ZP Shipai Mega Bharti Update – महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये शिपायांची भरती आणि २५ हजार रुपये पगार मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, DGIPR ने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. नेमकं सत्य काय? जाणून घ्या. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिपाई पदासाठी मोठी भरती सुरू असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. अशी कोणतीही राज्यव्यापी भरती जाहीर करण्यात आलेली नाही, असे महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. DGIPR ने या व्हायरल मेसेजचं फॅक्ट चेक केलं असून हा दावा खोटा असल्याचं सांगितले आहे. त्या मुळे उमेद्वारांनो कोणताही आर्थिक व्यवहार करू नये किंवा कोणतीही जोखीम घेऊ नये असे सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती’ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी तत्त्वावर शिपाई पदासाठी तात्काळ भरती सुरू असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- पदाचे नाव: शिपाई
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- जागांची माहिती: प्रत्येक जिल्हा परिषदेत २० जागा आणि प्रत्येक पंचायत समितीत १० जागा
- शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण
- वेतन: दरमहा २५,००० रुपये
व्हायरल पोस्टमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, १० वी व १२ वीची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि चारित्र्य प्रमाणपत्र अशी कागदपत्रेही नमूद करण्यात आली आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २० आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये १० पदे अशा स्वरूपाची कोणतीही राज्यव्यापी भरती ग्रामविकास विभाग, कोणत्याही जिल्हा परिषद अथवा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या शिपायांसह चतुर्थश्रेणी पदांची नियमित भरती सध्या आहे. रिक्त पदे कंत्राटी किंवा बाह्यस्रोत पद्धतीने भरण्याची प्रक्रिया प्रत्येक जिल्हा परिषद स्वतंत्रपणे राबवते. त्यामुळे हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, १० वी व १२ वीची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि चारित्र्य प्रमाणपत्र अशी कागदपत्रेही नमूद करण्यात आली आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















