JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘पवित्र’ पोर्टलवरील भरतीत कागदपत्रांचा अडथळा; हजारो उमेदवारांची प्रतीक्षा कायम | Pavitra Portal Shikshak Bharti 2026

Pavitra Portal Shikshak Bharti 2026

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया पुढे सरकत असताना शाळा मिळूनही अनेक उमेदवारांना अद्याप नियुक्तिपत्रांची प्रतीक्षा करावी लागत आहे. समुपदेशनातून शाळा मिळाली, मात्र कागदपत्रांच्या पडताळणीतील अडथळ्यांमुळे नियुक्ती रखडल्याने उमेदवार शिक्षकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. समांतर आरक्षणाच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण न झाल्याने, तसेच अनुसूचित जमातीच्या काही उमेदवारांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने नियुक्तिपत्रे अडकली आहेत. त्यामुळे शाळा निश्चित होऊनही सेवेत रुजू होता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी उमेदवार शिक्षकांनी केली आहे.

राज्यातील हजारो भावी शिक्षकांचे लक्ष लागलेल्या पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांना शाळा मिळाल्या असल्या, तरी कागदपत्रांच्या पडताळणीतील अडथळ्यांमुळे नियुक्तीचा मार्ग अद्याप सुकर झालेला नाही. मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा दोन्ही प्रकारांतून सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती सुरू असून, पहिल्या टप्प्यातील हजारो उमेदवार नियुक्तिपत्रांच्या प्रतीक्षेत आहेत. मुलाखतीशिवाय होणाऱ्या भरतीत १९ हजार ८०० पेक्षा अधिक पदांचा समावेश आहे. त्यापैकी १३ हजारांहून अधिक पदांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अनेक उमेदवारांना शाळांचे वाटपही करण्यात आले आहे. मात्र, समांतर आरक्षणांतर्गत दिव्यांग, अनाथ, खेळाडू आदी प्रवर्गांतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी अद्याप पूर्ण न झाल्याने नियुक्तिपत्रे देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शाळा मिळूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची चिंता वाढली आहे.

शिक्षकांना नियुक्ती कधी?

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नवनियुक्त शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, पवित्र पोर्टलद्वारे शाळा मिळूनही नियुक्तिपत्रे मिळत नसल्याने पात्र उमेदवारांच्या सेवेत रुजू होण्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. एका बाजूला शाळांमध्ये शिक्षकांची गरज असताना दुसरीकडे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने भरती प्रक्रियेतील विलंब दूर करण्याची मागणी जोर धरत आहे. कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे द्यावीत आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी डी.एड.-बी.एड. स्टुडंट असोसिएशन तथा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी केली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Pavitra Portal Shikshak Bharti 2026


पवित्र शिक्षक भरती २०२६ मधील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासनाने निर्धारित केलेल्या पात्रतेच्या निकषांनंतरही अपात्र उमेदवारांची नावे जिल्हा शिफारस पात्रता यादीत समाविष्ट केल्याचा आरोप होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील दोन प्रकरणे समोर आल्यानंतर भरती प्रक्रियेतील त्रुटींचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या प्रकारामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांमधील भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्ट नियम निश्चित केले असतानाही, या नियमांची अंमलबजावणी नेमकी कशी झाली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. उमेदवारांची पात्रता निश्चित करताना संबंधित अटींची पूर्तता आणि कागदपत्रांची वैधता तपासणे आवश्यक आहे. शासनाच्या निकषांनुसार, १४ मे २०२५ नंतरची कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना काही अपात्र अर्ज पात्रता यादीत समाविष्ट होऊन पात्र कसे ठरले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोर्टलच्या माध्यमातून २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेतील कथित त्रुटींमुळे निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

अन्य जिल्ह्यांतही अर्ज पात्र ठरवल्याची शक्यता

पवित्र शिक्षक भरती २०२६ मधील कथित अनियमिततेची व्याप्ती केवळ गोंदिया जिल्ह्यापुरती मर्यादित आहे की अन्य जिल्ह्यांतही असे प्रकार घडले आहेत, याची पडताळणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पवित्र पोर्टलच्या कामकाजाबाबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शिव युनिटी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रा. बालुशा माने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. गोंदियाप्रमाणेच अन्य जिल्ह्यांतही अपात्र उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविले गेले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. सहसंचालक शशिकांत चिमणे यांनी सांगितले की, शिक्षणाधिकाऱ्यांनी पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन ती कळविली असून, संबंधित अपात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026


रत्नागिरी जिल्ह्यातील पवित्र पोर्टलमधून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती अंतिम टप्प्यावर आली आहे. २१० उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण होऊन बारा दिवस पूर्ण झाले. मात्र, अद्याप समुपदेशनाला मुहूर्त मिळाला नाही. या आठवड्यात होईल, पुढील आठवड्यात होईल म्हणून चर्चाच सुरू आहे. समुपदेशन का होत नाही यामुळे उमेदवार, पालक संभ्रमात असून दररोज उमेदवार शिक्षण विभागात येऊन जात आहेत, काहीजण मोबाईलद्वारे संपर्क करीत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने लवकरात लवकर तारीख जाहीर करावी, अशीच मागणी उमेदवार करीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार १७शिक्षकांची पदे रिक्त असून पहिल्या टप्प्यात ४५७ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे.

  • एकूण शिक्षक – २२८
  • मराठीचे उमेदवार-२०२
  • उर्दूचे उमेदवार-८
  • एकूण शिक्षक – २१०
  • गैरहजर-१८
  • पहिल्या टप्प्यात भरले – ४५७

दुसऱ्या टप्प्यात गणित, विज्ञान विषयातील मराठीचे २२० तर उर्दूचे ८ असे एकूण मराठी, उर्दू माध्यमातील २२८ पैकी १८ उमेदवार गैरहजर राहिले तर २१० उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली. पडताळणी होवून बारा दिवस उलटले अद्याप उमेदवारांच्या समुपदेशनाला मुहूर्त मिळाला नाही. पहिल्या टप्प्यातील शिक्षकांच्या समुपदेशनाला विलंब झाला होता. आता दुसऱ्या टप्प्यातील समुपदेशनाला परिस्थिती जैसे थीच आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी २१० उमेदवारांचे समुपदेशन होणार का नाही अशीच विचारणा उमेदवार करीत आहेत. येत्या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात समुपदेशन होईल असे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

 

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीत निवड झाल्यानंतर मुंबईत नोकरीची आशा घेऊन आलेल्या शेकडो शिक्षकांच्या प्रतीक्षेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊनही ६५० पैकी तब्बल ४०० शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले नसल्याने त्यांची नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. विशेष म्हणजे, यापैकी अनेक शिक्षकांनी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये संधी मिळाल्याने आपल्या मूळ जिल्ह्यातील नोकरी सोडली आहे. मात्र, नियुक्ती आदेशच मिळत नसल्याने या शिक्षकांसमोर पुढे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्यात संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे.

पवित्र पोर्टलमार्फत पालिकेच्या शाळांतील मराठी, चित्रकला, संगीत व इंग्रजी विषयांच्या ४०० शिक्षकांची २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान कागदपत्र पडताळणी झाली.एसआयआर कामामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवू शकत नाहीत. या ६०० पेक्षा अधिक शिक्षकांनी तिकडची नोकरी सोडली आहे. इकडे कागदपत्र पडताळणी झाली आहे; मात्र अद्यापही त्यांना नियुक्ती आदेश नसल्यामुळे हे शिक्षक चिंतेत आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गतीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026


पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेत निवड होऊनही नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या उमेदवारांविरोधात आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. नियुक्ती आदेश मिळूनही तब्बल ६४ शिक्षणसेवक रुजू न झाल्याने प्रशासनाने त्यांना थेट नियुक्ती रद्द करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निवड झालेल्या या उमेदवारांनी विहित मुदतीत पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू व्हावे, अन्यथा त्यांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मुकेश कोंडावार यांनी दिले आहेत. त्यामुळे रुजू न झालेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि समुपदेशनानंतर पदस्थापना देण्यात आली; मात्र, त्यानंतरही काही उमेदवार रुजू झाले नसल्याने शिक्षण विभागासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या २०२५ मधील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी ५१० उमेदवारांची निवड यादी प्राप्त झाली होती. त्यानुसार शिफारसपात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि समुपदेशन प्रक्रियेद्वारे त्यांना संबंधित शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली होती.

नियुक्ती आदेश मिळाल्यानंतरही पदस्थापनेच्या ठिकाणी वेळेत रुजू न होणाऱ्या शिक्षणसेवकांमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आता नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. नियमानुसार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत रुजू होणे बंधनकारक असतानाही काही उमेदवारांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. प्रशासकीय तसेच अन्य कारणांमुळे शिक्षणसेवक रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत एकूण ४९२ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून, विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांच्या भूमिकेमुळे भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाहीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026


जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला निवडणुकीच्या आचारसंहितेचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचा थेट परिणाम ‘पवित्र पोर्टल’वरील शिक्षक भरती प्रक्रियेवर झाला असून, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची चिंता वाढली आहे.‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १४२ शिक्षकांच्या नियुक्त्या सध्या रखडल्या आहेत. नियुक्त्या लांबल्याने दुर्गम आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून शिक्षक भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल १ हजार ४६४ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा असून, या शाळांमधील शिक्षकांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये जवळपास ५०० शिक्षक पदांची जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

आता थेट दुसऱ्या सत्रातच मिळणार नवे शिक्षक

निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लागली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेमुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या गडचिरोलीतील १४२ शिक्षकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवाळीच्या सुटीनंतर प्राथमिक शिक्षण विभागाकडून नियुक्ती आदेश काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने, रखडलेल्या १४२ शिक्षकांना दुसऱ्या शैक्षणिक सत्रात नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.तोपर्यंत मात्र शिक्षकांच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळांना उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेच शैक्षणिक कामकाज सुरू ठेवावे लागणार आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झाल्यानंतरही १४२ शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत रुजू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे, शिक्षकांच्या कमतरतेचा थेट परिणाम दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून, अनेक शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षकसंख्येवरच शैक्षणिक कामकाज सुरू आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026


पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेला वेग आला आहे. मुलाखतीशिवायच्या भरती प्रक्रियेत उपलब्ध झालेल्या जागांवर कन्व्हर्जन राउंडच्या माध्यमातून उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत सिंह यांनी भरती प्रक्रियेची सद्यस्थिती स्पष्ट केली.सिंह म्हणाले की, पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीशिवायच्या १२ हजार ४५४ पदांपैकी आत्तापर्यंत १७ हजार ५०२ शिक्षकांची शिफारस झाली आहे. विनामुलाखतीच्या भरतीमध्ये काही अंशकालीन तसेच इतर समांतर आरक्षणाच्या प्रवर्गांमध्ये उमेदवार उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे अशा रिक्त जागांवर त्याच संबंधित प्रवर्गातील सामान्य उमेदवारांची निवड करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानुसार कन्व्हर्जन राउंडमध्ये ४ हजार ३९० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.या वेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पवित्र पोर्टलच्या मुलाखतीशिवायच्या शिक्षक भरती प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असून, विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि विभागांमध्ये शिक्षकांची संख्या आता आणखी वाढणार आहे. नव्या शिफारशींमुळे जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका तसेच आदिवासी विकास विभागातील रिक्त पदांवर मोठ्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध होणार आहेत.मुलाखतीशिवायच्या जाहिरातीतील जिल्हा परिषदांच्या १३ हजार २२५ पदांपैकी यापूर्वी ८ हजार ४८१ उमेदवारांची शिफारस झाली होती. आता आणखी ३ हजार १०५ उमेदवारांची शिफारस झाल्याने एकूण ११ हजार ५८६ शिक्षक रुजू होणार आहेत.नगरपालिकांच्या २८० पदांपैकी यापूर्वी २२६ आणि आता आणखी ५, असे एकूण २३१ शिक्षक मिळणार आहेत. महापालिकांच्या १ हजार ९५४ पदांपैकी १ हजार ३०६ उमेदवारांची यापूर्वी शिफारस झाली होती. आता आणखी ४२७ उमेदवारांची शिफारस झाल्याने एकूण १ हजार ७३३ शिक्षक उपलब्ध होणार आहेत.दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या २ हजार ४२१ पदांपैकी यापूर्वी १ हजार ६०१ आणि आता आणखी ५२७, असे एकूण २ हजार १२८ शिक्षक मिळणार आहेत. शासकीय विद्यानिकेतनची सर्व ५६ पदे भरली असून, खासगी संस्थांनाही एकूण १ हजार ७७५ शिक्षक मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण

मुलाखतीसह पदभरतीसाठी २० गुण टीईटी, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या आधारे स्वयंचलित पद्धतीने निश्चित केले जातील, तर १० गुण व्यवस्थापनाच्या मुलाखतीसाठी असतील. याशिवाय, उमेदवारांना पोर्टलवर आपला प्राधान्यक्रम तसेच त्याच प्रवर्गातील यापूर्वीच्या उमेदवारांची माहिती पाहता येणार आहे. या सुविधेमुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असे सिंह यांनी सांगितले.

पदभरतीसाठी निरीक्षक नेमणार

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या मुलाखतीसह शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या मुलाखतीसह शिक्षक भरती प्रक्रियेवर हे निरीक्षक लक्ष ठेवणार आहेत.ज्या संस्थांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी निरीक्षक प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. भरती प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे की नाही, याची तपासणी निरीक्षकांकडून केली जाणार असल्याची माहिती सिंह यांनी दिली.


पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेला वेग! रुपांतरण फेरीतून ४ हजार ३०९ उमेदवारांची शिफारस; नियुक्तीच्या पुढील टप्प्यांना सुरुवात होणार आहे. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीशिवायच्या पदांवरील रिक्त जागांसाठी राबविण्यात आलेल्या रुपांतरण फेरीत (कन्व्हर्जन राउंड) ४ हजार ३०९ शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. हे उमेदवार संबंधित नियुक्ती प्राधिकारी आणि व्यवस्थापनांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान, तर पदस्थापनेसाठी समुपदेशनाची प्रक्रिया ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान, पुढील आठवडाभरात १० हजार २४८ जागांसाठी मुलाखतीसह शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षक भरतीतील रिक्त जागा भरण्यासाठी शासनाची मंजुरी; रुपांतरण फेरीतून हजारो उमेदवारांना संधी! मुलाखतीशिवायच्या शिक्षक भरती प्रक्रियेत काही अंशकालीन तसेच अन्य समांतर आरक्षण प्रवर्गांतील उमेदवार उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे या प्रवर्गांतील रिक्त जागा भरण्यासाठी त्याच संबंधित प्रवर्गातील सामान्य उमेदवारांचा विचार करण्यास शासनाने मान्यता दिली. या निर्णयानुसार राबविण्यात आलेल्या रुपांतरण फेरीतून (कन्व्हर्जन राउंड) एकूण ४ हजार ३९० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

शिक्षक होणार रुजू

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला वेग; हजारो उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा! मुलाखतीशिवायच्या शिक्षक भरती प्रक्रियेत रुपांतरण फेरीनंतर विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि विभागांमधील शिक्षक भरतीला गती मिळाली आहे. जिल्हा परिषदांच्या १३,२२५ पदांच्या जाहिरातीअंतर्गत यापूर्वी ८,४८१ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. आता आणखी ३,१०५ उमेदवार उपलब्ध झाल्याने एकूण ११,५८६ शिक्षकांना संधी मिळणार आहे.

नगरपालिकांमधील २८० पदांपैकी यापूर्वी २२६ उमेदवारांची शिफारस झाली होती. आता आणखी ५ उमेदवार मिळाल्याने ही संख्या २३१ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, महापालिकांच्या १,९५४ पदांपैकी आधी १,३०६ उमेदवारांची शिफारस झाली होती. रुपांतरण फेरीनंतर आणखी ४२७ उमेदवार उपलब्ध झाल्याने एकूण १,७३३ शिक्षक मिळणार आहेत.

आदिवासी विकास विभागातील २,४२१ पदांपैकी यापूर्वी १,६०१ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. आता आणखी ५२७ उमेदवारांची भर पडल्याने एकूण २,१२८ शिक्षक उपलब्ध होतील. अशा प्रकारे, मुलाखतीशिवायच्या एकूण १९,४५४ पदांपैकी आतापर्यंत १७,५०९ उमेदवारांची शिफारस झाली आहे. दरम्यान, मुलाखतीसह भरावयाच्या १०,३४७ पदांसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

उर्दूसाठी ‘रूपांतरण फेरी’

रोस्टरनुसार उर्दू माध्यमातील अनुसूचित जाती, भटक्या जमाती आदी विविध प्रवर्गामध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने संबंधित पदे रिक्त राहिली आहेत. उर्दू माध्यमातील ५६५ रिक्त जागांसाठी ‘रूपांतरण फेरी’ घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.

मुलाखतीचे १०० गुण

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत मुलाखतीच्या गुणांचे नवे गणित; पात्रता, मुलाखत आणि प्राधान्यक्रमाची माहिती पोर्टलवर! मुलाखतीसह होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांचे मूल्यमापन १०० गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यापैकी २० गुण टीईटी, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या आधारे स्वयंचलित पद्धतीने निश्चित केले जातील, तर १० गुण व्यवस्थापनाच्या मुलाखतीसाठी असतील. याशिवाय, उमेदवारांना पोर्टलवर आपला प्राधान्यक्रम तसेच त्यांच्याच प्रवर्गातील यापूर्वीच्या उमेदवारांची माहितीही पाहता येणार आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड