Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्त्वाचे – राज्यात ‘पीआय’ची एक हजार रिक्त पदे | Police Inspector Bharti 2024

Police Inspector Bharti 2024

Maharashtra Police Inspector Bharti 2024

Police Inspector Bharti 2024: Although there are various posts in the police department, mainly the post of police inspector is considered important. The administration of police stations, maintenance of law and order, investigation of crimes, arrest of the accused etc. are done by the person in this position. According to the seniority list of January 1, 2023, there are a total of three thousand 280 police inspectors in the state. A total of 143 Police Inspectors were promoted as Assistant Commissioner of Police, DYSP on 23 May 2023. Also on 17th March and 10th August 2023, 10 total 13 promotions were done. Besides, 104 officers were promoted on October 13. Therefore, the total number of promoted police inspectors is 260 and 146 police inspectors retired between January and August 2023. Also the total number of promotions and retirees is 406. A total of 3,692 police inspectors have been sanctioned in the state police force, including 1,893 posts in zones, 851 in commissionerates and 948 in other departments. Around 50 officers also retired from November 2023 to March 2024. On 16 March 2024, 168 API cadre officers were promoted as PIs. Looking at the number of working, retired and promoted people today, it is revealed that there are about one thousand posts of police inspectors vacant. Large number of PI posts are vacant compared to sanctioned posts. Vacancies of police inspectors, who are the main post of maintaining law and order in Maharashtra, will put pressure on the working officers during the Lok Sabha elections

महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे प्रमुख पद असलेल्या पोलीस निरीक्षकांची तब्बल तब्बल एक हजारांवर पदे रिक्त असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत विविध कारणातून रिक्त झालेली पोलीस निरीक्षकांची पदे भरण्याबाबत सरकारने ठोस पावलेच उचलली नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचाही बिगूल वाजल्याने रिक्त पदांमुळे कार्यरतांचा चांगलाच कस लागणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस खात्यात विविध पदे असली तरी प्रामुख्याने पोलीस निरीक्षक हे पद महत्त्वाचे मानले जाते. पोलीस ठाण्यांचा कारभार, कायदा व सुव्यवस्था राखणे गुन्ह्यांचा तपास करणे, आरोपींना अटक करणे आदी कामे या पदावरील व्यक्तीमार्फतच होते. राज्यात १ जानेवारी २०२३ च्या सेवा ज्येष्ठता यादीनुसार एकूण तीन हजार २८० पोलीस निरीक्षक आहेत. २३ मे २०२३ रोजी एकूण १४३ पोलीस निरीक्षकांचे साहाय्यक पोलीस आयुक्त, डीवायएसपी म्हणून प्रमोशन झाले. तसेच १७ मार्च व १० ऑगस्ट २०२३ रोजी १० असे एकूण १३ प्रमोशन झाले. शिवाय १३ ऑक्टोबर रोजी १०४ अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले. त्यामुळे एकूण प्रमोशन झालेल्या पोलीस निरीक्षकांची संख्या २६० तर जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या दरम्यान १४६ पोलीस निरीक्षक निवृत्त झाले. तसेच प्रमोशन आणि निवृत्तांची  एकूण  संख्या ४०६ इतकी आहे. राज्याच्या पोलीस दलात परिक्षेत्रात एक हजार ८९३, आयुक्तालये ८५१ आणि इतर विभाग ९४८ अशी एकूण तीन हजार ६९२ पोलीस निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंतदेखील अंदाजे ५० अधिकारी निवृत्त झाले. १६ मार्च २०२४ रोजी १६८ एपीआय संवर्गातील अधिकाऱ्यांना पीआय म्हणून प्रमोशन देण्यात आले. आजरोजी कार्यरत, निवृत्त व प्रमोशन झालेल्यांची संख्या पाहता तब्बल एक हजारांवर पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याचे समोर येत आहे. मंजूर पदाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पीआयच्या जागा रिक्त आहे. महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे प्रमुख पद असलेल्या पोलीस निरीक्षकांची रिक्त पदे लोकसभा निवडणुकीत कार्यरत अधिकाऱ्यांवर ताण आणणारी ठरणार आहे

