Swami Samarth Prakat Din Wishes 2024 in Marathi

Swami Samarth Prakat Din Wishes 2024 in Marathi

Swami Samarth Prakat Din Wishes 2024 in Marathi – Swami samarth prakat din message in Marathi, Images For sharing on WhatsApp and social media are given for your reference. You can download the Images of messages & share freely on any Social media like Instagram, Facebook & WhatsApp. For more updates keep visiting us.

 

 | | श्री स्वामी समर्थ | | 

उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले.
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद
अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लागला ध्यास स्वामी नामाचा
नाम स्वामींचे मुखी वसले,
मी पण माझे संपून गेले,
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

 


भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे…
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!


निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !


उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा,
अशक्यही शक्य करतील स्वामी.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता. दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 23 मार्च 2023, गुरुवार रोजी प्रकट दिन आहे.  श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्‍याच भक्तांची श्रद्धा आहे. त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये उत्सव साजरा केला जातो.

Swami Samarth Pragat Din 2023

इसवी सन १८५६ मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला (शके १७७८) स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते. तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला. स्वामीसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर होते. माझं बाळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.

 

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात.  महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत अशीही भक्तांंची धारणा आहे.

 

श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले.

 

 

श्री स्वामी जयघोष

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्थांचे वरील जयघोष जसे प्रभावी आहेत. त्याच प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारक मंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Swami Samarth Prakat Din Wishes 2023 In Marathi, Whatsapp, Insta, Facebook

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड