थोड्याच वेळात लिंक बंद होणार-MPSC तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज!- Talathi Bharti 2026

Maharashtra Talathi Bharti 2026– Revenue Department, Talathi Bharti 2026 Latest News Update recruitment advertisement for 1539 posts in 36 districts under various divisions of the state has been published on the MPSC website of the government Talathi Bharti. Online application forms will start through MPSC Portal. Last date to apply for this recruitment is 5th August 2026.

मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ द्वारे ‘ग्राम महसूल अधिकारी’ (तलाठी) आणि इतर विविध ५,७०७ पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आज (५ ऑगस्ट २०२६) रात्री ११:५९ वाजेपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न भरलेल्या इच्छुकांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळून त्वरित अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी हि महत्वाची बातमी आहे. तलाठी भरतीचा मुहूर्त निघाला असून राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती जाहिरात आता प्रकाशित झाली आहे. MPSC द्वारे ग्रुप C अंतर्गत नवीन पदे समाविष्ट करण्यात आली आहेत, त्यात संदर्भातील नवीन परिपत्रक आता MPSC द्वारे जाहीर केले आहे. यात “ग्राम महसूल अधिकारी” या १५३९ पदाच्या समावेश करण्यात आला आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे.  मित्रांनो महत्वाचे म्हणजे प्रथमच तलाठी भरतीची परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. मध्ये या संदर्भातील पूर्ण माहिती, PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे.  उमेदवारांच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI द्वारेच शुल्क भरावे लागणार आहे. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गासाठी वयोमर्यादा मोजण्याचा आधार अर्जाच्या अंतिम दिनांकानुसार म्हणजे १० ऑगस्ट २०२६ राहणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार भरती प्रक्रियेत नवीन संवर्गांचा समावेश करून एकूण ५७०७ पदांसाठी भरती होणार आहे.

 

 

MPSC Mudat Vadh Talathi Bharti

  • पदाचे नाव तलाठी (Mahsul Adhikari)
  • पद संख्या१५३९  जागा
  • शैक्षणिक पात्रता –पदवीधर  (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. ५४४/-  – राखीव वर्ग : ३४४/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (MPSC पोर्टल द्वारे)
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
  • शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०२६

Educational Qualification For Talathi Bharti 2026 

For the recruitment of total 1539 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state under Talathi Bharti 2026.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी  रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

 

तलाठी भरतीसाठी महत्वाचे मुद्दे: 

तलाठी पदासाठी किती पगार असतो ? (Salary For Talathi)

मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे तलाठी हे पद ‘गट-क’ मध्ये मोडते. २०२६ मध्ये तलाठी म्हणून रुजू होणाऱ्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक पगार मिळतो. तलाठ्याचे वेतन बँड साधारणपणे २५,५०० ते ८१,१०० या श्रेणीत मध्ये येतो. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीला हातात (In-hand salary) साधारणपणे ३५,००० ते ४०,००० रुपयांच्या दरम्यान पगार मिळतो. या वर्षी टाय काहींबद्दल असल्यास आम्ही लगेच अपडेट करू.

जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नाही, अशी कोणतीही तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्रताधारक सर्व उमेदवारांनी वेळ न दवडता mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज तात्काळ सबमिट करावा.

How to apply for Talathi Bharti 2026 : महाराष्ट्र तलाठी भरती २०२६ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
१. सुरुवातीला एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsconline.gov.in/candidate/login)भेट द्या. लिंक खाली सुद्धा दिलेली आहे.
२. तिथे उमेदवाराने स्वतःचे खाते (प्रॉफाईल) तयार करावे किंवा लॉगिन करावे.
३. त्यानंतर नवीन भरती प्रक्रियेतील पर्यायावर जाऊन ‘गट-क’ च्या जाहिरातीवर क्लिक करा.
४. तिथे उमेदवार पात्र असलेल्या सर्व पदांची यादी दिसेल.
५. तुम्ही ज्या पदांसाठी पात्र आहात, त्या सर्व पर्यायांसमोरील चौकटीत (चेक बॉक्स) क्लिक करा.
६. त्यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरून परीक्षेसाठी केंद्र निवडा.
७. शेवटी अर्जाचे शुल्क (फी) भरून अर्ज सादर (सबमिट) करा.
८. अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (प्रिंटआऊट) काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For mpsc.gov.in Group C Bharti  2026

📑 PDF जाहिरात  https://lnk.ua/DE2pZU65A
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ocFTc
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

🆕नवीन २०२६ मध्ये तलाठी भरती.. जाणुन घ्या या परिक्षेच्या तयारी संदर्भात? How To Prepare For Talathi Bharti Exam ?

👑तलाठी भरती MPSC (निगेटिव्ह मार्किंग)निकषानुसार प्रश्नसंच सोडवा

तलाठी भरती  2026 महत्वाच्या लिंक्स : 

Table of Contents

3 thoughts on “थोड्याच वेळात लिंक बंद होणार-MPSC तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज!- Talathi Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड