राज्यात आदर्श पोलीस प्रशासन उभं करण्या साठी लोकसंख्येनुसार पोलीसांची संख्या ठेवली जाणारच. त्यासाठीच गृह विभागानं नव्यानं ४० हजार पोलीसांची भरती केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुढंही पोलीस भरतीलाच प्राधान्य देण्यात येणार, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस हे सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं बांधलेल्या तीन नव्या इमारतींच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. त्याचबरोबर पोलीस निवासस्थान इमारतीचंही भूमिपूजन करण्यात आलं. पुढील काही दिवसात लवकरच मोठी पोलीस भरती महाराष्ट्र अपेक्षित आहे.

कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, जयंत पाटील, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, अमल महाडिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सत्यम गांधी, पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा, डॉ. शशिकांत माहवरकर, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे राज्यात ९४ हजार निवासस्थाने उभारली गेलेली आहेत. प्रत्येक जिल्ह्याला फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली जात आहे. महाराष्ट्र पोलीस सायबर गुन्ह्यांच्या तपासात देशात अग्रेसर आहेत. अंमली पदार्थ प्रकरणात पोलीस दोषी आढळल्यास त्याला थेट बडतर्फ केलं जाईल, अशी तंबी त्यांनी दिली. अंमली पदार्थांबाबतीत शून्य सहनशीलतेची भूमिका असेल, असं स्पष्ट केलं.
“राज्यात गुन्हेगार मोकाट फिरणार नाही, असा विश्वास जनतेला वाटायला हवा,” असं सांगताना त्यांनी पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल विशेष कौतुक केलं.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या पोलीस दलाला सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कायदा व सुव्यवस्था राखणं ही प्राधान्याची बाब असून ड्रग्स विरोधी मोहिम राबवली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेली २.१३ कोटींची १६ वाहने, १५० संगणक, १५० स्कॅनर आणि ४० मल्टी फंक्शन प्रिंटर सायबर विभागास दिली. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन इमारत, कडेगाव व आटपाडी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारती, आणि सांगलीतील २२४ सदनिकांचं भूमिपूजन केलं.
जिल्ह्यात ६ उपविभाग आहेत. सांगली आणि मिरजसाठी सदनिका मंजूर झाल्या आहेत. नव्या पोलीस मुख्यालयात आधुनिक कार्यालयं, प्रशिक्षण हॉल, गुन्हे अन्वेषण विभाग, कर्मचारी वसतिगृह अशी सर्व सुविधा आहेत.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं की, या सुविधांमुळं कायदा-सुव्यवस्थेच्या कामात अधिक कार्यक्षमता येणार आहे.
नव्या प्रशासकीय इमारतीत सुसज्ज कार्यालय, शाखा विभाग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, दिव्यांगांसाठी सुलभता, ग्रीन बिल्डिंग रचना यांचा समावेश आहे.
इमारत ४ मजली असून ५२४४ चौ.मी. क्षेत्रफळात उभी आहे. १४.३४ कोटी रुपये खर्च आला आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पोलीस व नागरिक उपस्थित होते. आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी केलं.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















