पोलीस भरती अर्ज केलेल्यांची हे हमीपत्र त्वरित भरा, दोनच दिवसाचा वेळ! – Police bharti double form update
Police bharti double form update
Police bharti double form update – पोलिस भरतीतून या टप्प्यात राज्यातील १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारी अर्जांचा विचार करता पोलिस भरतीसाठी किमान सहा महिने लागतील एवढे अर्ज आहेत. त्यामुळे एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यांना आता एकाच जिल्ह्याची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये चालकांच्या नऊ तर पोलिस शिपायाच्या ८५ जागांची भरती होत आहे. त्यासाठी ४५८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस खात्यातील जवळपास २०० पदांची भरती यावेळी होणार आहे. त्यासाठी दोन हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरूणांनी वेगवेगळ्या शहर- जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज केले आहेत.
उमेदवारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी हमीपत्र देण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या अलंकार हॉलमध्ये उपस्थित राहायचे आहे. उद्या (बुधवारी) व गुरुवारपर्यंत हमीपत्र देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून घेतल्यानंतर त्याचा अहवाल अप्पर पोलिस महासंचालकांना (प्रशिक्षण व खास पथके) पाठविला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.
पोलिस भरती २०२२-२३ साठी सोलापूर जिल्ह्यात राहणाऱ्या ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एका एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत. अशा उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी एकाच जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र प्रत्यक्ष हजर राहून द्यायचे आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांच्या कार्यालयाकडून किंवा सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून ज्या उमेदवारांना मेसेज पाठविले आहेत किंवा मेसेज आले नाहीत पण अर्ज केला आहे, अशा सर्व उमेदवारांनी १५ व १६ मे रोजी सोलापूर शहरातील ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचे आहे. येताना उमेदवारांनी आधारकार्ड व त्याची छायांकित प्रत व भरलेल्या अर्जाची प्रत आणायची आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आपण सन 2022-2023 या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकांत ऑनलाईन आवेदन अर्ज केलेले आहेत. पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आपण विविध घटकात केलेल्या अर्जापैंकी एका पदाकरीता कोणत्याही एका घटकाचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राहय धरण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करुन त्याप्रमाणे हमीपत्र भरुन देण्यासाठी वित्तक हॉल, पोलीस मुख्यालय, येथे दिलेल्या तारखेला आणावे. सोबत येताना आवेदन अर्जाची व आधारकार्ड ची छायांकित प्रत तसेच मुळ आधारकार्ड न चुकता आणावे. असा मेसेज उमेदवारांना प्राप्त झाला आहे. जिल्हा निहाय डबल फॉर्म भरलेल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या खाली दिलेल्या आहे.
Comments are closed.