील उमेदवार यांचे Biometric Verification प्रसिध्दीपत्रक | तलाठी पदभरती २०२३ पात्र निवड यादीतील उमेदवार यांचे Biometric Verification प्रसिध्दीपत्रक | 13/02/2024 | 29/02/2024 | पहा (748 KB) |
तलाठी पदभरती २०२३ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्र छाननी प्रसिध्दीपत्रक | तलाठी पदभरती २०२३ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्र छाननी प्रसिध्दीपत्रक | 13/02/2024 | 29/02/2024 | पहा (7 MB) |
रत्नागिरी जिल्हा तलाठी भरती 2023 – तलाठी बायोमेट्रिक पडताळणी संबंधी माहिती
मुंबई उपनगर जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
वाशिम तलाठी पदभरती-२०२३ चे अनुषंगाने TCS चे अधिकारी यांचेमार्फत उमेदवारांचे पडताळणीबाबत.
नागपूर जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
जालना जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
वाशिम जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
बुलढाणा जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
सांगली जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
वर्धा जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
जालना जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
रायगड जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
कोल्हापूर जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
हिंगोली जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
तलाठी भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल उमेदवारानासाठी महत्वाच्या सूचना
(1) संकेतस्थळावर आनलाईन पध्दतीने भरलेल्या मुळ अर्जाची प्रिंट आऊट (आवेदनपत्र) तसेच परिक्षा फीस जमा केल्याचा पुरावा.
(2) आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या उमदेवारांनी शासन निर्णय महसूल व वन विभाग
क्र.एससीवाय 12/05/प्र.क्र. 189/म-7 दि. 23/01/2006 अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने ज्या कुंटुंबास शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असल्यास त्या बाबतचे कागदपत्रे.
(3) उक्त सर्व कागदपत्रांची पुर्ण पडताळणी तसेच जाहिरातीत नमूद सर्व निकषांची पुर्तता झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखुन ठेवले आहेत. (4) छायाचित्र ओळख पुरावा (ओळखपत्र / Photo Identity card) (आधारकार्ड/ वाहन परवाना/पॅनकार्ड/ राज्यनिवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र / राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक) नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज 02 फोटो..
(5) वरील सर्व उमेदवारांना याद्वारे कळविण्यात येते आहे की, सदर यादी या कार्यालयाचे जिल्हयाचे संकेतस्थळ www.hingoli.gov.in वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
(6) कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित न राहील्यास उमेदवारांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही आणि त्यानंतर त्या निवड यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी दावा करता येणार नाही.
(7) शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवारांनी चारीत्रय व पुर्व चारीत्र पडताळणी करण्याबाबत सोबतच्या विहीत साक्षांकन नमुन्यात माहिती कागदपत्रे तपासणीच्या वेळेस भरुन सादर करावी.
Talathi Bharti Document Verification Date
Talathi Bharti Document verification Date & schedule details are given below. Alldistricts links will be avilable soon. So keep visiting MahaBharti.in For more updates.
जिल्हाधिकारी, हिंगोली यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांची जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.45/2023 दि. 26.06.2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार TCS कंपनीमार्फत (Computer Based Test) परिक्षा घेण्यात आलेली होती. त्यानंतर प्र. राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. तलाठी भरती/कावी/16/2024 दि. 12.01.2024 नुसार मसुदा स्वरुपात निवड व प्रतिक्षा यादी उपलब्ध करुन देण्यात येवून तलाठी पदभरती संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / परिपत्रकानुसार पुढील कार्यवाही करणेसाठी सुचित करण्यात आले होते. उक्त निवड व प्रतिक्षा यादी मसुदा प्राप्त झाल्या नुसार जिल्हा निवड समितीची दिनांक 19.01.2024 रोजी बैठक घेवून निवड व प्रतिक्षा यादी दिनांक 23.01.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
कोल्हापूर जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
हिंगोली जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.