सांगली जिल्हा बँक शिपाई परीक्षा २०२६: अधिकृत उत्तरतालिका जाहीर; Download PDF ! Sangli DCC Bank Result, Answer Key

Sangli DCC Bank Answer Key 2026 Live

Sangli DCC Bank Result, Answer Key 2026: The Sangli District Central Co-Operative Bank Ltd., Sangli has officially published the answer key for the Peon (शिपाई) Written Examination conducted on September 6, 2026, containing the verified correct options for all 70 questions. Candidates wishing to challenge any answers are required to submit their formal objections along with supporting evidence to [email protected] between September 7, 2026, and September 11, 2026, prior to the 5:00 PM deadline, as late submissions will not be considered. Following the conclusion of this grievance submission window, candidates will be granted access to their personal login portals to view their individual response sheets.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक अंतर्गत दि. ०६/०९/२०२६ रविवार रोजी झालेल्या शिपाई पदाकरीता लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न उत्तरांवर काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी त्यांचे आक्षेप [email protected] या ईमेल वर दि. ०७/०९/२०२६ ते ११/०९/२०२६ सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत पुराव्यासहित आक्षेप नोंदविण्यात यावेत. त्यानंतर आलेल्या हरकती / आक्षेपचा विचार केल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. त्यानंतर परीक्षेस उपस्थित उमेदवारांच्या उत्तरपत्रिका त्यांना लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदावर खालील लिंक द्वारे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उत्तरतालिका बघणायसाठी खालील लिंक तपासा. 

Sangli DCC Bank Answer Key Highlights & Summary

  • Organization: Sangli District Central Co-Operative Bank Ltd., Sangli (सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सांगली)
  • Exam Name: Peon Exam 2026 (शिपाई परीक्षा २०२६)
  • Exam Date: Sunday, September 6, 2026
  • Content: Complete official answer key listing correct options (A, B, C, D) for questions numbered 1 through 70.

Click Here To Download Sangli DCC Bank Answer Key PDF


Sangli DCC Bank Result  – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कनिष्ठ लिपिकाच्या ४४४ पदांसाठी तब्बल १८,९२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने भरती प्रक्रियेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर आता लेखी परीक्षा लवकर घेण्यात यावी, अशी मागणी बँक प्रशासनाने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील आयबीपीएस संस्थेकडे केली आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या भरती प्रक्रियेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, लेखी परीक्षेत प्रथमच ‘निगेटिव्ह मार्किंग’ पद्धत लागू केली जाणार आहे. चुकीच्या उत्तरांसाठी गुण कपात होणार असल्याने अंदाजाने उत्तरे देणाऱ्या उमेदवारांना मोठा फटका बसणार आहे.

Sangli DCC Bank Result

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

परिणामी, अभ्यासू, सक्षम आणि गुणवंत उमेदवारांनाच अंतिम निवडीत संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जून महिन्यापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले होते. एकूण ४४४ पदांपैकी ७० टक्के जागा सांगली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी, तर ३० टक्के जागा इतर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांची निवड १०० गुणांच्या निकषावर होणार असून, त्यात लेखी परीक्षा, शैक्षणिक गुणवत्ता आणि मुलाखतीचा समावेश आहे.

मुलाखतीसाठी स्वतंत्र गुण ठेवण्यात आले असून, शैक्षणिक गुणवत्तेला आणि प्रत्यक्ष मुलाखतीलाही समान महत्त्व देण्यात आले आहे. उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अकोला आणि बीड या सहा प्रमुख जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, बँकेतील रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्यासाठी आयबीपीएसकडे लेखी परीक्षा तातडीने घेण्याचा आग्रह धरण्यात आला असून, हजारो उमेदवारांचे लक्ष आता परीक्षेच्या अधिकृत वेळापत्रकाकडे लागले आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी बँक प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून, उमेदवारांमध्येही परीक्षेबाबत उत्सुकता वाढली आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड