Shikshaketar bharti 2026: शिक्षकेतर कर्मचारी भरतीप्रक्रियेस नुकताच हिरवा कंदील राज्य शासनाने दिला असून, कर्मचारी भरती प्रक्रियेचा आकृतिबंध देखील जाहीर केला आहे. परंतु, संच मान्यतेतील निकषांमुळे शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू होण्याअधीच अडचणीत आली असून, केवळ नऊ हजार पदांचीच भरती केली जाणार असल्याचे शिक्षण विभागातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील स्थगिती उठवून नवीन मार्गदर्शक सूचना करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार दि. ११ ऑगस्ट रोजी सरकारने पदभरतीला मान्यता देणारा निर्णय घेतला. संस्थांनी सुधारित आकृतिबंधानुसार मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची संख्या निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु त्यासंदर्भात शाळास्तरावर किंवा शिक्षण विभागाच्या स्तरावर कोणतीही हालचाल झालेली दिसून येत नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये वरिष्ठ लिपीक,कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल, अर्धवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक आदी संवर्गातील पदांचा समावेश आहे. संस्थांनी सुधारित आकृतिबंधानुसार मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची संख्या निश्चित करून बिंदुनामावली तपासणे बंधनकारक आहे. रिक्त पदांसाठी प्रथम पदोन्नतीचा मार्ग अवलंबावा लागेल. पात्र कर्मचारी उपलब्ध नसल्यास पुढील कार्यवाही करता येईल. अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याची खात्री केल्यानंतरच नियमित भरती करता येणार आहे. भरतीप्रक्रियेत आरक्षणाचे नियम आणि संबंधित प्रवर्गनिहाय बिंदुनामावली काटेकोरपणे तपासावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात भरतीसंदर्भात पुढे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
केवळ २५ टक्के पदांवरच भरतीप्रक्रिया :
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लिपीक वर्गीय प्रवर्गात कनिष्ठ लिपीक १६ हजार २९८, वरीष्ठ लिपीक ४ हजार ९०५, तर मुख्य लिपीक ९८८ अशी २२ हजार १९१ पदे मंजूर आहेत. ग्रंथपाल प्रवर्गात अर्धवेळ ग्रंथपाल २ हजार ८७४ आणि पूर्णवेळ ग्रंथपाल २ हजार ३१ अशी ४ हजार ९०५ पदे मंजूर आहेत. तर, प्रयोगशाळा सहायक प्रवर्गात प्रयोगशाळा सहाय्यक ५ हजार ८९३, तसेच प्रयोगशाळा सहायक विज्ञान शाखेसह उच्च माध्यमिक विद्यालयासाठी २ हजार ४० पदे अशी एकूण ३५ हजार २९ पदे मंजूर आहेत. यातील ५० टक्के पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तर, संचमान्यतेमधील निकषांमुळे तब्बल २५ टक्के पदे अतिरिक्त झाली आहेत. त्यामुळे जरी भरती प्रक्रिया राबविण्यात आली तरी केवळ २५ टक्के पदांवरच राबविली जाणार आहे. यातून साधारण ९ हजारांवर पदभरती राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्थेच्या व्यासपीठावरून शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दूरगामी घोषणा केल्या आहेत. येत्या दोन महिन्यांत ‘पवित्र पोर्टल’द्वारे राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची महाभरती पूर्ण केली जाणार असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे अधिकार थेट संबंधित शिक्षण संस्थांनाच देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मेगाभरतीत कला व क्रीडा शिक्षक, माजी सैनिक आणि खेळाडूंना विशेष प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, शैक्षणिक गुणवत्तेला नवे वळण देत चालू वर्षापासून सीबीएसईसह सर्व माध्यमांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास २ पानांत आणि ७० हून अधिक स्थानिक महापुरुषांचा इतिहास समाविष्ट करण्याचा मोठा निर्णयही त्यांनी जाहीर केला.
शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या प्रमुख ६ महत्त्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे:
- ३० हजार शिक्षकांची महाभरती: येत्या दोन महिन्यांत ‘पवित्र पोर्टल’च्या (Pavitra Portal) माध्यमातून राज्यात तब्बल ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामध्ये कला व क्रीडा शिक्षक, माजी सैनिक आणि खेळाडूंना विशेष प्राधान्य दिले जाईल.