५१० ‘एपीआय’मध्ये नाराजीचा सूर

राज्यात एक ते दीड वर्षांपासून ‘एपीआय टूपीआय ‘प्रमोशनचा प्रश्न अधांतरी सापडल्याचे दिसत आहे. प्रमोशन अपेक्षित असलेल्या एपीआयची संख्या ८०० ते हजारच्या घरात आहे. मात्र ६७८ एपीआय प्रमोशनसाठी पात्र ठरवण्यिात आले. त्या-त्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून माहिती मागवून मोठा अवधी झाला. परंतु वारंवार बैठका झाल्यानंतरही या पात्र एपीआय संवर्गातील अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन देण्यात आलेले नाही. साहाय्यक पोलीस निरीक्षकांना प्रमोशन दिल्यास पोलीस निरीक्षकांच्या रिक्तपदांचा प्रश्न ५० टक्क्यांच्यावर सुटू शकतो, मात्र त्या दिशेने ठोस पावलेच उचलल्या गेली नाही. दरम्यान १६ मार्चला १६८ अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळाले. मात्र ५१० अधिकारी ‘एपीआय टू पीआय ‘प्रमोशनच्या प्रतीक्षेतच आहे. त्यामुळे नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

‘पीआय’च्या आकृतीबंधावरून संभ्रम

पोलीस महासंचालक कार्यालयाने निवडणूक आयोगाकडे पोलीस निरीक्षक पदांबाबत माहिती सादर केली. त्यामध्ये तीन हजार ६९७ आणि चार हजार ९७ अशी पदे दर्शविली आहे. या दोन आकड्यांमुळे आकृतीबंधाबाबत आता अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच राज्यात नेमके पीआयची पदे किती मंजूर आहे, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.


Police Inspector Bharti 2020 : राज्यातील पोलीस प्रशासनातील तब्बल ५०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण वाढल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यापैकी २५० पदे सहायक पोलीस निरीक्षक यांना पदोन्नती देऊन, विविध न्यायालयीन प्रकरण व सेवाज्येष्ठता यामधून हे पोलीस निरीक्षक पदे भरण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून, गुन्हेगारीवरही याचा परिणाम होत असल्याचे वास्तव आहे.

Police Inspector Bharti 2020 : राज्यात जुलै महिन्यापर्यंत ४२० पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यानंतर आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात आणखी सुमारे १०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात ५०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त झाल्याचे वास्तव आहे. त्याचा परिणाम गुन्हेगारीवर होत असल्याने २५० च्या आसपास पोलीस निरीक्षक पदे भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्या १०० व्या बॅचमध्ये ३११ सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश असून, यामधील २५ अधिकाºयांना यापूर्वीच पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरित अधिकाºयांच्या पदोन्नतीनंतर रिक्त असलेल्या ५०० पोलीस निरीक्षकांच्या जागेवर या सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू करण्यात आली होती; मात्र अचानकच कोविड-१९ आजाराने थैमान घातल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आणि ही पदोन्नतीची प्रक्रिया थांबली. त्यामुळे या तीन महिन्याच्या कालावधीत आणखी काही पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले असून, त्याचाही ताण कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाºयांवर आला आहे.

100 पोलीस निरीक्षक आणखी होणार कमी

राज्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या १०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांना शहर पोलीस उप-अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी) या पदावर पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या १०० पोलीस निरीक्षकांची आणखी पदे रिक्त होणार आहेत, त्यामुळे राज्यात पदोन्नतीच्या प्रकियेनंतरही सुमारे २०० पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.

पीएसआय ते एपीआय यांचीही पदोन्नती थांबली

कोविड-१९ मुळे पोलीस उप-निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; मात्र मार्च महिन्यापासून ही प्रक्रियादेखील थांबली असल्याचे वास्तव आहे.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. ashwini vijay ghag says

    police bharti kevha honar ani exam kadi ahe

  2. Dinesh prakash sonawane says

    Police bharti kevha honar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड