Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉमर्स पदवीधरांना मिळणार बँकांत इंटर्नशिप करण्याची संधी! – Pune University Internship Program

Pune University Recruitment 2024

Pune University Recruitment 2024 – Students pursuing bachelor’s degree in commerce in departments and affiliated colleges on the Savitribai Phule Pune University campus will get an opportunity to do internships in urban cooperative banks under Pune University Recruitment 2024. This will boost the confidence of students from rural areas. Students will also be able to experience first-hand how different departments of banks work.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसमधील विभाग तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नागरी सहकारी बँकांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. बँकांमधील विविध विभागांचे काम कसे चालते, याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवही घेता येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाणिज्य विभाग आणि पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्यात करार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे आणि वाणिज्य विभागप्रमुख डॉ. जी. श्यामला यांच्यासह बैंक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल करंजकर आदी उपस्थित होते.

 

पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सहकारी नागरी बँकाचे जाळे असून, त्यातील बहुतांश नागरी बँका या ग्रामीण भागात आहेत. एनईपीनुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमात पदवीच्या विद्यार्थ्यांना किमान दोन महिने इंटर्नशिप करावी लागणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घराजवळील नागरी सहकारी बँकेत काम करता येईल. तसेच या कामाच्या मोबदल्यात विद्यावेतन दिले जाणार आहे.

 


: : Previous Updates : : 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या सुमारे 55 टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठातील विविध विभागांसाठी मंजूर असलेल्या 386 पैकी केवळ 176 पदे भरण्यात आली आहेत.त्यामुळे देशात आघाडीवर असलेल्या पुणे विद्यापीठाला गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीला बंदी असल्याने विद्यापीठाच्या विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठाला प्राध्यापकांवरील ताण कमी करण्यासाठी आणि विद्यापीठातील विभाग सुरू राहण्यासाठी त्यांच्या निधीतून काही प्राध्यापकांची नेमणूक करावी लागत आहे. त्यांच्या वेतनासाठी दरवर्षी सुमारे साडेतीन कोटी रुपयांहून अधिकचा खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे.विद्यापीठाने 100 प्राध्यापकांची कंत्राटी आणि विद्यापीठाच्या निधीच्या आधारे नेमणूक केली आहे. या नेमणुकीवरील होणाऱ्या खर्चाचा भार विद्यापीठाच्या तिजोरीवर पडत आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहायक ग्रंथपाल अशी एकूण 42 पदे मंजूर करण्यात आली आहेत.

परंतु, यापैकी केवळ 20 जागा भरण्यात आल्या आहेत.राज्यातील विद्यापीठ, प्राध्यापकांच्या संघटनांनी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी प्राध्यापक भरती सुरू करावी, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे वारंवार केली आहे. मात्र राज्य शासनाकडून केवळ आश्वासन होत असून, त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू करावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.


पुणे विद्यापीठ येथे संशोधन सहाय्यक, संशोधन सहकारी, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संशोधन सहाय्यक, संशोधन सहकारी, सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता –
    • संशोधन सहाय्यक पदाकरिता – डॉ. जी. किशोर कुमार, सहाय्यक प्राध्यापक, वातावरणीय व अवकाश विज्ञान विभागातील सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे ४११००७
    • ई-मेल पत्ता – kishoreg@unipune.ac.in
    • सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता – मुख्य विभाग इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे ४११००७
    • संशोधन सहकारी पदाकरिता – सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे ४११००७
    • ई-मेल पत्ता – cpesppu@gmail.com
    • संशोधन सहाय्यक पदाकरिता – संचालक आंतरशासित विज्ञान प्रशाले, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे ४११००७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • संशोधन सहाय्यक पदाकरिता – ७ ऑक्टोबर २०१९
    • सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता – ३० सप्टेंबर २०१९
    • संशोधन सहकारी पदाकरिता – १० ऑक्टोबर २०१९
    • संशोधन सहाय्यक पदाकरिता- १० ऑक्टोबर २०१९
  • महत्वाच्या लिंक्स –

 अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड