PM Internship Yojana Maharashtra – तरुणांना रोजगारासाठी पात्र बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गुरुवारी पथदर्शक तत्त्वावर पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली. या योजनेत निवड झालेल्या तरुणांना वर्षभर ५ हजार रुपयांचे मासिक अर्थसाह्य दिले जाईल. याशिवाय इंटरर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी एकरकमी ६ हजार रुपये दिले जातील. अशा प्रकारे एकूण ६६ हजार रुपयांची मदत त्यांना मिळेल. चालू वित्त वर्षात १.२५ लाख इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यावर ८०० कोटी रुपये खर्च होतील. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त वर्ष २०२४-२५ च्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेची घोषणा केली. यात ५ वर्षांत १ कोटी तरुणांना देशातील सर्वोच्च ५०० कंपन्यांत प्रशिक्षणाची संधी असेल, विविध व्यावसायिक वातावरणात १२ महिने कामाची कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल.

योजनेसाठी पात्रता काय? (Eligiblity For PM Internship Yojana)
प्रशिक्षणार्थीना मिळणाऱ्या मासिक अर्थसाह्यापैकी ४,५०० रुपये सरकार उमेदवारांच्या खात्यात जमा करेल. ५०० रुपये संबंधित कंपनी सीएसआर कोषातून अदा करील. नोकरी न करणारे तसेच शिक्षण घेत नसलेले २१ ते २४ या वयोगटातील युवक योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतील. यासाठी शैक्षणिक अट १० वी १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा, बीए, बी.एससी, बी.कॉम, बीसीए, बीबीए, बी. फार्मा. आदी पदवीधारक अशी आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















