Ladki Bahin June July 2025 Payment – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करुन जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना या योजनेतून दरमहा 1500 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरु केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीयोजने तील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात. जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे. या संदर्भातील पूर्ण माहितीसाठी या लिंक वरून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा.

महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी 28290 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्यानं जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनी घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकची माहिती दिली होती. आदिती तटकरे यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 26.34 महिला अपात्र असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्याचं सांगितलं होतं. जून महिन्यापासून त्या लाभार्थ्यांचा लाभ स्थगित करण्यात आल्याचंदेखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं. जून महिन्याचा हप्ता 2 कोटी 25 लाख महिलांना दिल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. छाननीनंतर अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात येत असल्यानं प्रत्येक महिन्यात शासनाला प्रत्येक महिन्यासाठी खर्च करत असताना त्यात घट होत असल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता वर्ग केला जाऊ शकतो. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरु झाल्यापासून 13 वा हप्ता मिळणार आहे.
महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे. ही योजना 2024 मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे. सध्या जुलै 2025 चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र (म्हणजेच 3000 रुपये) मिळणार का, याबाबत चर्चा जोरात आहे. विशेषतः 9 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. जुलै महिना संपत आला असून, लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्या आहेत. गेल्या वर्षी, जुलै आणि ऑगस्ट 2024 चे हप्ते एकत्रितपणे 3000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाले होते, ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता. यंदाही अशीच शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट 2025 चे हप्ते एकत्र जमा होऊ शकतात, विशेषतः रक्षाबंधनाच्या निमित्ताने. लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. जुलैचा हप्ता या महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो. दरम्यान, आता जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनुसार, 9 ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या अनुभवांवरून, सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेमाचा उत्सव आहे. यंदा, 9 ऑगस्ट 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते. गेल्या वर्षीप्रमाणे, सणांच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता, यंदाही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा करू शकते. यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल.
सरकारची जबाबदारी
लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे. दरमहा मिळणारी १५०० रुपयांची रक्कम अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहे. मात्र, हप्त्यांमध्ये होणारा विलंब महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणावी आणि हप्ते नियमितपणे जमा करावेत, अशी अपेक्षा आहे. जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळाले, तर महिलांना ३००० रुपये मिळतील, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















