JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

टंकलेखन परीक्षेबाबत मोठा निर्णय! ११,६१७ उमेदवारांना दिलासा। Bombay High Court Recruitment 2026

Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक भरतीच्या परीक्षेबाबत उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली संगणक टंकलेखन परीक्षा अखेर मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी (२९ ऑगस्ट) रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तसेच टंकलेखनाच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत न्यायालयाने परीक्षा रद्द केली असून, फेरपरीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

लिपिक भरतीच्या परीक्षेत नव्या पद्धतीचा प्रयोग उमेदवारांसाठी अडचणीचा ठरल्याचे समोर आले आहे. लिपिकांच्या १ हजार ३३२ जागांसाठी तब्बल ११ हजार ६१७ उमेदवार परीक्षेला बसले होते. न्यायालय प्रशासनाने प्रथमच ही परीक्षा त्रयस्थ संस्थेमार्फत ‘स्क्रीन टू स्क्रीन’ पद्धतीने घेतली; मात्र या पद्धतीदरम्यान उमेदवारांना विविध तांत्रिक तसेच परीक्षेशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागला.

लिपिक भरतीच्या टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक त्रुटी आणि अव्यवस्थेमुळे उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. संगणकाच्या पडद्यावरील अक्षरांचा आकार लहान असल्याने स्वल्पविराम, अवतरणचिन्ह, विसर्ग यांसारखी चिन्हे स्पष्ट दिसत नव्हती. त्यातच उतारा टंकलिखित करताना अक्षरे उशिराने पडद्यावर उमटत असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या. काही परीक्षा केंद्रांवरील संगणकांच्या कळफलकांवर धूळ साचलेली होती, तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे कळफलक देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. टंकलेखन परीक्षेसाठी निर्धारित नियमांचे पालन झाले नसल्याच्या तक्रारींसोबतच काही केंद्रांवर परीक्षा व्यवस्थित पार पडली नसल्याचेही समोर आल्याने परीक्षेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Bharti 2026

 


Bombay High Court published an advertisement for the recruitment of “Gardener/Helper” under Bombay High Court Bharti 2026. There are a total of 02 vacancies available to fill with Posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address by Speed Post before the last date. The last date for submission of application is 20th of August 2026. For more details about Bombay High Court Recruitment 2026, visit our website  www.MahaBharti.in.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “माळी/मदतनीस” पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  मुंबई उच्च न्यायालय भरती २०२६ करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई उच्च न्यायालय सहयोगी भरती २०२६

  • पदाचे नाव माळी/मदतनीस
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 18 – 40 वर्षे 
  • अर्ज शुल्क – रु. 1000/-
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन (फक्त स्पीड पोस्टाद्वारे)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- ४०००३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

Bombay High Court Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
माळी/मदतनीस02

Educational Qualification For Bombay High Court Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
माळी/मदतनीसउमेदवार उमेदवार किकिमानन चौथी इयत्ता उत्ती चौथी इयत्ता उत्तीर्ण र्णअसावा.
उमेदवारास मराठी भा उमेदवारास मराठी भा षषा लिलिहिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आ हे.

Salary Details For Bombay High Court Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
माळी/मदतनीसS-३ : (रुपये १६६००-५२४००/-) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

How To Apply For Bombay High Court Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bombayhighcourt.nic.in Bharti 2026

📑PDF जाहिरात https://shorturl.at/omD7H
✅ अधिकृत वेबसाईट
https://bombayhighcourt.nic.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड