यंदा ‘कॅम्पस मुलाखती’तून फ्रेशर्सच्या थेट भरतीत घट शक्य – Persistent Pune Jobs

Persistent Company Recruitment 2024

Persistent Company Recruitment 2024

माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील मध्यम-श्रेणीतील कंपनी पर्सिस्टंट सिस्टीम्सने यंदा नवीन नोकरभरतीत आणि त्यासाठी शिक्षणसंस्थाच्या ‘कॅम्पस’ला भेट देण्यावर भर तुलनेने कमी राहिल, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले.पुण्यात मुख्यालय असलेल्या या कंपनीने डिसेंबर तिमाहीची मिळकत कामगिरी जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी, तिचे मुख्य वित्तीय अधिकारी सुनील सप्रे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वरील माहिती दिली. सप्रे म्हणाले की, जवळपास १८ महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू आहे आणि अद्याप विशिष्ट प्रकल्पांवर नियुक्त केले गेलेले नाहीत अशा नव्याने भरती झालेल्या उमेदवारांचे प्रमाण आधीच खूप जास्त आहे. परिणामी नवीन नोकरभरतीबाबत हळूवारपणे पावले टाकली जात आहेत. पुढील तीन वर्षांमध्ये, कंपनीने तिच्या परिचालन नफ्याचे मार्जिन सध्याच्या १४.५ – १५ टक्क्यांच्या पातळीच्या तुलनेत जवळपास ३ टक्के अधिक राखण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे सप्रे यांनी स्पष्ट केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

यंदा तुलनेने कमी कॅम्पसला भेटी दिल्या जातील काय, असे विचारले असता सप्रे यांनी त्याला होकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, कंपनीच्या मनुष्यबळाची एकूण संख्या २३,३३६ पर्यंत नेण्यासाठी सुमारे ५०० लोक नव्याने सामावले गेले आहेत. सर्व नियुक्त मनुष्यबळाचा ८३ टक्क्यांपेक्षा जास्त वापर करण्याचे उद्दिष्ट ठेऊन कंपनीकडून सध्या नियोजन केले जात आहे. असे झाले तरच कंपनीला आवश्यक ती नफाक्षमता पातळी गाठण्यास मदत मिळू शकेल. डिसेंबर तिमाहीसाठी, मनुष्यबळ वापर ८१.५ टक्के पातळीवर गेला आहे आणि तो आणखी उंचावेल अशा योजना सुरू आहेत, असे ते म्हणाले. सध्या या क्षेत्रात कमी संधी उपलब्ध असल्याने मनुष्यबळ गळती (नोकऱ्या बदलणारे, सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण) ११.५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, ही बाब देखील मदतकारक ठरली आहे, असे त्यांनी नमूद केले.

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Persistent Company Recruitment 2021 : Pune-based IT company Persistent Systems will provide jobs to 2,000 freshers in 2021-22. According to Sunil Sapre, Chief Financial Officer of the company, we will be hiring 2,000 freshers in the financial year 2022. The recruitment will be done to increase the business. Further details are as follows:-

पुण्याची आयटी कंपनी पर्सिस्टंट सिस्टिम २०२१-२२ मध्ये २ हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी यासंदर्भाती माहिती दिली. कंपनीच्या सूचना औद्यागिकमध्ये पुन्हा येण्यावर अधिक भर दिला आहे. डिजीटलायजेशनवर अधिक भर दिल्याने व्यवसायात सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीने जून तिमाहीत ६८ टक्के वाढीसह १५१.२ कोटी रुपयांचा नफा नोंदवला.

 

कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी सुनील सप्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही २०२२ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार फ्रेशर्सना कामावर ठेवणार आहोत. व्यवसाय वाढविण्याच्या हिशोबाने ही भरती होणार आहे. सर्वसाधारणपणे एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी फ्रेशर्सला सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाते असे मुख्य कार्यकारी संदीप कालरा यांनी सांगितले.

गेल्या तीन महिन्यांमध्ये ४ हजार २०० लोकांना कामावर ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये ३ हजार ५०० जणांना नंतर नियुक्त करण्यात आले. फ्रेशर्स ते नंतर नियुक्ती देण्याचे प्रमाण आता पहिल्यासारखे राहीले नाही. जून २०२१ पर्यंत कंपनीमध्ये १४ हजार ९०४ कर्मचारी होते. एक वर्ष आधीच्या तुलनेत ३७ टक्के अधिक असल्याचे सप्रे यांनी सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड