PMRDA च्या पदभरतीचा अखेर मुहूर्त सापडला, आता २४४ पदांची पदभरती सुरु होणार!! | PMRDA Bharti 2024

PMRDA Recruitment 2024

‘PMRDA’च्‍या अंतर्गत २४४ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. नव्‍याने मागविलेल्‍या निविदेत बीव्‍हीजीला हे काम प्राप्‍त झाले आहे. त्‍यांच्‍यामार्फत ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. १५ ऑक्‍टोबरपासून बीव्‍हीजीला हे काम मिळाले असल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पीएमआरडीएमधील भरती प्रक्रिया निविदांमध्ये अडकून पडली होती. मध्यंतरी या जुन्‍या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा दर्जा नसल्याने सध्या असलेला कंत्राटी कर्मचारी कंपनीचा ठेका काढून घेतला होता. त्यानुसार नव्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्‍या होत्‍या. या निविदा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिकदृष्ट्या खुल्या केल्या होत्या. 

 

PMRDA Recruitment 2024

 

‘पीएमआरडी’कडून प्रशासनाकडून नमूद केलेल्या अटींची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी, तीनपैकी दोन कंपन्यांच्या निविदा रद्द झाल्या असून, पुन्हा नव्याने प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार बीव्‍हीजीने प्रस्‍ताव दाखल केला होता. अटी शर्तींची पूर्तता केल्‍यानंतर १५ ऑक्‍टोबरपासून कंपनीला काम प्राप्‍त झाले असून, एक वर्षांसाठी त्‍यांना मुदत असणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आवश्‍यकतेनुसार होणार भरती
वर्ग तीन आणि चारच्‍या पदांबाबतची माहिती पीएमआरडीए प्रशासन खासगी कंपनीला कळविणार आहे. त्‍यानंतर आवश्‍यकतेनुसार ही कंपनी उमेदवारांच्‍या मुलाखती घेऊन निवड करणार आहे. त्‍यांच्‍या कागदपत्रांची पडताळणी ‘पीएमआरडीए’कडून केली जाणार आहे. त्‍यानंतर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्‍त केले जातील, अशी माहिती प्रशासनाने दिली. ‘पीएमआरडीए’कडून २४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नव्‍याने निविदा मागविण्यात आल्या होत्‍या. त्‍यामध्ये बीव्‍हीजी पात्र ठरली आहे. १५ ऑक्‍टोबरपासून त्‍यांच्‍या कामाला सुरूवात झाली आहे. आवश्‍यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. ‍

 

स्थापनेपासूनच पीएमआरडीएच्या वरिष्ठ पदावर विविध विभागांतील अधिकारी यांची प्रतिनियुक्तीने तात्पुरती नियुक्ती केली जात होती, तर कारकून शिपाई आदी पदे कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत होती. त्यामुळे पीएमआरडीएच्या कारभाराला अपेक्षित अशी गती मिळत नव्हती. आकृतिबंध तयार करणे त्यानंतर सेवा नियमावली तयार करणे आदीं बाबींसाठी प्रशासनाला वेळ लागला. मागील वर्षी शासनाने आकृतिबंधास मान्यता दिली. त्यानंतर राज्य शासनाने आज सेवा विनियम 2023 ला मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी जारी केला आहे. प्रशासकीय विभाग, लेखा विभाग, तांत्रिक विभाग, नगररचना व मूल्य निर्धारण विभाग, गृह विभाग, अग्निशमन विभाग आदी विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा नियमावली तयार करून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्राधिकरणाचा स्वतंत्र आकृतीबंध मान्य केला असून, जवळपास ४०० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम संपुष्टात येईल. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. शिपाई व इतर साहाय्यक या ‘ड’ वर्गाचे मनुष्यबळ कंत्राटीने भरावे लागणार आहे.


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pmrda.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात  Avilable Soon
✅ अधिकृत वेबसाईट https://www.pmrda.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड