डिग्री, अनुभव, काहीच नको; हि मोठी कंपनी देतेय ४० लाखाचं पॅकेज! – smallest ai job openings
smallest ai job openings
एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला CV तयार करावा लागतो. तुम्ही फ्रेशर असाल तर कंपनीत ज्या पदासाठी अर्ज करताय त्याच्याशी निगडीत शिक्षण किंवा कौशल्ये आहेत का याची माहिती द्यावी लागते. अनुभवी असल्यास कुठे काम केलंय, किती वर्षे केलंय याचा तपशील द्यावा लागतो. मात्र बंगळुरूतील एका स्टार्टअप कंपनीने एक जाहिरात दिलीय (smallest ai job openings). कंपनीला क्रॅक्ड फुल स्टॅक इंजिनिअर हवाय. त्यासाठी वर्षाला कंपनी ४० लाख रुपये इतकं पॅकेज देण्यासाठी तयार आहे. स्मॉलेस्ट एआय कंपनीचे सीईओ सुदर्शन कामथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय.
- Bengaluru AI startup goes viral for unique job offer
- The company is offering Rs 40 LPA for “full-stack engineer”
- Includes base pay, ESOPs; 0-2 yrs experience
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्टार्टअप कंपनीने या पॅकेजमध्ये १५ ते २५ लाख बेस सॅलरी आणि १० ते १५ लाख एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन देणार असल्याचं म्हटलंय. या पदासाठी शून्य ते २ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. त्यांचं कॉलेज बॅकग्राउंड काहीही असलं तरी चालेल. एका युजरने म्हटलं की, नवख्या इंजिनिअर्ससाठी ही मोठी संधी आहे. आशा आहे की, चांगल्या प्रतिभावान व्यक्तीला नोकरी मिळेल. तर दुसऱ्या एका युजनरे म्हटलं की, भविष्यात अशाच नोकऱ्या दिल्या जातील. जिथं कौशल्याची खरी पारख होईल.
पारंपरिक रिज्यूम न देता अर्जदारांनी स्वत:ची माहिती १०० शब्दात आणि कामाच्या लिंक ईमेलवर पाठवण्याचं आवाहन कंपनीने केलंय. बंगळुरुतील कार्यालयात हे काम असणार आहे. आठवड्यात पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असणार आहे. तसंच उमेदवाराची लगेच जॉइनिंगची तयारी असावी असंही म्हटलं आहे.
सोशल मीडियावर कंपनीच्या जाहिरातीवर अनेक प्रतिक्रिया आळ्यात. काहींनी जॉब सीकर्सना रेफर केलंय. आतापर्यंत साडे तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी ही जाहिरात पाहिलीय. तर हजारो लोकांनी कमेंट केल्यात. काहींनी कंपनीचं कौतुक केलंय, तर काहींनी सॅलरी पॅकेज कमी असल्याचं म्हटलंय.