Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यूपीएससी परीक्षेचे नवीन २०२४ वेळापत्रक जाहीर, लगेच डाउनलोड करा! – UPSC Annual Calendar 2024

UPSC Annual Calendar 2024

UPSC Annual Calendar 2024

द्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससीची) स्थापना १ ऑक्टोबर, १९२६ला नवी दिल्ली येथे झाली. १९३५च्या कायद्यानुसार आयोग ‘फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन’ या नावाने ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्यानंतर उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी भारतीय संविधानाच्या कलम ३१५ नुसार संपूर्ण देशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. हा आयोग मंत्रालयातील कर्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येतो. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आयोगाचे अध्यक्ष व १० सदस्यांची समिती असून, त्यांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. यातील काही सदस्य नागरी सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी, निवृत्त अधिकारी असतात. हा स्वायत्त आयोग आहे. शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते. यासाठी योग्य सक्षम, बुद्धिमान, प्रामाणिक, निर्णयक्षम, गतिमान, कुशल प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड आयोग करतो. त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतो. आयोगाद्वारे दरवर्षी देशातील वेगवेगळ्या सेवांच्या भरतीसाठी ७२ केंद्रांवरून परीक्षा घेतली जाते.

 

UPSC अंतर्गत येणाऱ्या परीक्षा आणि त्यांच्या तारखा
१) भारतीय अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा: १८ फेब्रु, २०२४
२) भू-वैज्ञानिक व भूगर्भशास्त्रज्ञ पूर्व परीक्षा: १८ फेब्रु. २०२४
३) सीआयएसएफ एसीई एलडीसीई परीक्षा १० मार्च २०२४
४) सी. डी. एस. (एक) २०२४ परीक्षा २१ एप्रिल २०२४
५) एनडीए अँड एनए (एक) परीक्षा २१ एप्रिल २०२४
६) केंदीय नागरी सेवा पूर्व परीक्षा : २६ मे २०२४
७) भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा : २६ मे २०२४
८) एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा : १४ जुलै २०२४
९) सी. ए. पी. एफ. परीक्षा : ४ ऑगस्ट २०२४
१०) सी. डी. एस. ।। परीक्षा : १ सप्टेंबर २०२४
११) एनडीए व एनए ॥ परीक्षा : १ सप्टेंबर २०२४
१२) केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षा : २० सप्टेंबर २०२४
१३) एनडीए व एनए ॥ परीक्षा १ सप्टेंबर २०२४
१४) भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४
१५) एस. ओ. / स्टेनो एलडीसीई ७ डिसेंबर २०२४

विद्यार्थी व पालक वर्गातील स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, मार्गदर्शन आणि संदर्भ साहित्याची स्थानिक पातळीवरील उपलब्धता, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याचा चढता आलेख या पार्श्वभूमीवर यूपीएससी करिअर एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे. पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षापासूनच सूत्रबद्ध, शिस्तबद्ध अभ्यास केल्यास यशस्वी होणे शक्य आहे.

 

UPSC Exam Annual Calendar 2024: The Union Public Service Commission has announced the dates for the 2024 exams. This calendar is available on upsc.gov.in. These examinations will start from UPSC Examination Engineering Service (Primary) Examination. Further details are as follows:-

यूपीएससी अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यूपीएससीने शैक्षणिक वर्ष २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करता येणार आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा २०२४ आणि आयएफएस परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. या परीक्षेचे वेळापत्रक हे यूपीएसीच्या अधिकृत वेबसाइटवर चेक करु शकता. मिळालेल्या माहितीनुसार हे यूपीएससीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज (Application) करण्याची शेवटची तारीख ही ५ मार्च आहे. सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ मध्ये असेल. यूपीएससीची नागरी सेवा, भारतीय वन सेवा आणि NDA, NA पर्यंतच्या सर्व प्रमुख परीक्षांची (Exam) संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 

UPSC Exam Timetable 2024 

 

UPSC Exam Schedule 2024

यूपीएससीची नागरी सेवा आणि भारतीय वन विभाग सेवांची पूर्व परीक्षा ही २६ मे २०२४ रोजी घेण्यात येईल. तर नागरी सेवा मुख्य परीक्षा २० सप्टेंबर २०२४ पासून आणि IFS मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड