Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!!

SSC Recruitment 2020 New Update

SSC Recruitment 2020 New Update  : बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी चालून आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची डिव्हिजनल क्लर्क व अन्य पदांसाठी भरती सुरू..

SSC CHSL Exam 2020: बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

SSC CHSL Exam 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कंबाइंड हायर सेकंडरी (१०+२) लेव्हल परीक्षा (CHSL 2020) परीक्षेचे नोटिफिकेशन जारी केले आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

या नोटिफिकेशननुसार, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग आणि कार्यालयांमधील लोअर डिव्हिजनल क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटिरएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर्स पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी ६ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. १५ डिसेंबर २०२० पर्यंत अर्जांची मुदत आहे. संगणकीकृत परीक्षा १२ ते २७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. टीअर २ परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

भरती प्रक्रियेचं सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे – SSC Recruitment 2020 New Update 

  • अर्ज भरणे – ६ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२०
  • ऑनलाइन अर्जांसाठी अखेरची मुदत – १५ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत) 19 डिसेंबर 2020 (मुदतवाढ)
  • ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – १७ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
  • ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत – १९ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
  • चलानमार्फत शुल्क भरणा – २१ डिसेंबर २०२० (बँकांच्या कामकाजाच्या वेळेत)
  • संगणकीकृत टिअर – १ परीक्षा – १२ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१
  • डिस्क्रिप्टीव्ह पेपर टिअर – २ – तारीख अद्याप जाहीर झालेली नाही

वयोमर्यादा

  • किमान वय १८ वर्षे ते कमार वय २७ वर्षे.
  • उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९४ ज्या पूर्वीचा किंवा १ जानेवारी २००३ नंतरचा नसावा. आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत.

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

शुल्क

  • SSC CHSL 2020 परीक्षेसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
  • महिला, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ईएसएम प्रवर्गांना कोणतेही शुल्क नाही.

इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. SSC मुख्यालयाच्या https://ssc.nic.in या संकेतस्थळावरूनच अर्ज करायचा आहे.

पूर्ण जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. Balaji says

    Mere age 31 hai or date of birth 5.10.1990. Hai kay main apply kar sakta hai.

  2. . दिलीप हरिहर says

    मेरी उमरा 37 साल है. मैई कोनासी पोस्ट के लिए अवेदान करु.

  3. . दिलीप हरिहर says

    37 वय .मी अर्ज करू शकतो.

  4. Poonam says

    Need of education for job

  5. Meena Naren Trivedi says

    How can I apply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड