Mahavitaran Vidyut Sahayak Document Verification
MSEDCL ADVT.NO. 06/2023: ZONE WISE ALLOCATION AND DOCUMENT VERIFICATION OF CANDIDATES SELECTED ON WAIT LIST FOR THE POST OF VIDYUT SAHAYAK
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी नियमानुसार ५० टक्के मर्यादेत १ हजार ८४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी शुक्रवारी (दि. ३१) जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या परिमंडळ कार्यालयांमध्ये ६ व ७ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. महावितरणने ५ हजार ३८१ विद्युत सहाय्यक पदासाठी २० ते २२ मेदरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. त्यानंतर उमेदवारांची निवड यादी व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्ट व ९ व १० सप्टेंबरदरम्यान पाच दिवसांत करण्यात आली. दिव्यांग प्रवर्गाची निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दि. १० सप्टेंबरला दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी दिला आहे. त्यानुसार या प्रतीक्षा यादीमध्ये दिव्यांग प्रवर्ग वगळण्यात आला आहे. विद्युत सहाय्यक पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये येत्या ६ व ७ नोव्हेंबरला होणार आहे.

उमेदवारांनी परिमंडळनिहाय यादी, कागदपत्र तपासणीकरिता आणावयाची कागदपत्रांची यादी इ. विस्तृत माहितीकरीता कंपनीच्या संकेतस्थळाचे अवलोकन करावे. या प्रक्रियेनंतर गैरहजर उमेदवारांच्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी PDF लिंक
Important Documents For Mahavitaran Vidyut Sahayak Document Verification
उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रतींसहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :-
- i) सिस्टीम जनरेटेड अॅप्लीकेशन ऑनलाईन फॉर्म (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)
- ii) एस.एस.सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- iii) आय.टी.आय. प्रमाणपत्र (Electrician/Wireman)/सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी.
- iv) जात प्रमाणपत्र.
- v) जातीचे वैधता प्रमाणपत्र (वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जाती वैधताबाबतची सोबत जोडलेल्या यादीतील नमूद केलेले कागदपत्रे सादर करावी.)
- vi) समांतर आरक्षणाच्या पृष्ट्यर्थ सक्षम प्राधिकाऱ्याकडून विहित केलेले प्रमाणपत्र. उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
- vii) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- viii) सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला प्रवर्ग वगळून)
- ix) उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या तपशील / माहितीबाबतचे सर्व प्रमाणपत्रे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















