PM Internship Yojana Last Date For Registration: केंद्र सरकारने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठी असलेल्या अंतिम तारखेत आता वाढ करण्यात आली असून ती 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. यामुळे ज्या उमेदवारांना पूर्वी दिलेल्या मुदतीत अर्ज करता आला नाही, त्यांना अर्ज भरण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे गरजेचे आहे. पात्रतेनुसार, उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे, तसेच त्याचा पूर्णवेळ शिक्षण किंवा नोकरीशी संलग्नता नसावी. ऑनलाइन शिक्षण घेत असलेले विद्यार्थीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
नोंदणी प्रक्रिया: पीएम इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. त्यानंतर रजिस्टर लिंकवर क्लिक करून आवश्यक तपशील भरा. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. संपूर्ण फॉर्म तपासून सबमिट केल्यावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेविषयी अधिक तपशीलासाठी येथे क्लीक करा
इच्छुक उमेदवार ‘https://pminternship.mca.gov.in/login/ ‘ या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 21 ते 24 वर्षे असावे. पीएम इंटर्नशिप योजनेंतर्गत इंटर्नशिप 2 डिसेंबरपासून सुरू होईल. या योजनेअंतर्गत, इंटर्नला 12 महिन्यांसाठी 5 हजार रुपये मासिक आर्थिक सहाय्य आणि 6 हजार रुपये एकवेळ अनुदान मिळेल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















