Maharashtra Board Results: दहावी, बारावी परीक्षांच्या निकालासंदर्भात अपडेट

SSC HSC Board Exams 2022

Board Result May Declare Soon in MH 

SSC HSC Board Exams 2022: The results were expected to be announced sooner than later (Board Result may be declared soon in MH). But now a new update has come out regarding the outcome of the board. Further details are as follows:-

निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाच्या निकलाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. 

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे पेपर पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC आणि HSC बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुले राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आव्हान होतं. तरीही यंदा हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार केला जात आहे.
 • काही मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे स्टेट बोर्डाचे दहावी परीक्षेचा निकाल हा येत्या 20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणायची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 • याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी सूत्रांनी अशी माहिती दिली आहे.
 • राज्यातील सर्व शहरांमध्ये शिक्षक जोमानं पेपर तपासणीला लागले होते.
 • त्यात काही भागांमध्ये तांत्रिक अडचणीही आल्या.
 • मात्र आता याचा सामना करून बोर्डानं पेपर तपासणी पूर्ण केल्याचं सांगितलं आहे.

FYJC प्रवेश होणार सुरु 

 • नुकतेच महाराष्ट्र FYJC प्रवेश 2022 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्याच्या आधारे निकाल मेच्या मध्यापर्यंत जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 • FYJC प्रवेश 2022 च्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेश प्रक्रिया 17 मे पासून सुरू होणार आहे.
 • त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.
 • अशा स्थितीत अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या वर्गांचा निकाल जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे

Maharashtra Board Results

SSC HSC Board Exams 2022 : The work of checking the answer sheets for the 10th and 12th examinations of the Maharashtra Board has been completed. So now millions of students in the state are waiting for the result. According to the sources, the result of class X is ;-likely to be announced on June 10, 2022 and the result of class XII is likely to be announced on June 20, 2022. Further details are as follows

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल १० जून २०२२ रोजी आणि बारावीचा निकाल २० जून २०२२ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

शिक्षण विभागाकडून अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला जाईल. दहावी (SSC Result) आणि बारावी (HSC Result) बोर्डाच्या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

Maharashtra Board Results: गेल्या महिन्यात संपली परीक्षा 

 • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यातील बोर्डाच्या परीक्षा मार्च ते एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या.
 • दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत झाल्या.
 • तर त्याच वेळी ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत बारावीच्या परीक्षा झाल्या.
 • राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून नियुक्त परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
 • विशेष म्हणजे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनेही केली होती.
 • दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत साधारण ३० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

कधी लागणार निकाल? 

Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education may announce the results of Class X and XII in June. According to the information, the result of class X is likely to be announced on June 10, 2022 and the result of class XII is expected to be announced on June 20, 2022. According to the sources, the evaluation of the answer scripts has been completed. Now bar code scanning is started. Therefore, the result is expected to be announced before the above date. However, the Maharashtra Board has not yet announced an official date for the verdict.

परीक्षेचा तपशील 

 • दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
 • यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनी परीक्षा दिली.
 • एकूण २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
 • संपूर्ण राज्यातील ५०५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेतून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी १० काऊन्सेलर्सची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच विभागीय स्तरावर एक किंवा दोन काऊन्सेलरची नियुक्ती करण्यात आली होती. दहावीची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना सवलत देण्यात आली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले होते. एकूण २१,३४९ इतक्या परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली


SSC HSC Result 2022 Update

SSC HSC Board Exams 2022: The 10th exam was held from March 15 to April 4 and the 12th exam was held from March 4 to April 7. The state board on Monday reviewed the state and gave the divisional boards a deadline of April 30 to investigate, sources said. The results of Class XII will be announced in the first week of June and the results of Class X will be announced in the second week. Further details are as follows:-

दहावी परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिल, बारावीची परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल दरम्यान घेण्यात आली. राज्य मंडळाने सोमवारी राज्यातील आढावा घेत विभागीय मंडळांना ३० एप्रिलपर्यंत तपासणीची मुदत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर, दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, असेही सांगितले जात आहे. 

 • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेत औरंगाबाद विभागाने जवळपास ८० टक्के उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली.
 • विभागात दहावी, बारावीच्या साडेतीन लाख परीक्षार्थींच्या २५ लाख ८६ हजारपेक्षा अधिक उत्तरपत्रिकांची संख्या आहे.
 • राज्य मंडळाने सोमवारी राज्यातील आढावा घेत विभागीय मंडळांना ३० एप्रिलपर्यंत तपासणीची मुदत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
 • बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर, दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, असेही सांगितले जात आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करोनामुळे दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रकात काही बदल केले. परीक्षा घेण्यावर ठाम राहत मंडळाने २०२२च्या परीक्षा घेतल्या. दहावी परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिल, बारावीची परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल दरम्यान घेण्यात आली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीचे प्रक्रियाही मंडळाने सुरू केली. औरंगाबाद उत्तरपत्रिका तपासणीत सुरुवातीला इतर विभागांच्या तुलनेत मागे होते. त्यामुळे मंडळाची सुरुवातीला धांदल उडाली, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी नियोजनात बदल केले. त्यामुळे यंदा गठ्ठे परत येण्याचे प्रमाण अत्यल्प होते. यंदा ऐनवेळी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली.

ऐनवेळी परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच हजारच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येते. ऐनवेळ परीक्षेला नोंदणी केलेल्या परीक्षार्थींचे उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन मंडळ विभागीय कार्यालय पातळीवरून झाले. पेपर झाल्यानंतर कस्टडीतून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी मॉडरेटरकडे जातात. प्रत्येक विषयाला २१ दिवस असा वेळ दिला जातो. सोमवारी राज्य मंडळाने विभागीय पातळीवरील आढावा घेतला. औरंगाबाद विभागाचा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. यंदा बारावीला विभागातून १ लाख ६९ हजार २८९ तर, दहावीला एक लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

तपासणी प्रक्रियेसाठी ३० एप्रिल मुदत 

Board officials are saying that the results of 10th and 12th will be announced in time. This year, the results of Class XII will be announced in the first week of June, while the results of Class X will be announced in the second week, sources said. Accordingly, the process of checking the answer sheets is underway. Two papers were pushed forward. It is said that the paper may extend the period of investigation. In view of this, the state board has given a deadline to the divisional boards till the end of April to check the answer scripts, said an official source in the board.

तपासणी प्रक्रियेत गती

उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत गती आहे. तपासणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेण्यात येतो. जे काम राहिले त्याचे काम पूर्ण करण्याबाबत तपासणीसांना कळविले जाते.

आर. पी. पाटील, विभागीय सचिव,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद.


SSC HSC Result 

SSC HSC Board Exams 2022: Great news for 10th and 12th-grade students. The board’s results will be announced in the first week of June. Paper inspection work In the final stage, paper inspection work will be completed by the 30th. Further details are as follows:-

महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं यंदाचं शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यामुळे अनेक विद्यार्थी नाराज होते. ऑफलाईन परीक्षा (Maharashtra state Board Exam Result) रद्द करण्यात याव्यात म्हणून काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा (State Board exam Result 2022) ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यात. आता स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. अशात हा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार घातल्याने राज्यातील SSC, HSC परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे (SSC, HSC Results 2022 Likely To Be Delayed).

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या पूर्ण न झाल्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या न गेल्यास निकाल उशिरा लागण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. चार दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, की दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच लागेल. मात्र, अशात आता हा निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे. सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. MSBSHSE ने उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली होती आणि निकाल वेळेवर घोषित करायचा होता, मात्र आता शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आहे.

 


दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात 30 तारखेपर्यंत पेपर तपासणीचं काम पुर्ण होणार आहे. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातील सूत्रांनी टीव्ही9 मराठीला दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. कारण, निकालांमुळे पुढील प्रवेश अडकतो. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचं नियोजन करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी निकाल लागणं गरजेच असतं. दरम्यान, दहावी-बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल.

अकरावी ऑनलाइन प्रवेश

 • दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी तयारी सुरु होते.
 • दरम्यान ,  राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचं संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण विभागानं जाहीर केलंय.
 • विद्यार्थ्यांना 17 मे पासून अर्ज भरता येणार आहे.
 • राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती या पाच विभागांसाठी अकरावी प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात.
 • अर्ज भरण्याची प्रक्रिया ही दोन टप्प्यांत केली जाते.
 • पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते आणि त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोन मध्ये आवडीच्या कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरायचे असतात.
 • दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा यासंदर्भातील माहिती कळावी यासाठी 1 ते 14 मे या कालावधीत अर्ज भरण्याचा सराव झाल्यानंतर 17 मे पासून दहावीचा ऑनलाइन निकाल लागेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज भरता येणार आहे.

पेपर तपासणी अंतिम टप्प्यात

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. त्यामुळे येत्या जूनमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. अंतिम टप्प्यात 30 तारखेपर्यंत पेपर तपासणीचं काम पुर्ण होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातील सूत्रांनी टीव्ही9 मराठीला दिली आहे. दरम्यान, दहावी-बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी तयारी सुरु होते. निकाल न लागल्याने पुढील प्रवेश अडकतो. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचं नियोजन करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी निकाल लागणं गरजेच असतं.


SSC HSC Board Exam Result Date

SSC HSC Board Exams 2022: The results of Class X-XII examinations conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be announced in due course. The state board is trying to announce the results of Class XII on June 10 and the results of Class X between June 20, said State Board President Sharad Gosavi.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल नियोजित वेळेतच जाहीर केला जाईल. बारावीचा निकाल 10 जून तर दहावीचा निकाल 20 जूनच्या दरम्यान जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

SSC HSC Board Exams 2022


SSC Board Exams Result Date

SSC HSC Board Exams 2022: The results of class X will be announced on May 12, according to the education department. The paper examination of the 10th examination, which will be held on April 11, will start from the 22nd. Further details are as follows:-

दहावीचा निकाल 12 मे रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. 11 एप्रिलला सांगता झालेल्या दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीला 22 तारखेपासून सुरुवात होणार आहे. पेपर तपासणीसाठी राज्यातील 60 हजार  मुल्यमापकांची मदत घेतली जाणार असून, बेळगाव शहरातील आठ केंद्रांसह 34 शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे.

SSC HSC Board Exams 2022


SSC, HSC Result 2022

SSC HSC Board Exams 2022:  Boycott on paper board exam paper examination until the agitation is noticed. Warning of Maharashtra State Permanent Unaided School Action Committee. Tenth, twelfth result likely to be delayed. Further details are as follows:-

गेल्या अनेक वर्षांपासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर तसेच, अघोषितवर राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षणक्षेत्रात प्रामाणिक भूमिका पार पाडत असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. शाळांना अनुदान नसल्याने शिक्षकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत पेपर तपासणीवर बहिष्कार असेल असे संघटनेने म्हटले आहे.

राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा पेपर तपासणी बहिष्कार आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने दिला आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांनीही आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यातील सुमारे १५ हजार शिक्षक पेपर तपासणार नाहीत असेही समितीने म्हटले आहे. शिक्षणमंत्र्यांनी वेळ काढून आमचे म्हणणे ऐकावे आणि प्रश्न मार्गी लावावेत अशी या शिक्षकांची मागणी आहे. परीक्षा सुरू असताना आम्ही सरकारला निवेदने दिली आहेत. आमच्या मागण्या पूर्ण करण्यास विलंब होणार असेल तर आता शिक्षक पेपर तपासणीसाठी आलेले पेपर विभागीय मंडळातच जमा करू, असा इशारा विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समितीचे मुंबईचे अध्यक्ष संजय डावरे यांनी दिला आहे.


SSC HSC Board Exams Result 

SSC HSC Board Exams 2022:  The results of the 10th and 12th exams are a sign of late arrival or are likely to be delayed. The reason for this is that the bundles of answer sheets of class XII have been lying without examination. Further details are as follows:-

दहावी आणि बारावीचे परीक्षांचे निकाल उशिराने लागण्याची चिन्हे आहेत किंवा रखडण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून असल्याचं समोर आलं आहे.

राज्यातील कायम अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासणीस नकार दिल्याने राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल यावेळी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर आत्तापर्यंत पार पडलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना विभागीय मंडळात पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन दिले होते. तर याबाबत पत्रकार परिषद घेऊन, आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दहावी-बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या कृती समितीने दिला होता. त्यानुसार विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल ३० हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.

विशेष म्हणजे बोर्डाकडून शिक्षकांना उत्तरपत्रिकेचे गठ्ठे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांकडून ते गठ्ठे स्वीकारले जात नसून आलेले गठ्ठे परत महामंडळाकडे पाठवून दिले जात आहे. त्यामुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता शिक्षणमंत्री यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


SSC HSC Board Exams 2022

SSC HSC Board Exams 2022 : The Supreme Court has refused to conduct Class X and XII online through boards and state boards like CBSE, ICSE in the country. The apex court rejected the plea that the examination should not be conducted offline. Further details are as follows:-

राज्य मंडळांच्या तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेऊन वैकल्पिक मूल्यमापन करावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने याचिकाकर्त्यांना फटकारले. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

SSC HSC Board Exams 2022

राज्य मंडळांच्या तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेऊन वैकल्पिक मूल्यमापन करावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने याचिकाकर्त्यांना फटकारले. ‘अशा याचिकांवर सुनावणी घेण्याने व्यवस्थेत आणखी संभ्रम निर्माण होतो. आधीचा निर्णय आदर्श ठरू शकत नाही. अशा याचिका केवळ विद्यार्थ्यांना खोटी उमेद दाखवतात आणि संभ्रम निर्माण करतात. तुमच्या याचिकेवर विचार करण्याचा अर्थ आहे आणखी जास्त संभ्रम निर्माण करणे.’ न्या. ए.एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी.टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली.


SSC HSC Board Exams Concession Marks 

SSC HSC Board Exams 2022 : Tenth and twelfth-grade students will get concession sports marks. It has been decided to give concession marks to 10th and 12th class students on the basis of their participation in sports competitions, informed the Minister of School Education Prof. Varsha Gaikwad. Further details are as follows:-

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.

असे दिले जातात गुण 

SSC HSC Board Exams 2022

इंटरमिजिएटच्या आधारावर गुण 

कोविड १९ मुले २०२१-२२ यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी एलिमेंटरी परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेत प्राप्त श्रेणीच्या आधारावर या वर्षापुरते सवलतीचे कलागुण देणार आहेत. हा निर्णय दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांना कलागुणांचा लाभ यामुळे मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.

SSC HSC Board Exams 2022


SSC HSC Board Exams 2022 

दहावी-बारावीच्या परीक्षा या लेखी स्वरूपातच होणार असून, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी परीक्षा मंडळाकडून सर्व विभागीय मंडळांत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय समुपदेशन करण्यासाठी विभागीय हेल्पलाईन सुविधा मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

SSC HSC Board Exams 2022


Maharashtra SSC HSC Exam Offline

SSC HSC Board Exams 2022 : The State Secondary and Board has clarified in a press conference today that the examinations will be held offline as per the schedule before the 10th and 12th examinations. Further details are as follows:-

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ठरल्या वेळेनुसारच आणि ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे सांगत राज्य मंडळाने या परीक्षांसंदर्भात उपस्थित होणाऱ्या सर्व शक्यता, मागण्यांना पूर्णविराम दिला. यंदा परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ, अतिरिक्त परीक्षा केंद्रे असणार आहेत. बोर्डाने आज पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतच त्यांनी परीक्षा (Board Exams 2022) द्यायची आहे. यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिल्यामुळे परीक्षा ११ ऐवजी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. त्याआधी दहा मिनिटे म्हणजे १०.२० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येईल. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी, बारावी परीक्षांसंबंधीची सर्व माहिती आणि यंदाच्या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना या पत्रकार परिषदेत दिल्या. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले. यंदा दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे आणि ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. यंदा आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

परीक्षेसंदर्भातले अन्य महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे – 

 • – दहावी, बारावी परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार पेन, पेपर पद्धतीनेच
 • – लेखी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ
 • – ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे
 • – ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ
 • – लेखी परीक्षा सकाळी ११ ऐवजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार
 • – विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र येईल, अशी व्यवस्था बोर्ड करणार
 • – विद्यार्थी संख्या अधिक असेल तर शाळेच्या जवळचेच परीक्षा केंद्र
 • – एका शाळेत १५ पेक्षा जास्त परिक्षार्थो असतील तर तिथे परीक्षा केंद्र करणार
 • – गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ करण्यात येणार

SSC HSC Practical Exam 2022

SSC HSC Board Exams 2022 : Oral and practical examinations of class XII will start from 14th February in the state. Against this backdrop, the State Board of Secondary and Higher Secondary Education has issued guidelines. Further details are bas follows:-

राज्यात १४ पेब्रुवारीपासून बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी (SSC HSC Practical Exam 2022) बाह्यपरीक्षक न बोलावता अंतर्गत परीक्षकाच्या साह्यानेच परीक्षा घेण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या या परवानगीमुळे विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांच्या गुणांची खैरात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दहावी, बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेताना राज्य मंडळाने शाळांना काही सूचना केल्या आहेत. यामध्ये शाळांना अंतर्गत परीक्षकासह तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिकांच्या परीक्षा घेणार आहेत. राज्यामध्ये दहावी आणि बारावीसाठी ८० आणि २० गुणांचा पॅटर्न राबवला जातो. ८० गुण लेखी परीक्षेसाठी आणि २० गुण वर्षभराची प्रात्यक्षिकांची कामगिरी आणि अंतिम तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा यासाठी दिले जातात. यापूर्वी अंतिम तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेला बाह्यपरीक्षक असल्याने विद्यार्थी या परीक्षांना महत्त्व देत होते. परंतु, यंदा शाळेतील शिक्षकच परीक्षा घेणार असल्याने आता विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांच्या गुणांची खैरात केली जाईल, अशी भिती शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

यासह प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना एकाच वेळी न बोलावता टप्प्याटप्प्याने बोलवावे, असे राज्य मंडळाने सांगितले आहे.

राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचना 

 • १. प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत शिक्षकांनीच घ्याव्यात.
 • २. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांची गर्दी करू नये.
 • ३. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासावे.
 • ४. टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात.
 • ५. सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळावेत.

SSC HSC Board Exams 2022

SSC HSC Board Exams 2022 : The Board had announced the schedule of the Written HSC SSC Exam for Class X and XII a few days back. Now Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has issued the schedule of Practical Exam for 10th and 12th. Further details are as follows:-

Written HSC SSC Exam

बोर्डाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे (Written HSC SSC Exam) वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. आता महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे (Practical Exam) वेळापत्रक जारी केले आहे.

डळाच्या निर्देशांनुसार शाळा त्यांच्या पातळीवर या परीक्षांचे आयोजन करणार आहेत. बोर्डाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत होणार आहे, तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होणार आहेत. या कालावधीत शाळांनी आपापल्या पातळीवर परीक्षांचे आयोजन करायचे आहे.

लेखी आणि तोंडी परीक्षा कधी? 

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे, तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा (Written HSC Exam)ही ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा ( SSC Written Exam) १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे.


SSC HSC Exam 2022 Update

SSC HSC Board Exams 2022 : In view of the increasing number of patients in Corona, it has been decided to close the actual school till February 15. However, the 10th and 12th standard examinations will be held offline and as per schedule, said Sharad Gosavi, Chairman, State Board of Secondary and Higher Secondary Education. Further details are as follows:-

करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता १५ फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात पुन्हा शालेय शिक्षण ऑनलाइन झाले आहे. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार का, अशी शंका उपस्थित होत असतानाच या परीक्षा ऑफलाइनच होणार असून, त्या वेळापत्रकानुसार घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

Schools have been given the freedom to conduct oral and practical examinations of these students. Schools want to take care of that by planning in their own way. However, the written test will be held as per the earlier schedule, he added. In the meantime, the decision will be made based on the circumstances of the time. However, Gosavi said there would be no change in the current plan.

गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. या शैक्षणिक वर्षाचे सर्व वर्ग १५ जूनला ऑनलाइन सुरू करण्यात आले आहेत; तसेच चार ऑक्टोबरपासून राज्यातील काही भागांत दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्गही सुरू झाले होते. यामुळे मागील महिन्यात मंडळाने दहावी व बारावीचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च, तर बारावीची लेखी चार मार्चपासून सुरू होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे.


SSC HSC Board Exams Details 

SSC HSC Board Exams 2022 : The detailed schedule of the 10th and 12th examinations was announced by the State Board of Secondary and Higher Secondary on Tuesday. Especially, this year students have been given extra time of 15 minutes and half an hour for written test. Therefore, papers on all subjects will start at 10.30 am. Further details are as follows:-

दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मंगळवारी जाहीर केले. विशेष म्हणजे, यंदा लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे आणि अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विषयांचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील. 

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची दमछाक होऊ नये, यासाठी ही वेळ वाढवून दिल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.  दहावी आणि बारावीच्या ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी प्रत्येकी १५ मिनिटे तर ८० ते १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास, असा वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.

SSC HSC Board Exams 2022

The Department of Education has clarified that the students should enter the examination by making sure from the timetable, and the timetable printed on other websites or other systems should not be accepted. Meanwhile, senior educationist Dr. Vasant Kalpande said that even last year, students were given extra time for exams. Students’ writing practice is broken, so the decision taken by the state board is right and in the interest of the students.

विद्यार्थ्यांना वाढीव वेळ उपयुक्त ठरणार  

परीक्षेत वेळेला अन्ययसाधारण महत्त्व आहे. सगळ्यात आधी प्रश्नपत्रिकेचे वाचन व त्यातील सोप्या प्रश्नांवर खुणा करून त्याप्रमाणे पेपर सोडवणे सुरू करावे. योग्य ते प्रश्न, उपप्रश्न क्रमांक नोंदवावेत. विद्यार्थ्यांनी लेखन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावे. तसेच नेमके किती प्रश्न सोडवण्यास सांगितले आहे तेवढे सोडले आहेत का याची खात्री करणे आणि नसल्यास पूर्तता करणे आवश्यक ठरणार आहे. दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण होण्यासाठी वैयक्तिक स्तरावर नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी परीक्षा अगोदर काही नमुना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा लागणार आहे. – महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ

10th Exam Timetable 

 • १५ मार्च :     प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
 • १६ मार्च :    द्वितीय वा तृतीय भाषा
 • १९ मार्च :    इंग्रजी
 • २१ मार्च :    हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
 • २२ मार्च :     संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय
 • २४ मार्च :    गणित भाग – १
 • २६ मार्च :    गणित भाग २
 • २८ मार्च :    विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
 • ३० मार्च :    विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
 • १ एप्रिल :    समाजशास्त्र पेपर १
 • ४ एप्रिल :   समाजशास्त्र पेपर २

12th Exam Timetable 

वाणिज्य / विज्ञान / कला शाखेतील महत्त्वाचे विषय  

 • ४ मार्च :     इंग्रजी
 • ५ मार्च :    हिंदी
 • ७ मार्च :    मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू, पंजाबी, तामिळ
 • ८ मार्च :     संस्कृत
 • ९ मार्च :     ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
 • १० मार्च :    फिजिक्स
 • १२ मार्च :    केमिस्ट्री
 • १४ मार्च :    मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
 • १७ मार्च :    बायोलॉजी
 • १९ मार्च :     जियोलॉजी
 • ११ मार्च :    सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
 • १२ मार्च :    राज्यशास्त्र
 • १२ मार्च :    अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
 • १४ मार्च :    अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर २
 • १९ मार्च :    अर्थशास्त्र
 • २१ मार्च :    बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
 • २३ मार्च :    बँकिंग पेपर – १
 • २५ मार्च :    बँकिंग पेपर – २
 • २६ मार्च :    भूगोल
 • २८ मार्च :    इतिहास
 • ३० मार्च :    समाजशास्त्र

Maharashtra Board Exam Date

SSC HSC Board Exams 2022 : School Education Minister Varsha Gaikwad has informed that 10th and 12th standard examinations will be conducted offline in the state. The written examination of class XII will be held from 4th March 2022 to 7th April 2022. The 10th board exam will be held from March 15, 2022 to April 18, 2022. Further details are as follows:-

विद्यार्थ्यांनो, दहावी बारावीच्या परीक्षांची तारीख ठरली; जाणून घ्या कधी होणार तुमची परीक्षा. आता राज्यात या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारवेच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा ही 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा ही 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत.

SSC HSC Board Exams 2022

गेल्या दीड वर्षांपासून देहात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही दहावी आणि बारावीच्या [परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना विशेष मूल्यांकन पद्धतीनं मार्क्स देण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्गी सुरु झाले आहेत. म्हणूनच आता राज्यात या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारवेच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

या दरम्यान होणार तोंडी परीक्षा

दरम्यान इयत्ता दहावी आणि बारावीच्या तोंडी परीक्षा कधी होणार आहेत याबद्दलही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

 • इयत्ता बारावीच्या तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 दरम्यान होणार आहे.
 • तर इयत्ता दहावीच्या तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 दरम्यान घेण्यात येणार आहेत.

SSC HSC Board Exams 2022

SSC HSC Board Exams 2022 : Students who have filled up application form number 17 for the 10th and 12th examinations have been given an extension to apply. You can apply till December 18 with a regular fee. Further details are as follows:-

Maharashtra Board Extends Dates For Ssc Hsc Private Candidates Registratio

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज भरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

Maharashtra Board Exam 2022

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे आणि २८ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १२ नोव्हेंबर आणि विलंब शुल्कासह २० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार होती. मात्र, अर्ज भरताना कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे राज्य मंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

The application process will continue till December 18 for the regular students of vocational courses, re-examinees, students who have obtained the name registration certificate and students who are sitting for private and rare subjects. These students can apply till 5 pm till 28th December with late fee. Similarly, the deadline for students appearing for the 10th and 12th examinations has been extended. Schools to students accordingly; Also, through junior colleges, application can be filled till 24th December with delay and over-delay fee, said Secretary of State Board Dr. Ashok Bhosale said.


SSC HSC Re-Exam Schedule Declared 

SSC HSC Board Exams 2021  : The State Board of Secondary and Higher Secondary Education has announced the schedule of supplementary examinations for Class X and XII. The 10th standard examination will start from 22nd September, while the 12th standard examination will start from 16th September. Both these exams will be in written form. The detailed schedule has been published on the State Board’s website https://mahahsscboard.in/.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्य मंडळाने शुक्रवारी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. Chetan pawar says

  Boradachi prashna patrika pathav

 2. Nikhil Rathod says

  दहावीच्या पेपरची लिंक पाठवा

 3. Sanket says

  दहावीच्या पेपरचा टाइम टेबल पाठवा

 4. Sanket says

  दहावीच्या पेपरचा टाइम टेबल पाठवा

 5. Nitin kamble says

  ह्या वर्षी बोर्ड आहे की नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड