महत्वाचे!- पोलीस भरती:कोणत्याही एका जागेसाठी करता येणार अर्ज! – Police Bharti Exam 2024
Police Bharti Exam 2024
राज्यसरकारने यावेळी पोलिस भरती अधिक काटेकोर केली असून एका पदासाठी उमेदवाराला कोणत्याही एका घटकात केवळ एक अर्ज करता येणार आहे. याआधी वेगवेगळ्या घटकात (जिल्ह्यासाठी) अर्ज दाखल करून दोन-तीन शारीरिक चाचण्या देता येत होत्या. प्रत्येक उमेदवाराचे आधारकार्ड लिंक केल्याने आता तशा संधी संपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना अत्यंत काळजीपूर्वक घटक निवडावा लागणार आहे. तरी मित्रांनो, पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. तसेच व्हाट्सअँप वर सर्व पोलीस भरती अपडेट्स मिळवण्यासाठी आपण या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता.
एकूण १७४३० पदासाठीच्या पोलिस भरतीत पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी सव्वीस घटकांत ९५९५ जागा, राज्य राखीव पोलिस दलातील पदासाठी एकोणीस घटकांमध्ये ४३४९ जागा, चालक पदासाठी सव्वीस घटकांमध्ये १६८६ जागा तर कारागृह पदासाठी १८०० जागा उपलब्ध आहेत. पोलिस भरतीसाठी ५ मार्च ते ३१ मार्च ही ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारांना पोलिस कॉन्स्टेबल, एसआरपीएफ, चालक, कारागृह व बँडचालक अशा पाच पदांसाठी पात्र उमेदवार पाचही ठिकाणी ऑनलाइन अर्ज करू शकतात, मात्र एका पदासाठी कोणताही एकच घटक निवडावा लागणार आहे. उदा. कॉन्स्टेबल पदाकरिताच्या २६ घटकांपैकी कोणत्याही एकाच घटकात अर्ज करता येईल. दुसऱ्या घटकांत अर्ज करू लागला तर आधीच्या अर्जासोबत आधार लिंक असल्याने दुसरा अर्ज स्वीकारला जात नाही. शारीरिक चाचण्या वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी लेखी परीक्षा राज्यभर एकाच वेळी घेतली जाणार असल्याचे जाहिरातींमध्ये स्पष्ट केले आहे. आजारी पडणे, गोळाफेक फसणे, धावताना जायबंदी होणे, मासिक पाळी अशा कारणांनी संधी हुकलेल्यांना आता पूर्वीप्रमाणे दुसरी संधी मिळणार नाही. यानिमित्ताने यंत्रणेवरील ताण कमी होऊन संख्या फुगणार नाही असेही मत व्यक्त केले जात आहे.
पाच पदांपैकी कॉन्स्टेबल, कारागृह या दोन पदांसाठी पात्रता समान असल्याने सरसकट उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. बँडचालकासाठी वादनकलेचे प्रमाणपत्र आणि चालकासाठी वाहन परवाना आवश्यक राहणार आहे. तर एसआरपीएफसाठी अजूनही केवळ मुलांनाच संधी आहे. लोहमार्ग पोलिस पद वेगळे काढून सहावा पर्याय देता आला असता तो सरकारने टाळला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील गृह विभागाने १७ हजार पोलिसांची पदभरती सुरू केली असून आजपासून (मंगळवार) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अंतर्गत उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस भरतीत ज्यांची वयोमर्यादा नुकतीच संपली, त्यांनाही संधी मिळावी आणि सध्या इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या निकालापर्यंत अर्ज करण्याची मुदत असावी, अशा दोन प्रमुख मागण्या जोर धरू लागल्या आहेत.
आता जाहीर झालेल्या भरतीला लोकसभेच्या आचारसंहितेचा कोणताही अडथळा नाही. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यास तरुणांना मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, उन्हाळा संपताच अर्जदार उमेदवारांची मैदानी चाचणी होईल आणि त्यानंतर सर्वच उमेदवारांची एकदाच लेखी परीक्षा उरकली जाणार आहे. साधारणत: नाव्हेंबर-डिसेंबरमध्ये या भरतीतील निवड झालेल्या नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस भरती 2024 नवीन मोफत टेस्ट सिरीज
पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस 2024
पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच
Maharashtra Transgender Bharti–असे आहेत निकष
पोलीस भरती २५ मार्कचे महत्वाचे प्रश्नसंच
पोलीस भरती १०० मार्क्सचे पूर्ण प्रश्नसंच
पोलीस भरती २०२३ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत
पोलिस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. पहिल्यांदा उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घेण्यात येईल.
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.