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती: खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या (Non-Teaching Staff) भरतीला शासनाने मंजुरी दिली असून ही भरती प्रक्रिया थेट संबंधित शिक्षण संस्थांनाच पार पाडावी लागणार आहे.
- अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास: चालू शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई (CBSE) बोर्डासह सर्व माध्यमांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास २ पानांमध्ये समाविष्ट केला जाईल. तसेच महाराष्ट्रातील ७० हून अधिक स्थानिक महापुरुषांची माहितीही पाठ्यपुस्तकांत आणली जाईल.
- राज्यगीत आणि मराठी भाषा अनिवार्य: सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे आणि राष्ट्रगीतानंतर ‘गर्ज़ा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- नाशिकमध्ये क्रीडा प्रबोधिनी व स्पर्धा परीक्षा केंद्र: नाशिक येथे क्रीडा प्रबोधिनी आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी शासकीय तसेच सीएसआर (CSR) निधीतून पूर्ण सहकार्य केले जाईल.
- ‘कोल्हापूर पॅटर्न’ लागू होणार: शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी राज्यात ‘कोल्हापूर पॅटर्न’सह विविध उपक्रम राबवले जातील. तसेच शिक्षण विभागाला एसएमएसद्वारे (SMS) प्राप्त होणाऱ्या सकारात्मक सूचनांची दखल घेतली जाईल.
विद्यार्थ्यांचे कौतुक आणि पालकांना महत्त्वाचे आवाहन
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देताना भुसे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक केशव गावित आणि तेथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याचे कौतुक केले. तो विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हातांनी (मराठी व इंग्रजी) लिहू शकतो आणि त्याला १२०० ते १५०० पर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत, असे सांगत त्यांनी मविप्र संस्थेच्या शैक्षणिक प्रवासाचाही गौरव केला. शेवटी, पालकांनी मुलांचा मोबाईल वापर नियंत्रित करावा आणि दररोज किमान अर्धा ते एक तास मुलांशी संवाद साधावा, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले.
Shikshaketar Karmachari Bharti 2026 – शाळेत नोकरीचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे! आपल्या महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील स्थगिती अखेर उठली आहे. राज्य सरकारने कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या तीन संवर्गांतील एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. ११ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून (shikshaketar bharti 2026), यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नोकरभरतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या तीन संवर्गांतील पदे भरता येणार आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. या मुले मोठ्या प्रमाणात १२ वी पास, पदवीधर उमेदवारांना नोकऱ्या मिळणार हे मात्र निश्चित!!

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील स्थगिती उठवून नवीन मार्गदर्शक सूचना करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी सरकारने पदभरतीला मान्यता देणारा निर्णय घेतला. संस्थांनी सुधारित आकृतिबंधानुसार मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची संख्या निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करावी लागणार आहे.रिक्त पदे भरण्यापूर्वी पदोन्नतीचा मार्ग अवलंबणे बंधनकारक आहे. पात्र कर्मचारी उपलब्ध नसल्यास पदोन्नतीची पदे शिल्लक ठेवून अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करावी लागेल. त्यानंतर उर्वरित पदे भरता येतील. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांची कार्यवाही पूर्ण असणे आवश्यक आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या तीन संवर्गांतील पदांचा समावेश आहे. संस्थांनी सुधारित आकृतिबंधानुसार मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची संख्या निश्चित करून बिंदूनामावली तपासणे बंधनकारक आहे. रिक्त पदांसाठी प्रथम पदोन्नतीचा मार्ग अवलंबावा लागेल. पात्र कर्मचारी उपलब्ध नसल्यास पुढील कार्यवाही करता येईल. अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याची खात्री केल्यानंतरच नियमित भरती करता येणार आहे. भरती प्रक्रियेत आरक्षणाचे नियम आणि संबंधित प्रवर्गनिहाय बिंदूनामावली काटेकोरपणे तपासावी लागणार आहे. ‘शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या मागणीसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करताना कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांची ठामपणे मांडणी केली. पाच ऑगस्ट रोजी प्रधान सचिवांसोबत झालेल्या बैठकीतही हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित केला. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी पदे भरण्यास मान्यता देणारा निर्णय आला. शाळेतील प्रशासकीय कामे आणि विद्यार्थी हितासाठी या कर्मचाऱ्यांची नितांत गरज होती. हा निर्णय राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे,’ असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाचे सरचिटणीस शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















