MHT-CET चा निकाल जाहीर, येथे करा डाउनलोड

MHT CET Exam Result

MHT CET Result 2021

MHT CET Exam Result : The result of Maharashtra State Common Entrance Examination has been declared. Candidates appearing for this exam will be able to view the results by following the steps given in the news. Detailed information will be available on the official website. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती मिळणार आहे. MHT CET ला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात.

How to Check MHT CET Result 2021

 • MHT CET निकाल तपासण्यासाठी अधिकृत साइट cetcell.mahacet.org वर जा
 • होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
 • मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
 • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 • निकाल तपासा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

एमएचटी सीईटी २०२१ (PCM) टेक्निकल एज्युकेशनचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

एमएचटी सीईटी २०२१ (PCB) टेक्निकल एज्युकेशनचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org


Maharashtra CET Result 2021

MHT CET Exam Result : So far, only three CET results have been released by the CET cell. Engineering, agriculture, pharmaceuticals; Also, the results of CET for subjects like Management, BPED, LLB, Hotel Management degree courses have not been announced yet. Further details are as follows:-

सीईटी सेलकडून आतापर्यंत केवळ तीन ‘सीईटीं’चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण; तसेच व्यवस्थापन, बीपीएड, एलएलबी, हॉटेल मॅनेजमेंटचा पदवी अभ्यासक्रम अशा विषयांसाठीच्या सीईटीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

सीईटी सेलकडून आतापर्यंत केवळ तीन ‘सीईटीं’चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन या तीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण; तसेच व्यवस्थापन, बीपीएड, एलएलबी, हॉटेल मॅनेजमेंटचा पदवी अभ्यासक्रम अशा विषयांसाठीच्या सीईटीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. हे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, २८ ऑक्टोबरपर्यंत हे निकाल जाहीर केले जातील, असे स्पष्टीकरण सीईटी सेलकडून देण्यात आले आहे.


MHT CET Result 2021 

MHT CET Exam Result : Results of Maharashtra Common Entrance Examination, MBA / MMS and MHT-CET are expected to be announced around 20th October 2021. Candidates who have appeared for the exam can visit the official website of the Common Entrance Examination Cell at cetcell.mahacet.org to see the latest updates and more information about the results. Further details are as follows:-

गेल्या वर्षी, एकूण १,१०,६३१ उमेदवारांनी एमएएच एमबीए/एमएमएस प्रवेश परीक्षेला हजेरी लावली होती, तर यावर्षी ही संख्या वाढून दीड लाख झाली आहे. निकाल लवकरच अपेक्षित आहे. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा, MBA/ MMS आणि MHT-CET परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ च्या आसपास जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते ज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन ताजे अपडेट्स आणि निकालाची अधिक माहिती पाहू शकतात.

MHT CET Result 2021 Important Update

 • – यापूर्वी निकाल २८ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होणार होता. मात्र, कोविड १९ महामारी आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला.
 • – जर उमेदवाराने ठरवलेले पात्रता निकष पूर्ण केले नाहीत, तर ऑनलाइन परीक्षेचा निकाल काहीही असो, अर्जदाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
 • – गैरप्रकारात सहभागी असलेल्या कोणत्याही उमेदवाराच्या उमेदवारीला अपात्र ठरवण्याचा अधिकार राज्य सीईटी सेलकडे राखीव आहे आणि अशा उमेदवारांचा निकाल रद्दबातल केला जाऊ शकतो.
 • – ऑनलाइन परीक्षांमध्ये अनेक वेळा उपस्थित राहिल्याने उमेदवारी रद्द होईल.
 • – प्रत्येक सत्राचे परीक्षेचे निकाल तीन विषयांपैकी प्रत्येकासाठी स्वतंत्रपणे कच्चे गुण आणि टक्केवारी गुणांच्या स्वरूपात तयार केले जातील.
 • – तीन विभागांचे गुण एकत्र केले जातील आणि त्यांना सीईटी स्कोअर म्हटले जाईल, जे नंतर निकालासाठी वापरले जातील.

MHT CET Exam Result : MAH Ll.B. 3 Years CET 2020 Result Declared by Maharashtra CET Cell – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या निकालात चार विद्यार्थ्यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तब्बल नऊ मुलींनी बाजी मारली आहे. यंदा करोनामुळे तीन विधी अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा लांबणीवर गेली होती. २ आणि ३ नोव्हेंबर या कालावधीत ती आयोजित करण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ५५ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ४३ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल सीईटी सेलने बुधवारी जाहीर केला.

या परीक्षेत मुग्धा पटवर्धन या विद्यार्थिनीने १५०पैकी ११८ गुण मिळत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर दुसरा क्रमांक युक्ती अरोरा हिने मिळवला असून, तिलाही ११८ गुण मिळाले आहेत. मुलांमध्ये प्रथम आलेल्या अनिरुद्ध सिद्धये यालाही ११८ गुण असून, गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक आला आहे. तर वृंदा भोला या विद्यार्थिनीसही ११८ गुण मिळाले असून. ती गुणवत्ता यादीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.


MHT CET Exam Result : The number of merits in CET results is high this year – राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. या निकालात पीसीबी गटात १९, तर पीसीएम गटात २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे ८५ पर्यंत पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पीसीएम गटात २६ हजार ५०२, तर पीसीबी गटात ३२ हजार ७९६ विद्यार्थी इतकी आहे.

या निकालात यंदा गुणवतांची संख्या जास्त आहे. मागील वर्षी १०० पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही गटांमध्ये अवघी दोन इतकी होती. तर ९९ पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही गटांत मिळून सुमारे ९०० इतकी होती. ही यंदा पीसीएम गटात १,७८५; तर पीसीबी गटात २,१८२ इतकी आहे. यामुळे यंदा इंजिनीअरिंगमध्ये चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी चुरस पाहवयास मिळणार आहे. तर औषधनिर्माणशास्त्र कॉलेजांतही प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहवयास मिळणार आहे. यंदा तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी पीसीएम, तर दोन लाख ११ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली आहे.

गुणनिहाय विद्यार्थी संख्या

 • पर्सेंटाइल –पीसीएम –पीसीबी
 • १०० — २२ — १९
 • ९९ — १७८५ — २१८२
 • ९८ — १७७६ –२१९७
 • ९७ — १८३१ — २१४९
 • ९६ — १७११ — २१२८
 • ९५ — १७५२ — २१६०

सोर्स : म. टा.


MHT CET 2020 Online result at https://mhtcet2020.mahaonline.gov.in 2020 for the PCM and PCB group has been declared today, November 28. Check your Online Result Now from given Link. Maharashtra Common Entrance Test(MHT CET) was held as centre-based online mode across the country. As many as 41 candidates scored 100 percentile. MHT CET cut-off 2020 is the minimum marks required for admission to BE, BTech, BPharm or DPharm courses in the colleges of Maharashtra.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पीसीबी गटात 19 विद्यार्थ्यांना 100  पर्सेंटाइल गुण तर पीसीएम गटात 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.
100 पर्सेंटाइल गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पीसीएम गटात पुण्याची सानिका गुमास्ते, शुभम जोग तर मुंबईतून केतकी देशमुख, चैतन्य व्होरा, सोहम चिटणीस, निष्ठा पांडे, आर्यमन शार्दुल, रिशभ बाली, पार्थ गुजराती आण ठाण्यातून पवन कुंटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पीसीबी गटात पुण्याचा अनिष जगदाळे, पालघरची वर्षा खुशवाह, मुंबईतील तनय मांजरेकर, देवेश शाह, जयेश चौधरी, परिता गाडा या विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत. पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा राज्यात 187 केंद्रांवर आणि राज्याबाहेरील 10 अशा एकूण 197 केंद्रांवर जाहीर करण्यात आली होती.
तीन लाख 86  हजार 604 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख 74 हजार 679 विद्यार्थ्यांनी पीसीएम तर दोन लाख 1 हजार 925 विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. या निकालामुळे आता इंजिनीअरिंग प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड