SSC HSC Board Exam Fee Update
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची दखल घेत शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्णयानुसार २६५ तालुक्यांमध्ये विशेष उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या आहेत.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क सवलतीचा लाभ मिळणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सवलत आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांची संपूर्ण यादी पुढे देण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांची यादी


इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ
या निर्णयाचा लाभ फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे.संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा आवेदनपत्र भरून घेताना सध्या परीक्षा शुल्क आकारू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही कार्यवाही सुरू ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्य मंडळाच्या निर्देशानुसार, विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात.तसेच, परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा शुल्क माफीबाबत पुढील सूचना
या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील सविस्तर सूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्क माफीची अंमलबजावणी, पात्रतेचे निकष आणि पुढील प्रक्रिया याबाबत मंडळाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांची यादी शासन निर्णय PDF डाउनलोड करा
SSC HSC Board Exams 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे तसेच आयटीआयच्या ‘ट्रान्सफर ऑफ क्रेडिट’ योजनेतील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळा प्रमुखांमार्फत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, तर त्यानंतर १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विलंब शुल्कासह आणि १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अतिविलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. शाळांनी जमा केलेले परीक्षा शुल्क व विद्यार्थ्यांची अंतिम यादी ७ डिसेंबर २०२६ पर्यंत विभागीय मंडळाकडे सादर करावयाची आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व इतर तपशील काळजीपूर्वक तपासून विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य करण्यात आले असून, मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नियमित विद्यार्थ्यांसह सर्व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक:
- नियमित शुल्कासह अर्ज: ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत
- विलंब शुल्कासह (Late Fee) अर्ज: १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६
- अतिविलंब शुल्कासह अर्ज: १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६
- शुल्क पावती व यादी सादर करणे: ७ डिसेंबर २०२६ पर्यंत (शाळांनी विभागीय मंडळाकडे जमा करणे बंधनकारक)
अर्जासाठी पात्र विद्यार्थी श्रेणी:
- नियमित विद्यार्थी (Regular Students)
- पुनर्परीक्षार्थी (Repeater Students)
- नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त सर्व खासगी विद्यार्थी (Class Improvement / Private)
- ‘ट्रान्सफर ऑफ क्रेडिट’ (ITI Transfer of Credit) योजनेतील विद्यार्थी
शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:
विद्यार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित शाळा प्रमुखांमार्फतच ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्जातील विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व इतर वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक तपासून त्यावर विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. अर्जासोबत अपलोड करावयाचे छायाचित्र मंडळाच्या निर्धारित निकषांनुसारच असावे. मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने प्रक्रियेत विलंब टाळावा, असा इशारा राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिला आहे.
SSC HSC Board Exam Fee Update
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यात नुकतीच पुणे येथे एक महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात दहावी व बारावी परीक्षाप्रक्रियेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टीबाधित भागातील विद्यार्थिनींना दहावी व बारावी परीक्षेचे शुल्क माफ करण्याबाबत विचार झाला.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यभरातील सदस्य उपस्थित होते. अतिवृष्टीबाधित १०वी व १२वीच्या विद्यार्थिनींच्या फी माफीबाबत या विषयावर बैठकीमध्ये चर्चा झाली. शाळांनी फी माफीबाबत आपली मते ६ जूनपर्यंत कळवावीत किंवा याबाबत कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले. फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या मुलींसाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून संपूर्ण फी माफी करण्याचा मंडळाचा विचार आहे. फेब्रुवारी – मार्च २०२७ च्या परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र १० दिवसाच्या आत दिली जातील, त्यावर विद्यार्थ्यांचा कलर फोटो असेल, बारावीच्या गुणपत्रक तथा प्रमाणपत्रावर जन्मदिनांक असणार आहे.
SSC HSC Board Exam Fee Update
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही शुल्कवाढ जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासूनच लागू केली आहे. राज्य सरकारचा आदेश आणि कार्यकारी परिषदेच्या सभेतील निर्णयास अनुसरून राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले.
दहावीसाठी परीक्षा शुल्क ५७० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रमाणपत्र शुल्क २० रुपये असेल. प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क १० रुपये, तर तंत्रविषयासाठी प्रति विषय १०० रुपये शुल्क राहील. खासगी विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्क १११० रुपये, प्रक्रिया शुल्क १०० रुपये असेल. ‘श्रेणीसुधार’ साठी ११३० रुपये शुल्क असेल.
बारावीसाठी परीक्षा शुल्क ५९०, प्रशासकीय, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र शुल्क प्रत्येकी २० रुपये आहे. प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क १५ रुपये, ‘एमसीव्हीसी’साठी ३० रुपये आणि माहिती तंत्रज्ञानसाठी २०० रुपये असेल. खासगी विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्क १११० रुपये असेल.
SSC HSC Board Exam Fee Update
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली आहे. राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. मात्र, काही कारणांमुळे परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेतील विद्यार्थी या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरू शकतात.
SSC HSC Board Exam Fee Update
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खासगीरित्या १७नंबर अर्ज भरून दहावी आणि बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीसाठी राज्य मंडळाने अतिविलंब शुल्कासह मुदतवाढ दिली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना आता १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. १७ नंबरचा अर्ज भरून विद्यार्थ्यांना थेट दहावी किंवा बारावीची परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रत, नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दहावी आणि बारावीसाठी नोंदणी शुल्क १ हजार ११० रुपये, प्रक्रिया शुल्क १०० रुपये तसेच विलंब शुल्क १०० रुपये आहे. त्याचबरोबर आता प्रतिविद्यार्थी प्रतिदिन २० रुपये अतिविलंब शुल्क घेण्यात येणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















