पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार!। Pavitra Portal Shikshak Bharti 2025
Pavitra Portal Shikshak Bharti 2025 - mahateacherrecruitment.org.in
Pavitra Portal Shikshak Bharti 2025
राज्यातील शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. शालेय शिक्षण हे आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण मिळावे, यासाठी आमचा कायम आग्रह आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्यातील शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत दिली. राज्यातील शाळा संस्थाचालकांच्या प्रतिनिधींसोबत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेतलेल्या आढावा. बैठकीत भुसे यांनी ही घोषणा केली. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदींसह राज्यातील ७५ हून अधिक संस्थाचालक उपस्थित होते. पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती आणि त्याचे काम सुरू लवकरच होईल, असे सांगत अजूनही राज्यातील काही संस्थाचालक आपल्या शाळांमधील माहिती ही पवित्र पोर्टलकडे देत नाहीत, त्यावर भुसे यांनी नाराजी व्यक्त केली.
एकीकडे आदिवासी पाड्यांवर असलेल्या शाळांतील मुले गुणवत्ता सिद्ध करत असताना अनेक शाळांमध्ये पाचवी-सहावीतील विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. हे प्रश्न कसे सोडवता येतील, यासाठी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन भुसे यांनी संस्थाचालकांना केले. ते म्हणाले, तालुका आणि जिल्हा पातळीवर विषय सुटतील, असा प्रयत्न केला जाईल. संचालक आणि शाळांच्या कामासाठी विभागाकडून जाणीवपूर्वक त्रास होणार नाही. तसेच भौतिक सुविधांची माहिती घेऊन त्याचाही रोड मॅप तयार केला जाईल. राज्यात होणारी शिक्षकांची भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये, ती पद्धतच रद्द करून संस्था स्तरावर त्याचे अधिकार द्यावेत, अथवा वेगळी यंत्रणा राबवावी, अशी मागणी संस्था चालक प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली. त्याशिवाय टप्पा अनुदान, क्रीडा, संगीत शिक्षक भरती आदी अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे. आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडलेली होती. आता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत २१ हजार ६७८ शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच खासगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २१ हजार ६७८ जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या जागा आणि इतर रिक्त जागांसाठी दुसरा टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. त्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षण विभागाकडून ‘पवित्र’ संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याची भरती राबवली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची आकांक्षा असलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षेला प्रतिसाद दिला असून, राज्यभरातून साडेतीन लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्यात पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर टीईटी आयोजित केली जाणार आहे. ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. तर शुल्क भरण्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. एकूण ३ लाख ५५ हजार ९०५ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या टप्प्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकाऱ्यांना आहेत, दिले याविषयीचे पत्र १३ सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या शिक्षक भरती सुरू आहे. मुलाखतीविना भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसेच मुलाखतीसह या पदभरती प्रकारात ३१ ऑगस्टपर्यंत खासगी संस्थांवरील रिक्त जागांसाठी मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे. आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2025 Registration Link
Post For | Pavitra Portal Registration 2025 For Shikshak Bharti Process |
Portal Name | Maha TAIT Pavitra Portal (New Portal) |
Pavitra Portal Registration By | School Education and Sports Department |
Mode | Online Application forms & registration process |
Portal For | Education Staff and Aspirants of Teachers |
Article Category | Pavitra Portal Latest Updates |
Under | Government of Maharashtra |
Now Available | Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise |
Helps | Education Staff Teaching and Non-Teaching |
Pavitra Portal | edustaff.maharashtra.gov.in |
edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2025 Link
Post For | Pavitra Portal Registration 2025 For Shikshak Bharti Process |
Portal Name | Maha TAIT Pavitra Portal (New Portal) |
Pavitra Portal Registration By | School Education and Sports Department |
Mode | Online Application forms & registration process |
Portal For | Education Staff and Aspirants of Teachers |
Article Category | Portal |
Under | Government of Maharashtra |
Now Available | Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise |
Helps | Education Staff Teaching and Non-Teaching |
Pavitra Portal | edustaff.maharashtra.gov.in |
Table of Contents
ok
Teacher vacancy notification
New Upodate