Shikshak Bharti Document Verification List of Documents
Shikshak Bharti Document Verification 2026: Candidates selected in the Pavitra portal will be informed about document verification through e-mail and also on the official website of Zilla Parishad. If there is any difficulty regarding the selection of candidates, the application along with strong evidence can be submitted to the email. Download District Wise Shikshak Bharti Document Verification List.
‘पवित्र पोर्टल’द्वारे होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांच्या कागदपत्र पडताळणीला सुरुवात झाली आहे. २ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान कागदपत्र तपासणी आणि पात्र उमेदवारांची समुपदेशनाद्वारे पदस्थापना पूर्ण केली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे १३ हजार पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माध्यमिक स्तरावर २३ शिक्षकांची भरती होणार असून, अतिरिक्त शिक्षकांमुळे प्राथमिक स्तरावर एकही पद भरले जाणार नाही. शिक्षक पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांसाठी पवित्र पोर्टलमार्फत शिफारस करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला बुधवार पासून सुरुवात होणार आहे. दोन सप्टेंबर ते ११ सप्टेंबरपर्यंत कागदपत्र पडताळणी ते पात्र उमेदवारांना पदस्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी कार्यालयांनी कागदपत्र तपासणीचे नियोजन केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या प्रक्रियेतून खासगी शाळांवर २३ नवीन शिक्षक येणार आहेत. प्राथमिक स्तरावरील तर एकही जागा जिल्ह्यात भरली जाणार नाही.
राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीशिवायची १९ हजार ८८१ तर मुलाखतींसह १० हजार ३२८ पदे भरली जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात सुमारे तेरा हजार पदे मुलाखतीशिवायची भरली जाणार आहेत. त्यात मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या शाळांतील रिक्त जागांसाठी निवडीसाठीची शिफारस केलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करून पात्र उमेदवारांची सात सप्टेंबर ते ११ सप्टेंबरपर्यंत पदस्थापनेबाबत समुपदेनशाची प्रक्रियाही पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे अकरा दिवसांत नवीन शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रियाही पूर्ण होणार आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५’ मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पदभरतीची प्रक्रिया होत आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, महापालिका, आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतनसह खासगी शाळांचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची १४ हजार ३२०, सहावी ते आठवी १० हजार १२, नववी ते दहावी पाच हजार ५१३ तर कनिष्ठ महाविद्यालयस्तरावरील ३६४ पदे आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात सुमारे तेरा हजार पदांवर नियुक्ती होईल, यानंतर प्रक्रियेचा पुढील टप्पा असेल असे अधिकारीसूत्रांनी सांगितले.
शिक्षक पदभरती प्रक्रियेत या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माध्यमिक स्तरावर २३ जागांवर पदभरती होणार आहे. प्राथमिक स्तरावर एकही पदभरती या प्रक्रियेत नाही, असे अधिकारीसूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठी आहे. पाचशेपेक्षा अधिक प्राथमिकस्तरावरील शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत एकही पद नसल्याचे सांगण्यात येते. माध्यमिक स्तरावर जिल्हा स्तरावर कागदपत्र तपासणीचे नियोजन करण्याचे काम सोमवारी सुरू होते.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिल्यानुसार पवित्र पोर्टल प्रणालीतर्गत शासनाने शिफारस केलेल्या शिक्षक पदभरतीतील एकुण ५१० उमेदवारांची निवड यादी कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्यानुषंगाने शिफारस पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक ०२/०९/२०२६ ते दिनांक ०४/०९/२०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्रात नोंदविलेल्या माहितीची सर्व मुळ कागदपत्रे व इमेलवर अलाहीदा देण्यात येणा-या तपासणी सुचीप्रमाणे साक्षांकित प्रतिसह खालीलप्रमाणे नियोजनानुसार वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद यवतमाळ येथे सकाळी ठिक १०.०० वाजता स्वतः उपस्थित राहुन कागदपत्रे पडताळणीची कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी. सदर पडताळणी कालावधीत संबंधित उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरीता उपस्थित न राहील्यास संबंधित उमेदवारांची अनुपस्थिती राज्य स्तरावर कळविण्यात येईल व अनुपस्थिती बाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी.
| पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक. | पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक. | 31/08/2026 | 04/09/2026 | पहा (630 KB) निवड झालेल्या उमेदवारांची यादी (2 MB) |
पवित्र पोर्टल अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सुचित करण्यात येते की लवकरच मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. कार्यालयीन वेळेन तरी पवित्र पोर्टल व्दारे निवड झालेल्या सोबत दिलेल्या यादीतील सर्व उमेदवारांनी पुढील प्रकाशित होणाऱ्या वेळापत्रकाप्रमाण आपल्या पात्रतेसंबंधी आवश्यक सर्व मुळ कागदपत्रासह तपासणी कक्षात उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाहो पूर्ण करुन घ्यावयाची लागेल. संबंधित पात्र उमेदवार पडताळणी कालावधीत पडताळणीसाठी उपस्थित न राहील्यास संबंधित उमेदवाराची अनुस्थिती राज्यस्तरावर कळविण्यात येईल व त्यानुसार पुढील आदेशाप्रमाणे पदस्थापनेबाबत कार्यवाही करण्यात येईल. उमेदवाराच्या अनुपस्थितीबाबतची सर्व जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी. पात्र उमेदवारांनी पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध करुन द्यावी व एक संच झेरॉक्स आपल्या पासपोर्ट साईज फोटोसह सादर करणे आवश्यक राहील. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
: पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी सूची :
1.उमेदवाराने पोर्टलवर भरलेले स्वप्रमाणपत्र
2. महिला उमेदवारांचे बाबतीत लग्नानंतरचे नाव (विवाह निबंधक शासन राजपत्र)
3. आधार क्रमांक व नागरिकत्व
4. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याबाबत तहसीलदार यांचा दाखला (Domicile Certificate)
5. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांमधील रहिवासी असल्याबाबत तहसीलदार यांचा दाखला
6. मूळ जात व प्रवर्ग (उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र)
7. जात वैधता प्रमाणपत्र (विभागीय जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र
8. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) (उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र)
9. वयाबाबत सादर करण्यात आलेला पुरावा (शालांत परीक्षा प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला)
10. शालांत परीक्षा प्रमाणपत्र (S.S.C) गुणपत्रक व प्रमाणपत्र
11. उच्च माध्यमिक परीक्षा (H.S.C.) गुणपत्रक व प्रमाणपत्र (इयत्ता 1 ली ते 5 वी पदासाठी)
12. डी.एड./डी.टी.एड. / टी.सी.एच. बेळगाव गुणपत्रक व प्रमाणपत्र
13. पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र (इयत्ता 6 वी ते 10 वी गटातील पदांसाठी)
14. पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (इयत्ता 11 वी ते 12 वी गटातील पदांसाठी)
15. बी.ए.एलएड / बी.एस्सी एड / बी.एड / बी.पी.एड (फक्त शारीरिक शिक्षण विषयासाठी)
16. शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET)
: पहिली ते पाचवी गटासाठी टीईटी/सिटीईटी पेपर 1 उत्तीर्ण आवश्यक आहे.
सहावी ते आठवी गटासाठी गणित, विज्ञान व गणित-विज्ञान या विषयांच्या पदांसाठी उत्तीर्ण असणे आवश्यक टीईटी / सिटीईटी पेपर-2 उत्तीर्ण आवश्यक आहे.
सहावी ते आठवी गटासाठी भाषा-(मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड इत्यादी) या विषयांच्या पदासाठी टीईटी / सीटीईटी पेपर 2 गणित विज्ञान अथवा सामाजिकशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक
TAIT (अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी गुणपत्रक) 17.
18. संगणक हाताळणी प्रमाणपत्र (MSCIT)
19. दिव्यांग आरक्षण तपशील
20. समांतर आरक्षणाचा प्रकार (महिला /माजी सैनिक / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अंशकालीन कर्मचारी / अनाथ / दिव्यांग (सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र जोडावे.
21. उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य आहे काय (सक्षम प्राधिकरण दिलेले प्रमाणपत्राची प्रत)
22. उमेदवार शासकीय कर्मचारी आहे काय? (नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेले परवानगी पत्र सादर करावे)
23. उमेदवार विवाहित असल्यास लहान कुटुंबाचे घोषणापत्र जोडण्यात यावे. (शासन अधिसूचना २८ मार्च २००५ अन्वये)
24. उमेदवार पेसा क्षेत्रात मोडत असल्यास पुरावा (प्रकल्प अधिकारी रहीवासी दाखला)
(उमेदवारांच्या पदनिहाय नियुक्तीसाठी ज्या कागदपत्रांची गरज आहे, त्या सर्व कागदपत्रांचे दोन संच (झेरॉक्स सेट), 2 कलर पासपोर्ट आणि मुळ दस्ताऐवज सोबत आणावे)
Pune DV Shikshak Bharti List

Shikshak Bharti Maharashtra Document Verification Date

List Of Documents Required for Shikshak Bharti 2026 – कागदपत्राचा तपशिल
Following is a list of documents required for Shikshak Bharti 2026
- पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्व प्रमाणपत्रांची प्रत (certified copy) मूळ प्रत फोटो स्वाक्षरीसह
- शैक्षणिक अर्हता
- एस.एससी.गुणपत्रीका
- एच.एस.सी प्रमाणपत्र
- एच.एस.सी गुणपत्रिका
- एच.एस.सी प्रमाणपत्र
- पदवी परीक्षा गुणपत्रक (संबंधित विषयात किमान ५०% गुणासह उत्तीर्ण
- पदवी परीक्षा प्रमाणपत्र
- पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक
- पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र
- व्यावसायिक अर्हता
- शिक्षणशास्त्र पर्दायका गुणत्रिका Ded /D.led./D.T.ed/T.c.h.
- शिक्षणशास्व पदविका प्रमाणपत्र Ded /D.led./D.T.ed./T.c.h.
- शिक्षणशास्व पदवी गुणपत्रक B.ed /B.led./B.sc.ed.
- शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्र B.ed /B.led./B.sc.ed.
- एम.एस.सी. आय.टी प्रमाणपत्र (MSCTT)
- इ.१ ते ५ वी या गटासाठी उमेदवार (T.E.T) /CTET) पेपर क्र.१ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ. ६ ते ८ वी या गटासाठी गणित, विज्ञान व गणित – विज्ञान या विषर्याच्या पदासाठी (T.ET) /CTET) पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ. ६ ते ८ वी या गटासाटी इतिहास, भुगोल व सामाजिक शास्त्र या विषयांच्या पदासाठी (T.E.T) /CTET) क्र.२ सामाजिक शास्त्र विषय घेवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ. ६ ते ८ वी या गटासाठी भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड ई) या विषयांच्या पदासाटी (T.E.T) /CT TET) पेपर क्र.२ विज्ञान व गणित अथवा सामाजिक शास्त्र विषय घेवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक (TAIT) गुणपत्रक किंवा यादी
- इतर आवश्यक कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र (ST अनिवार्य)
- नान क्रिमीलेयर प्रमाणपत्र (SC, ST वगळून)
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा पत्र
- शाळा सोडल्याचा दाखला (TC)
- जन्म प्रमाणपत्र ( शालांत प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) दि.१६.१०.२०२३ रोजीचे बय
- महाराष्ट्रातील रहिवासी असलेला अधिवास दाखला (सीमा भागातील गावातील असल्यास रहिवासी दाखला)
- आधारकार्ड/पासपोर्ट / पॅन कार्ड / ड्रायव्हिग लायसन्स
- अपंगत्वाचा दाखला (संगणकीय प्रणालीमार्फत वितरित प्रमाणपत्र) (किमान ४० टक्के दिव्यांग)
- माजी सैनिक दाखला
- खेळाडू प्रमाणपत्र ( विभागीय क्रिडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा प्रस्ताव दाखला पोहचपावती)
- प्रकल्पग्रस्त दाखला
- भूकंप ग्रस्त दाखला
- अनाथ प्रमाणपत्र
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- १९९१ जनगणना/१९९४ निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र
- अशंकालीन कर्मचारी प्रमाणपत्र (सक्षम प्राधीकारी तहसिलदार प्रमाणपत्र)
- विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र
- हमीपत्र (सादर केलेले दस्तऐवज वैद्य असल्याबाबतचे हमीपत्र)
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















