महापालिके तर्फे सोमवारी रोजगार मेळावा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती उपक्रम! – PCMC Rojgar melava
PCMC Rojgar melava 2024
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत महापालिकेने सोमवारी (ता. २६) रोजगार मेळावा आयोजित केला आहे. मोरवाडी येथील दिव्यांग भवन फाउंडेशन इमारत परिसरात सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत मेळावा होईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार देणाऱ्या स्वयंसेवी संस्था, औद्योगिक आस्थापना, उद्योग समूह थेट लाभार्थ्यांशी जोडल्या जाणार आहेत. बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना संकेतस्थळावर ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच, या Job Openings संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
पदांचा तपशील
फिल्ड सर्वे इन्युमरेटर, माळी, मल्टी टास्कींग स्टाफ, स्थापत्य अभियंता, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य निरीक्षक, वायरमन, विद्युत अभियंता, डीटीपी ऑपरेटर, लिपिक, शिपाई अशा विविध पदांच्या एकूण ५७५ उमेदवारांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विद्यावेतन मिळेल
शैक्षणिक अर्हतेनुसार व सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार प्रशिक्षणर्थींना विद्यावेतन दिले जाईल. त्याची रक्कम डीबीटीद्वारे प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात जमा होईल. महापालिकेच्या संवर्गात सेवा समावेशन किंवा सामावून घेणे वा नियमित सेवेचा इतर कोणताही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल.
अर्ज प्रक्रिया
इच्छुकांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून नोंदणी करून क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे. तसेच, महापालिकेच्या विभागवार प्रशिक्षणास इच्छुक असल्याची नोंद करणे गरजेचे आहे.
पात्रता निकष
– किमान वय १८ ते कमाल वय ३५ वर्ष
– बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण
– महाराष्ट्राचा रहिवासी असावा
– आधार नोंदणी आवश्यक, बँक खाते आधार संलग्न असावे
– किमान वेतन, राज्य कामगार विमा, कामगार भविष्य निर्वाह निधी, कामगार नुकसान भरपाई व औद्योगिक विवाद असे कायदा लागू नसतील
महापालिकेच्या २३ विभागांमध्ये ५७५ प्रशिक्षणार्थी घेतले जातील. इच्छुकांनी २६ ऑगस्ट रोजी दिव्यांग भवन येथील रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह (झेरॉक्स) उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सरकारच्या संकेतस्थळांना भेट द्यावी.
Comments are closed.