तलाठ्यांच्या बदल्या बद्दल नवीन अपडेट जाहीर, जिल्हाभर होणार
Talathi badli GR Maharashtra
उपविभागाच्या (दोन तालुक्यात) कार्यक्षेत्रातच होणाऱ्या तलाठ्यांच्या बदल्या आता संपूर्ण जिल्ह्यात कोठेही होणार आहेत. त्यासह महसूल विभागातील महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बुधवारी बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. जून अखेरपर्यंत प्रत्यक्ष बदल्या होतील, असेही सांगण्यात आले.
तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांना होते. हे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच तलाठ्यांचे कार्यक्षेत्रही संपूर्ण जिल्हा करण्यात आले आहे. यामुळे यापूर्वी एकाच उपविभागात बदली होणाऱ्या तलाठ्याचा आता जिल्ह्यात कुठेही बदली होणार आहे. यावर्षी सुमारे १३५ तलाठ्यांच्या बदल्या होणार आहेत.
महसूल विभागातील महसूल सहायक, अव्वल कारकून आणि मंडल अधिकारी अशा सुमारे १५० कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निकष पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून ही यादी बुधवारी (दि. २९) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबधितांकडून पर्याय मागवण्यात येणार आहेत. याकरिता दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच या प्रक्रियेला वेग येणार आहे. जून अखेरपर्यंत या सर्व बदल्या होतील, अशीही शक्यता आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.