Pune Mahsul Vibhag Bharti Update
राज्याच्या महसुलात सर्वाधिक योगदान देणाऱ्या पुणे शहरातील दस्तनोंदणी विभागात अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या आर्थिक वर्षात दस्तनोंदणीतून राज्य सरकारला तब्बल १०,८५१ कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या पुण्यातील २७ दस्तनोंदणी कार्यालयांपैकी २१ कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधकांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांच्या कामकाजावर परिणाम होत असून प्रशासनावरील ताणही वाढला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील मालमत्ता व्यवहारांच्या वाढत्या प्रमाणामुळे दस्तनोंदणी विभागावर मोठी जबाबदारी आहे. राज्यात गेल्या आर्थिक वर्षात दस्तनोंदणीतून ६१,२८२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असून त्यातील सुमारे १८ टक्के म्हणजेच १०,८५१ कोटी रुपयांचा वाटा पुणे शहराचा आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातून आणखी २,५०३ कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.
मात्र एवढ्या मोठ्या महसूल संकलनानंतरही विभागातील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील २७ कार्यालयांपैकी आधीच १८ दुय्यम निबंधकांची पदे रिक्त होती. त्यात अलीकडील बदल्यांनंतर आणखी तीन पदे रिक्त झाल्याने ही संख्या २१ वर पोहोचली आहे. अनेक कार्यालयांचा अतिरिक्त पदभार वरिष्ठ लिपिकांकडे सोपविण्यात आला असून त्यांना महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने फाईलींचा निपटारा विलंबाने होत आहे.
दरम्यान, सह जिल्हा निबंधक (वर्ग-१) पदही रिक्त असून त्या ठिकाणी अद्याप नवीन नियुक्ती झालेली नाही. तसेच सह जिल्हा निबंधक (वर्ग-२) अधिकाऱ्याची दुय्यम निबंधक पदावर बदली करण्यात आल्याने वरिष्ठ स्तरावरील मनुष्यबळाची कमतरता अधिकच तीव्र झाली आहे.
मुंढवा, ताथवडे आणि शिवाजीनगर परिसरातील शासकीय जमिनींच्या गैरव्यवहारांची प्रकरणे याच दस्तनोंदणी कार्यालयांमधून उघडकीस आली होती. अशा संवेदनशील व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती आवश्यक असल्याचे मत विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून देणाऱ्या पुण्यातील दस्तनोंदणी कार्यालयांमधील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Pune Talathi Recruitment 2026
पुणे महसूल प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक यासारखी १८४ पदे गेल्या काही काळापासून रिक्त आहेत (Pune Talathi Bharti 2026) . जिल्ह्यातील महसूल प्रशासनात एकूण १ हजार ८८१ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये मंडल अधिकारी, सहायक महसूल अधिकारी (अव्वल कारकून) महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), वाहनचालक तसेच ड वर्गातील शिपाई अशी विविध पदे जिल्हा प्रशासनासह महसूल विभागात कार्यरत आहेत. या कर्मचा-यांवर नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या विविध प्रस्तावांवर कार्यवाही करण्याचे काम मंडळ अधिकाऱ्यांसह अव्वल कारकून करतात. मात्र, स्थानिक पातळीवर त्या प्रकरणाचा अहवाल देणे, पंचनामे करणे यांसारखी छोटी वाटणारी पण महत्त्वाची कामे करण्यासाठी तलाठी आवश्यक असतो. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पुणे जिल्ह्यात १ हजार ८८१ पैकी सद्यःस्थितीत १ हजार ६९७ पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी सध्या १८४ पदे ही रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कामे करणारी सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्यासह शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. त्यांचीच पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ‘पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदांचा सरकारकडून आढावा घेतला जातो. त्यांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यामुळे सरकार कधी भरती करेल हे आताच सांगता येणार नाहीं’, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तलाठी भरती २०२६ महत्वाच्या लिंक्स :
- तलाठी भरती २०२६ परीक्षेचे नवीन सिलॅबससाठी येथे क्लिक करा
- तलाठी भरती TCS पद्धतीनुसार मोफत मोक टेस्ट २०२६
- तलाठी भरतीची तयारी कशी कराल? – How To Prepare For Talathi Bharti Exam ?
- तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे कोणती?
- नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार
- तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा
- तलाठी भरती नवीन TCS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२६ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
Educational Qualification For Pune Talathi Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| तलाठी (महसूल विभाग) | जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|
Salary Details For Pune Talathi Bharti 2026 Online Form
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| तलाठी | s8 : 25,500 – 81,100 + Others |
How To Apply For Pune Talathi Jobs 2026
- तलाठी भरती 2026 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
- ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Pune Talathi 2026 Recruitment
- तलाठी भरती 2026 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
तलाठी भरतीसाठी महत्वाचे मुद्दे:
- या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
- या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mahabhumi.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















