Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करीता स्टॅम्प तसेच कागदपत्रासहित उपस्थित राहणेसाथीचे प्रसिद्धीपत्रक जाहीर ! – Pavitra Portal Merit List 2024, Document Verification List

Pavitra Portal Merit List 2024, Document Verification List

Pavitra Portal Shikshak Bharti Document Verification 

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत शिक्षण सेवक (मराठी माध्यम) वर्ग १ ते ५ व वर्ग ६ ते ८ (विषय शिक्षक) या पदावर पवित्र पोर्टलद्वारे केलेल्या शिफारशीनुसार शिक्षण सेवक म्हणून खालील प्रशिक्षित उमेदवारांना रुपये १६०००/- मासिक मानधनावर पुढील आदेशा पावेतो त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोबतच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून नामनिर्देशाद्वारे नियुक्ती देण्यात येत आहे.

पवित्र पोर्टलमार्फत विषय शिक्षक (शिक्षण सेवक) समुपदेशनाकरिता दि.२०/०३/२०२४ रोजी स्टॅम्प तसेच कागदपत्रासहित उपस्थित राहणे बाबत(मराठी माध्यम) 

पवित्र पोर्टलमार्फत विषय शिक्षक (शिक्षण सेवक) समुपदेशनाकरिता दि.२०/०३/२०२४ रोजी स्टॅम्प तसेच कागदपत्रासहित उपस्थित राहणे बाबत(उर्दू माध्यम ) 

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
१. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी अथवा अन्य मुद्द्यासंदर्भात तक्रार निवारण व
दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली असून व्यक्तिगत तक्रारीच्या मुद्द्यांचे निराकरण समिती विविध
प्रक्रियेद्वारे करीत आहे याबाबतचे निर्णय संबंधितास कळविण्यात येत आहेत.
२. विहित दिनांकास अर्हता असूनही केवळ अध्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे.
३. मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे उर्दू माध्यमातील रिक्त पदे, तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील ३९ वी ते १२ वीची पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहेत.
४. अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा.

PCMC Document Verification Schedule Shikshak Bharti 2024

TMC Pavitra Portal Document Verification Date

Yavatmal Shikshak Bharti Document Verification

Buldhana Shikshak Bharti Document Verification 

जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी निवडलेल्या ५७९ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी आज सोमवार दि. ४ मार्च ते ९ मार्च २४ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांनाही कळविण्यात आले आहे. यापूर्वीच शिक्षक निवडीची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

या कागदपत्रांची होणार पडताळणी
• सर्व प्रकारची मूळ प्रमाणपत्रे आणि साक्षांकित केलेली एक झेरॉक्स प्रत
• पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीची स्व प्रमाणपत्राची प्रत
• सध्याचे छायाचित्र
• शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र • रहिवासी दाखला
आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, चालक परवाना यापैकी एक स्वतःच्या ओळखीसाठी पुरावा
आवश्यक
• जात पडताळणी दाखला

 

५७९ शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये ६ उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचाही समावेश आहे. यानंतर या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी याचे नियोजन केले असून सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

गुणवत्ता यादीतील पहिल्या १०० उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारी होणार असून मंगळवार ५ मार्च रोजी पुढील १०० म्हणजे २०० पर्यंतच्या उमेदवारांची, ६ मार्च रोजी ३०० पर्यंत, ७ मार्च रोजी ४०० पर्यंत आणि ८ मार्च रोजी ५०० पर्यंतच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. पडताळणीच्या शेवटच्या दिवशी ९ मार्च रोजी ५०० हून अधिक उर्वरित सर्व आणि उर्दू माध्यमातील सहा शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

 


Pavitra Portal Merit List 2024: Pavitra Portal has published a list of candidates who are eligible for Shikshak Sevak Posts in Osmanabad District. Candidates can download Subject wise Pavitra Portal Selection List form below lInk:

पवित्र पोर्टलने उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक सेवक पदांसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार विषयवार पवित्र पोर्टल निवड यादी फॉर्म खालील लिंक डाउनलोड करू शकतात:

पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची उर्दु माध्यमाची यादी पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची उर्दु माध्यमाची यादी 29/02/2024 05/03/2024 पहा (997 KB) 
पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची मराठी माध्यमाची यादी पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची मराठी माध्यमाची यादी 29/02/2024 05/03/2024 पहा (1 MB) 
पवित्र पोर्टल 2022 मधील शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवाराची मूळ कागपत्रे/ प्रमाणपत्रे पडताळणी दिनांक 04/03/2024 -जिल्हा परिषद धाराशीव पवित्र पोर्टल 2022 मधील शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवाराची मूळ कागपत्रे/ प्रमाणपत्रे पडताळणी दिनांक 04/03/2024 -जिल्हा परिषद धाराशीव 29/02/2024 05/03/2024 पहा (980 KB) 

 


Pavitra Portal Merit List 2024, Document Verification List Update 

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. • निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा.

सर्व जिल्ह्यांची मेरिट लिस्ट डाउनलोड लिंक 

 

Pavitra Portal Merit List 2024 uPDATE

 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार ५६६ शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल.

परिषद प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया (Zilla Parishad Primary Teacher Recruitment) अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार ५६६ शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल. पवित्र पोर्टलवर नावे नोंदवलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवडाभरात होईल, अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.

 

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal 2024) अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ती पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत.

शासनाच्या आदेशानुसार, या भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागांपैकी ७० टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये १ हजार ४५१ मराठी माध्यमाची आणि ११५ ऊर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर समुपदेशनाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

 


Pavitra Portal Merit List 2024

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. पवित्र पोर्टलवर अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ती पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत. पवित्र पोर्टलवर नावे नोंदवलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवडाभरात होईल, अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार, या भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागांपैकी ७० टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये १ हजार ४५१ मराठी माध्यमाची आणि ११५ उर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर संबंधित उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर समुपदेशनाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड