दहावी, बारावी परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी… SSC HSC Board Exams 2023

SSC HSC Board Exams 2023

Maha SSC-HSC Exam Important Update

SSC HSC Board Exams 2023 – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education conducted the 10th and 12th exams in February-March. Now the students are curious about when the result of this exam will be released. Important information regarding the result has been received. The wait of the students for the results of 10th-12th is about to end. The result will be available for the students soon on the official website of the board, maharesults.mic.in.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. निकालासंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. दहावी-बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट maharesults.mic.in वर विद्यार्थ्यांसाठी निकाल लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लावला जातो. त्यानुसार २० मे पूर्वी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लावला जातो. त्यानुसार ३१ मे पूर्वी दहावीचा निकाल लागणार आहे.



दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8,44,116 मुले तर 7,33,067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5,033 सेंटरवर दहावीची परीक्षा झाली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.

कुठे पाहाता येईल निकाल?

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.

  • www.mahresult.nic.in
  • www.hscresult.mkcl.org
  • www.mahahhscboard.in

 

 


SSC HSC Board Exams 2023

SSC HSC Board Exams 2023 – Date wise detailed final time table of 10th-12th examinations is available on the board’s website ‘www.mahahsscboard.in’. The time table facility on the Board’s website is for information only. The timetable issued in printed form by the Secondary School, Higher Secondary School, Junior College before the examination will be final. Download SSC HSC Board Exams 2023 Time Table from below Link :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीचे २ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर १९ सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले होते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

SSC HSC Board Exams 2023 Time Table

या वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षा कालावधी :

परीक्षा : कालावधी

  • बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) सर्वसाधारण व दिलक्षी विषय आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३
  • दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) : २ मार्च  ते २५ मार्च २०२३

How to download the Maharashtra board class 10th and 12th date sheet?

Step 1: Visit the official website of Maharashtra at mahahsscboard.in.

Step 2: Click on the link available to download Date Sheet of SSC/ class 10th OR click on the link available to download Date Sheet of HSC/ class 12th

Step 3: Download the PDF/ word file that opens up.

  1. TIMETABLE SSC-MARCH-2023 
  2. TIMETABLE HSC-FEB-2023 VOCATIONAL
  3. TIMETABLE HSC-FEB-2023 GENERAL AND BIFOCAL
  4. TIMETABLE NOTIFICATION FOR HSC AND SSC FEB/MAR 2023

Maharashtra 10th Board Exam Time Table 2023

Exam Date 1st shift (11 am – 2 pm) 2nd shift (3 pm – 6 pm)
Thursday, March 2, 2023 First Language: Marathi, Hindi, Urdu, Gujarati, Kannada, Tamil, Telugu, Malayalam (for regular and repeater candidates), Sindhi, Bengali, Punjabi Second or Third Language: German, French
Friday, March 3, 2023 Second or Third Language: Marathi, Kannada, Tamil, Telugu, Malayalam (for regular and repeater candidates), Sindhi, Bengali, Punjabi
1st shift (11 am – 1 pm)

Second or Third Language: (Composite course)

Marathi (Composite)

Saturday,

March 4, 2023

Multi Skill Assistant Technician/ Introduction to Basic Technology, Automotive Service Technician, Store Operation Assistant, Assistant Beauty Therapist, Tourism and Hospitality – Food & Beverage Service Trainee, Agriculture – Solanaceous Crop Cultivator, Electronics & Hardware Field Technician – Other Home Appliances, Home Care – Home Health Aide, Mechanical Technology, Electrical Technology, Electronics Technology, Power-Consumer Energy Meter Technician, Physical Education (Sport) – Early year physical activity facilitator, Apparels Sewing Machine Operator, Plumber General
Monday,

March 6, 2023

First language (English),

Third Language (English)

Wednesday,

March 8, 2023

Second or Third language: Hindi
1st shift (11 am – 1 pm)

Second or Third Language (Composite Course): Hindi

Friday,

March 10, 2023

Second or Third language: Urdu, Gujarati, Sanskrit, Pali, Ardhamagadhi, Persian, Arabic, Avesta, Pahalavi, Russian
Monday,

March 13, 2023

1st shift (11 am – 1 pm)
Mathematics Part-1 (Algebra),Arithmetic (Only for eligible Divyang Candidates)
Wednesday,

March 15, 2023

1st shift (11 am – 1 pm)

Mathematics Part-II (Geometry)

Friday,

March 17, 2023

st shift (11 am – 1 pm)

Science and Technology (Part I)

1st shift (11 am – 1.30 pm)

Physiology, Hygiene & Home Science (Only for eligible Divyang Candidates)

Monday, March 20, 2023 1st shift (11 am – 1 pm)

Science and Technology Part-II

Thursday,

March 23, 2023

1st shift (11 am – 1 pm)

Social Sciences Paper-I: History and Political Science

Saturday,

March 25, 2023

1st shift (11 am – 1 pm)

Social Sciences Paper-II: Geography

Maharashtra Board HSC Time Table 2023 for Science

Date of Exam Morning Session (11 AM to 2 PM)
27th of February,2023 Physics
1st of March,2023 Chemistry
3rd of March,2023 Mathematics & Statistics
7th of March,2023 Biology
13th of March,2023 Computer Science

SSC HSC Board Exams 2022 Update 

SSC HSC Board Exams 2022: The latest update for SSC HSC Board Exam Rules. As per the latest news, The rules for this year’s 10th and 12th exams have been changed. Students will not get their exam center in their school from this year, also the extra time of 30 minutes which was given during Corona period has also been cancelled. Further details are as follows:-

HSC, SSC Board Exam Rule Changed

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांचे नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. असे असताना बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. 

विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र मिळणार नाही, तसेच कोरोना काळात जो ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जात होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे. कोरोनापूर्व नियमावली लागू करण्यात येणार असून पूर्वीप्रमाणेच नियम असणार आहेत.

  • “कोरोना महामारीवेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या होम सेंटर्सची म्हणजेच ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षेची सुविधा आणि 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ सुरू करण्यात आला.
  • आता कोरोनाचा फार मोठा धोका नसल्यामुळे, आम्ही जुने नियम परत आणत आहोत” असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.
  • ऑनलाइन वर्गादरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी आल्याने त्यांना भरपाईसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.
  • तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी होम सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली होती.
  • आगामी बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नेमलेल्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार आहे.

SSC HSC Exam Tentative Timetable

संभाव्य वेळापत्रक…

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहेत.

तपशील : लेखी परीक्षेचा कालावधी

  • बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३
  • दहावी : २ मार्च ते २५ मार्च

Previous Update

दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट – SSC HSC Board Exams 2022

SSC HSC Board Exams 2022: Ssc Hsc Exam Preparation From Maharashtra Board. करोना प्रादुर्भावामुळे २०२१ ची दहावी, बारावी परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले. २०२२मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, २५ टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २०२३ची परीक्षा २०२०मध्ये झाली त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने तयारी सुरू केली.
  • करोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली.
  • आठ डिसेंबरपासून पुन्हा जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले. विभागात दहावी, बारावी परीक्षेसाठी नोंदणी संख्या वाढली आहे.

शाळा तेथे परीक्षा केंद्र नसणार आहेत. त्यामुळे परीक्षेची व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मंडळाची धांदल वाढली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, परीक्षार्थींची संख्या, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सोयीसुविधांबाबतचा आढावा विभागीय पातळीवर निश्चित करण्यात आला. परीक्षा केंद्रांची पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. यंदा दहावी, बारावीचे सुमारे वीस नवीन परीक्षा केंद्र वाढू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दहावीसाठी विभागात पाच जिल्ह्यांत साडेसहाशेपेक्षा अधिक, तर बारावीचे पावणेचारशेपर्यंत परीक्षा केंद्र संख्या असतील असे सांगण्यात येते. जिल्हानिहाय बैठकांमधून परीक्षा केंद्रांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.

विद्यार्थी संख्येत वाढ

  • दहावी, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • बारावी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत संपली, तर दहावीची सुरू आहे.
  • दहावीला नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७९ हजारांपर्यंत आहे.
  • बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६७ हजारपर्यंत आहे.
  • गतवर्षीच्या तुलनेत परीक्षार्थी विद्यार्थी संख्या वाढेल असे मंडळातील सूत्रांनी सांगितले.

