महत्वाचे-पॉलिटेक्निक प्रवेशासाठी २६ जूनपर्यंत मुदतवाढ -Polytechnic Admissions 2025 Updates
Polytechnic Admissions 2025 Updates
तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे सुरु असलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेससाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १६ जून होती. ही मुदत संपल्याने विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे उशिरा मिळत असल्याने संचालनालयाने अर्ज करण्यासाठी २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल १ लाख २८ हजार १०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख १० हजार उमेदवारांनी शुल्क भरून अर्ज सादर केले आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यात ४०० संस्थांत सुमारे १ लाख ५ हजार प्रवेश जागा आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत १६ जूनपर्यंत होती. विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी दिनांक २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा हा वाढता कल आणि प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेता, कोणताही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. यानुसार, आता विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र पॉलिटेक्निक प्रवेश 2025-26 :
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं पॉलिटेक्निक प्रवेश नियमान मध्ये सुधारणा करत, आता इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आणि फार्मसी कोर्सेस साठी तीन ऐवजी चार फेऱ्या घेतल्या जाणार. याचा निर्णय सरकारनं नुकताच घोषित केला. ह्या नव्या नियमानुसार AICTE, PCI आणि आर्किटेक्चर कौन्सिल च्या अखत्यारित येणाऱ्या संस्थांमध्ये हे नियम लागू होतील
तांत्रिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र प्रवेश 2025-26:
या नव्या शासन निर्णयात म्हणलं गेलंय की इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आणि फार्मसी कोर्सेस साठी सामायिक प्रवेश प्रक्रिया फेरीचं (कॅप) नवीन स्वरूप ठरवलं गेलं आहे.
पॉलिटेक्निक प्रवेश 2025 महाराष्ट्र: संस्थात्मक कोटा बाबत:
या कोट्यातल्या आणि कॅप नंतर रिकाम्या राहिलेल्या जागांवर अॅडमिशन ऑनलाईन पद्धतीनंच व्हावं लागणार. संस्था पात्र उमेदवारांची यादी, गुणवत्ता यादी, आणि प्रवेशाचं वेळापत्रक सगळं वेबसाईटवर टाकावं लागेल.
कोणाला आधिक प्राधान्य मिळणार?
कॅप नंतर रिकाम्या राहिलेल्या जागा आधी त्या त्या प्रवर्गासाठी राखीव राहतील. तिथंही जर भरल्या गेल्या नाहीत, तर गुणवत्ता आधारे त्या भरल्या जातील. त्यात राज्यातील उमेदवारांना आधिक प्राधान्य दिलं जाणार.
फी परतावा नियम:
प्रवेश रद्द करायचाय तर ऑनलाईन अर्ज लागतो. शेवटच्या तारखेच्या आत केलं, तर हजार रुपये वजा करून बाकीचे पैसे परत मिळतील. पण जर अंतिम मुदतीनंतर रद्द केलं, तर काहीच परत मिळणार नाही.
पॉलिटेक्निक प्रवे जागा रद्द समजली जाईल आणि उमेदवार पुढच्या फेरीसाठी अपात्र ठरेल.