SBI Mega Bharti 2026 – आपण जर बँकेत नोकरी शोधत असत तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लंबकरच SBI सारख्या नामांकित बँकेत मोठ्ठी भरती सुरु होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चालू आर्थिक वर्षात सुमारे ११ ते १२हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असून आपल्या शाखांचे जाळे विस्तारणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी दिली. शेट्टी म्हणाले, बँक या आर्थिक वर्षात लिपिक आणि अधिकारी स्तरावर सुमारे ११ ते १२ हजार नियुक्त्या करणार आहे. याव्यतिरिक्त, बँक २०० ते २५० नवीन शाखा उघडण्याची योजना आखत आहे. ते म्हणाले, सेवानिवृत्ती आणि नवीन गरजांनुसार ही संख्या थोडी वाढू किंवा कमी होऊ शकते, परंतु आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे १२ हजार लोकांची भरती होण्याची त्यांना अपेक्षा आहे. ते म्हणाले, बँकेने गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर भरती केली होती, ज्यात १,५०० विशेषज्ञ माहिती तंत्रज्ञान (IT) अधिकाऱ्यांचा समावेश होता.

यावर्षी आयटी क्षेत्रात इतक्या मोठ्या संख्येने भरतीची गरज नाही. मार्च २०२६ पर्यंत, SBI च्या कर्मचाऱ्यांची संख्या २.४५ लाखांपेक्षा अधिक झाली होती. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, एसबीआयने २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण २५,६३३ कर्मचाऱ्यांची भरती केली. शेट्टी म्हणाले, मोठे शाखांचे जाळे असूनही, देशाच्या अनेक भागांमध्ये बँकेला विस्तारासाठी अजूनही वाव आहे. बँकेला नवीन वसाहतींमध्ये तसेच व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय जिल्ह्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवायची आहे. ते म्हणाले, बँक काही शाखांचे सुसूत्रीकरणही करत आहे आणि असे असूनही, शाखांची संख्या दरवर्षी अंदाजे २०० ते २५० ने वाढण्याची अपेक्षा आहे.
SBI (State Bank of India) मध्ये लिपिक (Clerk / Junior Associate) पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)असणे आवश्यक आहे. कला (Arts), वाणिज्य (Commerce), विज्ञान (Science) किंवा अभियांत्रिकी (Engineering) यांसारख्या कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतात. याशिवाय, पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी देखील या पदासाठी अर्ज करू शकतात, परंतु अंतिम निवड प्रक्रियेपूर्वी किंवा बँकेने दिलेल्या ठराविक तारखेपूर्वी त्यांची पदवी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान (Computer Literacy) असणे आवश्यक आहे, तसेच ज्या राज्यातून अर्ज केला आहे त्या राज्याची स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