हमीपत्र घेणार…

दहावी, बारावीच्या अनेक परीक्षा केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव असल्याचे २०२२ परीक्षेत समोर आले होते. शाळा तेथे केंद्र परीक्षा असताना अनेक केंद्रावर विद्यार्थी क्षमतेप्रमाणे सोयीसुविधा नसल्याचे भरारी पथकांच्या पाहणीत आढळले. फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. ज्यात वर्ग खोल्या, बाकडे, जनरेटरची सुविधा, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आदी सुविधा पुरवण्याबाबतचा समावेश असेल.

परीक्षेच्या नियोजनाबाबतची तयारी सुरू आहे. केंद्रनिश्चितीसाठी केंद्रांच्या भेटीची प्रक्रिया झाली असून विविध बैठकांचे आयोजन दोन दिवसांत सुरू होत आहे. परीक्षा केंद्रांना पायाभूत सुविधांबाबतही सूचना देण्यात येत आहेत.
-विजय जोशी, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 


Previous Update –

दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

SSC HSC Board Exams 2022: HSC Exam Extension of deadline for 12th exam application till tomorrow (30th November 2022). Further details are as follows:-

फेब्रुवारी -मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्‍या परीक्षेसाठी अर्ज (आवेदनपत्रे) भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्गत नियमित शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत बुधवार (ता.३०) पर्यंत वाढविली आहे. विलंब शुल्‍कासह शुक्रवार (ता.२) पर्यंत अर्ज भरता येईल.

  • या संदर्भात महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सूचना जारी केली आहे.
  • त्‍यानुसार उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्‍त्र, कला व वाणिज्‍य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • नियमित विद्यार्थ्यांसह सर्व शाखांचे पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट विद्यार्थ्यांना नियमित शुल्‍काने आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ दिली जात आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार बुधवार (ता.३०) पर्यंत नियमित शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरता येतील. पुढील दोन दिवस शुक्रवार (ता.२) पर्यंत विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत असेल. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्‍क बँकेत भरण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. तर चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या, प्रिलिस्‍ट जमा करण्याची मुदत ७ डिसेंबरपर्यंत असेल.


Previous Posts –

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

SSC HSC Board Exams 2022: The extension till 15th November 2022 for the 10th Exam application & 25th November 2022 for the 12th Exam application. Extension is being given to the students to fill the application along with the regular fee. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरायची आहेत.
  • बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबरला, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत १० नोव्हेंबरला संपत आहे.
  • या मुदतीत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
  • दहावीची परीक्षा देणाऱ्या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याचा तपशील –

तपशील : कालावधी

  • – माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी : २५ नोव्हेंबरपर्यंत
  • – पुनर्परीक्षार्थी/खासगी विद्यार्थी/श्रेणी सुधार योजना, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे/ आयटीआयचे विद्यार्थी : ११ ते २५ नोव्हेंबरपर्यंत
  • – माध्यमिक शाळांनी चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत : २९ नोव्हेंबरपर्यंत

बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा तपशील –

तपशील : कालावधी

  • – उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रमाचे, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी : १५ नोव्हेंबरपर्यंत (नियमित शुल्कासह) आणि १६ ते ३० नोव्हेंबर (विलंब शुल्कासह)
  • – उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत : २ डिसेंबरपर्यंत

SSC HSC Board Exams 2022

 


Previous Update –

SSC HSC Exam Timetable

SSC HSC Board Exams 2022: State Board of Education has announced the probable schedule of the 10th & 12th exams. According to the probable schedule, the 12th examination will be held from 21st February to 20th of March 2022 & 10th Exam will be held from 2nd March to 25th of March 2022. visit www.mahahsscboard.in for more details about the timetable. Further details are as follows:-

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. 

Maha Board Exam Scheduled

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या नऊ विभागासाठी मंडळातर्फे परीक्षा घेण्यात येईल.
  • राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे.
  • तर दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
  • कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
  • शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

SSC HSC Board Exams 2023 – Timetable 

मंडळाच्या वेबसाइटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे अन्य वेबसाइटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. या वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


BOARD Exam Pattern 

SSC HSC Board Exams 2022: New Education Policy, NEP will change the pattern of the 10th and 10th examinations. Check here for more details about Board Exam Pattern. Further details are as follows:-

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षांसह १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांकडून मत मागवले आहे. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत किरकोळ बदल करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नांची उत्तरे सर्व्हेक्षणादरम्यान लोकांना विचारण्यात आली आहेत.

  • नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy, NEP) अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला जात आहे.
  • शालेय शिक्षण अधिक समर्पक आणि अर्थपूर्ण बनविण्यावर सरकारचा भर आहे.
  • दरम्यान सरकारने विद्यार्थी आणि पालकांकडून त्यांचे मत मागितले आहे.
  • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षांसह १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांकडून मत मागवले आहे.
  • बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत किरकोळ बदल करण्याची गरज आहे का?
  • बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी, असे तुम्हाला वाटते का?
  • या प्रश्नांची उत्तरे सर्व्हेक्षणादरम्यान लोकांना विचारण्यात आली आहेत.

शालेय परीक्षा, बोर्ड परीक्षा, गृहपाठ आणि शाळेत जाणे अशापैकी कोणत्या कारणांमुळे विद्यार्थ्यांना जास्त ताण येतो असा प्रश्न देखील सर्व्हेक्षणात विचारण्यात आला आहे.

इतर महत्वाचे प्रश्न

  • या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत.
  • नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्कमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे?
  • पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनवण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे का?
  • त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घालायची का, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
  • विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याबाबत प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत.

हे प्रश्न सर्वेक्षणात समाविष्ट

  • करोना प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षणाचे बरेच नुकसान झाले.
  • यावर आता उपाय कसा करता येईल?
  • शालेय शिक्षणाचा आणखी कोणता विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो?
  • शिक्षण प्रक्रियेत पालकांना मुलांसोबत कसे जोडायचे?
  • शिक्षण मजा करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात?
  • समुदाय आणि शाळांशी जोडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?
  • शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल?
  • अशा प्रश्नांचा सर्व्हेक्षणामध्ये समावेश आहे.

10th Exam Timetable 

  • १५ मार्च :     प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
  • १६ मार्च :    द्वितीय वा तृतीय भाषा
  • १९ मार्च :    इंग्रजी
  • २१ मार्च :    हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • २२ मार्च :     संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय
  • २४ मार्च :    गणित भाग – १
  • २६ मार्च :    गणित भाग २
  • २८ मार्च :    विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
  • ३० मार्च :    विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
  • १ एप्रिल :    समाजशास्त्र पेपर १
  • ४ एप्रिल :   समाजशास्त्र पेपर २

12th Exam Timetable 

वाणिज्य / विज्ञान / कला शाखेतील महत्त्वाचे विषय  

  • ४ मार्च :     इंग्रजी
  • ५ मार्च :    हिंदी
  • ७ मार्च :    मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू, पंजाबी, तामिळ
  • ८ मार्च :     संस्कृत
  • ९ मार्च :     ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
  • १० मार्च :    फिजिक्स
  • १२ मार्च :    केमिस्ट्री
  • १४ मार्च :    मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
  • १७ मार्च :    बायोलॉजी
  • १९ मार्च :     जियोलॉजी
  • ११ मार्च :    सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
  • १२ मार्च :    राज्यशास्त्र
  • १२ मार्च :    अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
  • १४ मार्च :    अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर २
  • १९ मार्च :    अर्थशास्त्र
  • २१ मार्च :    बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
  • २३ मार्च :    बँकिंग पेपर – १
  • २५ मार्च :    बँकिंग पेपर – २
  • २६ मार्च :    भूगोल
  • २८ मार्च :    इतिहास
  • ३० मार्च :    समाजशास्त्र

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Chetan pawar says

    Boradachi prashna patrika pathav

  2. Nikhil Rathod says

    दहावीच्या पेपरची लिंक पाठवा

  3. Sanket says

    दहावीच्या पेपरचा टाइम टेबल पाठवा

  4. Sanket says

    दहावीच्या पेपरचा टाइम टेबल पाठवा

  5. Nitin kamble says

    ह्या वर्षी बोर्ड आहे की नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड