पवित्र पोर्टल OTP, PDF, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या, पूर्ण माहिती – Pavitra Portal Login Problems FAQ

राज्यात पवित्र प्रणालीमार्फत सुरू असलेल्या शिक्षणसेवक व शिक्षक भरती २०२५ टप्पा एक प्रक्रियेत प्राधान्यक्रम नोंदणी करताना राज्यभरातील हजारो उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ता. ६ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत संकेतस्थळावर लॉगिन न होणे, ओटीपी उशिरा मिळणे, प्राधान्यक्रम लॉक करण्यात अडथळे येणे, तसेच जाहिरातींच्या पीडीएफ डाउनलोड न होणे अशा समस्यांमुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी मधील गुणांच्या आधारे राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिका पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना ६ ते ११ ऑगस्ट कालावधीत प्राधान्यक्रम नोंदवून लॉक करने बंधनकारक आहे. मात्र, अनेक उमेदवारांना योग्य लॉगिन आयडी, पासवर्ड व कॅप्चा भरूनही पोर्टलवर प्रवेश मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लॉगिन झाल्यानंतर मोवाईलवर OTP तासनतास प्राप्त होत नसल्याने प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. याशिवाय जाहिरातीची PDF उघडण्यास किंवा डाऊनलोड होण्यासही मोठा वेळ लागत असल्याने उमेदवारांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झालो असताना तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी मुदतवाढ देण्याबरोबरच पोर्टलची तांत्रिक क्षमता वाढवून सर्व अडवणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी भावी शिक्षक उमेदवारांकडून होत आहे. या संदर्भातील तक्रारी वर उमेदवारांनी काय करावे हे सुद्धा आपण जाणून घेऊया म्हणजे आपले लॉगिन सहज होईल. तसेच संकेतस्थळावरील लोड लक्षात घेता उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक ११/०८/२०२६ ऐवजी १३/०८/२०२६ अशी वाढविण्यात येत आहे.
उमेदवारांना येणाऱ्या सामान्य अडचणी
- 503 Service Unavailable
- लॉगिन आयडी व पासवर्ड टाकूनही लॉगिन होत नाही
- ओटीपी मिळण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा
- पोर्टल अतिशय संथ गतीने कार्यरत
- जाहिरातींची पीडीएफ डाउनलोड होत नाही
- प्राधान्यक्रम लॉक करण्यात अडथळे
- अनेकदा सर्व्हर डाउन होण्याची समस्या
वरील अडचणींना वर काय उपाय आहे हे जाणून घेऊया.
Pavitra Portal 503 Service Unavailable हि Error Message सर्वाधिक उमेदवारांना त्रास देत आहे. पवित्र पोर्टलचे सर्व्हर जास्त ट्राफिक न सांभाळू शकल्याने हा मेसेज येत आहे. त्या मुळे यजु शासनाने सर्वर त्वरित अपग्रेड करणे आवश्यक आहे.
१. पवित्र पोर्टलवर सध्या स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. आज दिनांक ०८/०८/२०२६ रोजी रात्री ९:०० वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय या प्रकारात ५८२५१ इतक्या उमेदवारांनी तर मुलाखतीसह या प्रकारात ३८५८२ इतक्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.
२. जाहिरातींची संख्या जास्त असल्याने उमेदवाराची पात्रता तपासून प्राधान्यक्रम जनरेट होतात, त्यामुळे एकाच वेळी अनेक उमेदवार लॉगीनवर राहत असल्याने संकेतस्थळावर भार (Load) येत आहे.
३. ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या Browser ची History / Cache clear करावी. त्यानंतरही समस्येचे निवारण न झाल्यास Incognito Window (Private Window) चा वापर करावा. तसेच आता आपल्याला पोर्टल वर Service Unavailable किंवा OTP नसें येत तर आपण रात्री उशिरा प्रयत्न करावा कारण तेव्हा कमी युजर्स ऑनलाईन असतात, तेव्हा आपला सर्ज आरामात सबमिट होऊ शकतो.
४. उमेदवारांचा लॉगीन आयडी (Login ID) हा 25_xxxxxxxxxx (दहाअंकी TAIT 2025 चा रोल नंबर) या प्रमाणे असेल. Password विसरला असल्यास Forgot Password या सुविधेचा वापर करून Password नव्याने तयार करता येईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















