तृतीयपंथीयांचा पोलिस भरतीतील मार्ग मोकळा; उपराजधानीत पाच जणांचे अर्ज | Maharashtra Transgender Bharti

Maharashtra Transgender Bharti

Maharashtra Transgender Police Bharti

Maharashtra Transgender Bharti – Due to lack of criteria of physical test for police recruitment started by the state police force, the recruitment process of Transgender has been stoped. But Now Open way for third parties in police recruitment; 73 Transgender from across the state have applied for this recruitment. The police system has started work for the recruitment of Transgender. 100m, 800m running and shot put field test

राज्य पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या पोलिस भरतीत शारीरिक चाचणीचे निकष नसल्याने तृतीपयंथीच्या भरतीप्रक्रियेत खोडा आला होता. त्यानंतर गृह विभागाने मंगळवारी सायंकाळी याबाबतचे आदेश जारी केल्याने तृतीयपंथीयांच्या पोलिस भरती प्रक्रियेसंदर्भातील मार्ग मोकळा झाला आहे. आता ही भरती प्रकिया लवकरच संपण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Police Bharti 2022-23 – राज्यातील पहिली तृतीयपंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी परीक्षा नागपूर पोलिस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेली प्रक्रिया आगामी चार ते पाच दिवसांत, तर नागपूर ग्रामीणमधील प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्तालयात घेण्यात येत असलेल्या भरतीसाठी चार, तर नागपूर ग्रामीणमध्ये एका तृतीयपंथीयाने अर्ज केला आहे. निकष नसल्याने अन्य उमेदवारांच्या भरती प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आले असले, तरी निवड यादी थांबविण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने पोलिस भरतीत तृतीपयंथीयांच्या निकषासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन केली. यात प्रधान सचिव (गृह), आरोग्य संचालक, विधी व न्याय विभागाचे सहसचिव, मानसशास्त्रज्ञ व दोन निमंत्रित डॉक्टरांचा समावेश करण्यात आला. समितीच्या सदस्यांनी नियमावली तयार करून ३१ जानेवारी रोजी शासनाकडे अहवाल सादर केला. त्यानंतर गृहविभागाने तृतीयपंथीयांच्या भरतीचे आदेश जारी केले.

असे आहेत निकष – Maharashtra Transgender Police Bharti Physical Criteria

महिला उमेदवारांची उंची १५८ सेंमीपेक्षा कमी नसावी, तर पुरुषांची उंची १६५ असावी. तृतीयपंथीयांसाठी लागू करण्यात आलेल्या निकषानुसार स्वत:ची ओळख महिला तृतीयपंथी देणाऱ्या उमेदवारासाठी उंचीचा निकष १५८, तर पुरुष उमेदवारासाठी १६५ एवढाच राहणार आहे. छातीचा निकष वगळण्यात आला आहे. तृतीपयंथीला पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वत:ची ओळख निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. शारीरिक चाचणी ५० गुणांची असेल. पुरुष तृतीयपंथीसाठी १६०० मीटर धावणेसाठी ३० गुण व गोळाफेकसाठी २० गुण; तर महिला तृतीयपंथीयांसाठी ८०० मीटर धावणे व गोळा फेक, असे प्रत्येकी ३० व २० एकूण ५० गुण राहतील.


Maharashtra Transgender Bharti

Maharashtra Transgender Bharti: Maharashtra government has started taking steps for giving employment to Transgender Candidates in State Recruitment Process. This will be one of the most important decisions in Maha Recruitment Process till now. Due to this many candidates will get Job security. For Transgender Recruitment, The Department of Social Justice has asked feedback from the Finance, Health and Planning Departments in this regard. More detail about Maharashtra Transgender Recruitment 2023 is given below :

तृतीयपंथीयांसाठी खुशखबर !! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सरकारने तृतीयपंथीयांना पोलीस भरतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक न्याय विभागाने याबाबत वित्त, आरोग्य आणि नियोजन विभागांकडून अभिप्राय मागवले आहेत. हे अभिप्राय प्राप्त होताच तृतीयपंथीयांना सरकारी सेवेतील भरतीबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. अधिक माहिती खाली वाचा …

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तृतीयपंथीयांसाठी पात्रतेचे निकष ठरणार | Transgender Bharti Eligibility Criteria

अनेक सुशिक्षित तृतीयपंथीयांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. अनेकांनी पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. यासाठी तयारीही त्यांनी केली आहे. मात्र डिसेंबर २०२२ मध्ये पोलीस भरतीच्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी रकानाच ठेवला नसल्याने त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. आता न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र श्रेणी ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने नोकर भरतीदरम्यान त्यांच्या शारीरिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबींसंदर्भात तसेच त्यांच्यातील कौशल्य विकासाला चालना द्यायचे झाल्यास त्यांच्यासाठी कोणत्या योजना आणि कोणते निकष आखता येतील, त्यांना कशाप्रकारे निधी उपलब्ध करून देता येईल, अशा अनेक बाबींवर आरोग्य, वित्त आणि नियोजन विभागाकडून अभिप्राय मागितला आहे. तसेच ज्या विभागांना नोकर भरती करायची आहे, अशा संबंधित विभागांनाच तृतीयपंथीयांसाठी पात्रतेचे निकष ठरवून द्यावे लागणार आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी येणार | Transgender Jobs 2023

तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक प्रयत्न झाले. परंतु, सरकारी उदासीनतेमुळे हा वर्ग कधीच मुख्य प्रवाहात आला नाही. सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथींना आरक्षणाचे निर्देश देऊनही तृतीयपंथीयांना त्याबाबतच्या अपेक्षित संधी उपलब्ध झालेल्या नाहीत.

पोलीस भरतीसाठी ६७ अर्ज | Maharashtra Transgender Police Bharti 2023

तृतीयपंथीयांना पोलीस दलात भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर १५ डिसेंबर रोजी संपलेल्या अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या दोन दिवसांत राज्यभरातून ६७ तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई कम चालक या पदाच्या १८३३१ जागांसाठी राज्यभरातून सुमारे १८ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, तृतीयपंथी वर्गाला फक्त पोलीस दलातच भरती केले जाणार आहे, अशी माहिती गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड