Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नांचा क्रम बदलणार, परीक्षा प्रक्रियेत नवीन बदल! – Maharashtra Typing Exam 2024 – mscepune.in

Maharashtra Typing Exam 2024

संगणक टंकलेखन परीक्षेत डमी उमेदवारांच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा परिषदेने येत्या जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेत प्रश्नांचा क्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. डिसेंबर २०२३ आणि त्यापूर्वी पार पडलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेदरम्यान केंद्रावर डमी उमेदवार बसवणे, त्यांच्याकडून परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून देणे, बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. डमी उमेदवारांच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडवता येऊ नये यासाठी, पूर्वीच्या प्रश्नांमधील क्रम बदलण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

जून २०२४ मध्ये होणाऱ्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी ३० व ४० शब्द प्रति मिनिटच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये सर्वांत प्रथम पाच मिनिटांचा ई-मेल व त्यानंतर लगेचच ७ मिनिटांचा स्पीड पॅसेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येतील. यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेत कपात केली असून त्यासाठी ८ ऐवजी ५ मिनिटे दिली जाणार आहेत.

असा होणार प्रश्नांच्या क्रमात बदल

  • विद्यार्थ्यांनी लॉगइन केल्यानंतर ५ मिनिटांचा ई-मेलचा प्रश्न सोडविण्यास दिला जाईल. विद्यार्थ्यांना ई-मेलचे टंकलेखन संपल्यानंतर लगेचच सबमिट बटण दाबता येणार नाही.
  • हा ई-मेलचा प्रश्न निर्धारित वेळेनंतरच म्हणजे पूर्ण ५ मिनिटे झाल्यावरच ऑटो सबमिट होणार आहे. ई-मेलचा प्रश्न संप- ल्यानंतर ३० सेकंदांचा टाइम अलर्ट (काउंटडाउन) देऊन लगेचच ७ मिनिटांच्या स्पीड पॅसेजला सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न अशा क्रमाने प्रश्न विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातील.

 

तीन मिनिटांचा सराव उतारा

  • सुरुवातीलाच स्पीड पॅसेजचा प्रश्न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना पॅसेज वेगात सोडविण्याचा सराव व्हावा यासाठी ३ मिनिटांचा सराव उतारा (ट्रायल पॅसेज) दिला जाणार आहे.
    • या ट्रायल पॅसेजला गुण मिळणार नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना तो सोडविणे बंधनकारक राहील. चार सत्रांत परीक्षा होणार असून पहिले सत्र सकाळी ९. दुसरे सत्र ११, तिसरे सत्र दुपारी १:१५ आणि चौथे सत्र ३:१५ वाजता सुरु होईल

 

लोकसभा निवडणुका तसेच विविध प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, संगणक टंकलेखन परीक्षा आणि संगणक लघुलेखन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येत्या जून महिन्यांत परीक्षा होणार आहेत.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेचे अधिकारी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहे. पर्यायाने हे कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. तसेच एप्रिल व मार्च २०२४ मध्ये संपूर्ण राज्यभरात एमएच-सीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा पार पडतात. त्यासाठी राज्यातील विविध इंजिनिअरिंग तसेच पॉलिटेक्निक कॉलेज व खासगी संगणक लॅब मोठ्या प्रमाणावर आरक्षित केलेल्या आहेत. त्यामध्ये एप्रिल २०२४ मधील परीक्षेसाठी तब्बल १ लाख ६० हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे संगणकावर आधारित परीक्षा व संगणक लघुलेखन परीक्षा विहित मुदतीत घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एप्रिल-२०२४ मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे

 


 Maharashtra Typing Exam 2024 – राज्यात टंकलेखन परीक्षेपाठोपाठ संगणकाच्या सहाय्याने लघुलेखन स्टेनोग्राफी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रात यापूर्वी तोंडी ऐकविला जाणारा उतारा (पॅसेज) आता संगणकाच्या मदतीने हेडफोनद्वारे ऐकविण्यात येईल. विद्यार्थ्यांना तो ऐकून त्याचे कागदावर लिप्यंतर करून तो मजकूर संगणकावर टाइप करीत परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संगणक टायपिंग प्रमाणपत्र आणि लघुलेखन परीक्षेचे आयोजन करण्यात येते. येत्या एप्रिल २०२४ मध्ये प्रथमच ऑनलाइन लघुलेखन परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये इंग्रजी ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५०, १६० तर मराठी, हिंदी ६०, ८०,१०० आणि १२० शब्द प्रतिमिनिट आदी १६ विषयांचे पेपर होणार आहेत. 

 

नवीन ऑनलाईन पध्दतीचे फायदे
१. चार मिनिटांचा उतारा एकदाच ऐकविला जाईल.

२. उतारा निर्धारित वेळ आणि वेगात वाचून पूर्ण होईल.
३. उताऱ्याचा लिखित कागद नसल्याने कॉपी होणार नाही.
४. परीक्षेतील पारदर्शकता वाढणार

 टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा सुधारित अभ्यासक्रम साठी या लिंक वरक्लिक  करा

लघुलेखन परीक्षेसाठी परीक्षा परिषदेमार्फत प्रचलित पध्दतीनुसार ४ मिनिटांचे लिखित पॅराग्राफ (परिच्छेद) असलेले कागद परीक्षा केंद्रांना पाठविले जात होते. विषयतज्ज्ञ संस्थाचालक तो उतारा निर्धारित वेळेत आणि वेगात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वाचून दाखवित असत आणि विद्यार्थ्यांकडून त्याचे लिप्यंतर करून घेत तो मजकूर संगणकावर टाइप करायचे. मात्र, आता संगणकावर ऑनलाइन पद्धतीने हेडफोनव्दारे ४ मिनिटांचा उतारा त्या त्या परीक्षेनुसार निर्धारित केलेली वेळ आणि वेगात विद्यार्थ्यांना एकदाच ऐकविण्यात येईल आणि ते लक्षपूर्वक ऐकून त्यांचे लिप्यंतर कागदावर करीत तो परिच्छेद टाइप करावा लागणार आहे.

 

एप्रिल २०२४ परीक्षेसाठी प्राप्त अर्ज
टंकलेखन परीक्षा : १ लाख ५० हजार लघुलेखन परीक्षा : ८ हजार

घसरण ८० वरून ८ टक्क्यांवर
■ डिसेंबर २०२३मध्ये सुमारे साडेसात हजार उमेदवारांनी लघुलेखन विषयाची परीक्षा दिली.
■ त्यापैकी केवळ ६३३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पूर्वीचा ८० टक्के लागणारा निकाल आता थेट ८ टक्के एवढा घसरला आहे.

 


 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या डिसेंबर २०२३ टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा जुलैमध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (टंकलेखन) परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

 

 

दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच, सदर निकालाची ऑनलाइन प्रिंट घेता येणार असून विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येतील.

 

आपला निकाल बघा

 


GCC-TBC-30, 40 WPM – Maharashtra Typing Exam 2023 @ mscepune.in – The GCC TBC Computer Typewriting Examination, affiliated to the Maharashtra State Examination Council, Pune, will be held in April 2024. For this, the online admission process has started from all the recognized institutions in the state. Nandkumar Bedse reports. Similarly, strict action will be taken against any recognised institutions found to have indulged in illegal activities, the release said.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

इच्छुक विद्यार्थ्यांनी  खालील लिंकवर आपल्या जवळच्या मान्यता प्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पाहावी. त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर असल्याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात वर्षातून दोन वेळा जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून याची प्रती विषय ६,५०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर लघुलेखन परीक्षा देखील घेतल्या जातात. त्यासाठी देखील प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

 

संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाईन भरून घेतला जाणार आहे. यामुळे ऐनवेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आळा बसेल, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

संगणक टायपिंग संस्था यादी

 


 

Typing result is published now. Candidates in Maharashtra and goa state can apply GOVERNMENT CERTIFICATE IN TYPING BASIC COURSE (GCC –TBC Marathi/Hindi/English 30 and 40 WPM) EXAMINATION through online mode. The registration process for this is through the portal mscepune.in.  GCC-TBC-30 WPM, GCC-TBC-40 WPM, GCC-SSD-CTC Examinations updates & details are given below. Check your online result from following given link.

 

महाराष्ट्र व गोवा राज्यातील शासनमान्यता प्राप्त संगणक टायपिंग संस्थामधील नियमित विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC मराठी/हिंदी/इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि) 2023 ची परीक्षा निकाल आज जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. 

MSCE GCC TBC Result 2023

 

GCC-TBC 30 WPM Result FEB/MARCH 2023

GCC-TBC 40 WPM Result FEB/MARCH 2023

 


पात्रतेचे निकष:
१) उमेदवार ८ वि उत्तीर्ण असावा.
२) विद्यार्थ्याची नोंदणी संबंधित संस्थेने केलेली असावी.
३) उमेदवाराची ८०% उपस्थिती असावी.
४) शासनमान्य टायपिंग संस्थेत नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

 

 

MSCE GCC-TBC Exam Notification PDF

GCC SSD CTC Notification 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड