Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्वाचे! पोलीस भरतीसाठी आवश्यक निकष कोणते?

Police Bharti mahiti syllabus gr

मित्रांनो, आपणास माहीतच आहे सध्या पोलीस भरती संदर्भातील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आपणही तयारी सुरु केलीच असेल. पण महत्वाचे म्हणजे या भरतीचे आवश्यक निकष कोणते ते माहित करून घेणे खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण योग्य दिशेने वाटचाल सुरु कराल. तर पूर्ण माहिती काळजीपूर्वक पहा. तसेच पोलीस भरती संदर्भातील नवीन माहिती साठी येथे क्लिक करा.

वयाची अट

पोलिस भरती होण्यासाठी खुल्या वर्गासाठी : १८ ते २८
कास्ट : १८ ते३३
मराठा Esbc  : १८ ते ३३

SRPF वयोमर्यादा किती…

खुल्या वर्गासाठी फक्त मुले : १८ ते २५
कास्ट : १८ ते ३०
मराठा : १८ ते ३०

ड्रायव्हर पदासाठी … 

खुल्या वर्गात : १९ ते २८
कास्ट : १९ ते ३३
मराठा Esbc : १९ ते ३३
बॅन्ड्समन पदासाठी …
फक्त मुले खुल्या वर्गात : १८ ते २८
कास्ट : १८ ते ३३
मराठा Esbc : १८ ते ३३

शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)

उंची : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५५ सेमी, SRPF : फक्त मुले १६८ सेमी, ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी, बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी

आवश्‍यक कागदपत्रे 

– दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
– महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
– शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
– आधार कार्ड
– कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
– नॉन क्रिमीलेयर  (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
– लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
– ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.

लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण … 

– मराठी २५, गणित २५, बुद्धिमत्ता २५, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी  २५
– (फक्त ड्राइव्हर)-  मराठी २०, गणित २०, बुद्धिमत्ता २०, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २०, वाहतूक २०)

मैदानी परीक्षेसाठी दुसरा टप्प्यात लागणारे ५० गुण … 

मुले : छाती = ७९ सेमी  ते फुगवून पाच अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी. १० सेकंद – ३० गुण)
१०० मी = (११.५० सेकंद – १० गुण)
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १० गुण)

मुली
८०० मी =  (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)
१०० मी =(१४ सेकंद – १० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – १० गुण)

SRPF मैदानी १०० गुण

फक्त मुले 
छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
५ किमी = (२५ मी – ५० गुण )
१०० मी = (११.५० सेकंद- २५ गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – २५ गुण)

ड्रायव्हर मैदानी ५० गुण… 

मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी १० सेकंद – ३० गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १२ गुण)

मुली : ८०० मी =  (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – २० गुण)
(ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे ५० गुण)


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. Prakash magare says

    SRPF madhe 10th pass chalel ka?

  2. Sandip a says

    Ews maratha certificate aahi maje 28years calu aahi mala bhartisathi utarychy aaahi

  3. Sangita wani says

    Pune sathi polis bharthi Aahe ka

  4. Onkar shinde says

    Police bharti sathi maharastra madye navin pade kiti ahet

  5. Parshuram says

    Mi atta just 12th pass jhali ahe 71.54 takke ahe arts made.. but majhi age 25 ahe mi bharti karu sakto ka majya hatavar tatoo ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड