Parbhani Shikshak Bharti 2024 Application Form
Parbhani Shikshak Bharti 2024: मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळातील ४५५ शिक्षकांची पदे भरली जाणार असून त्यासाठी शुक्रवारी (ता. २३) बी.एड्. धारक युवक युवतींना कागदपत्रासह बोलवण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Parbhani Bharti 2024
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत पुढील सहा महिन्यासाठी ही पद भरती केली जाणार आहे. त्यामुळे डीएड व बीएड झालेल्या युवक युवतींना आपल्या गावातील अथवा नजीकच्या शाळेत शिक्षक म्हणून युवा प्रशिक्षण मिळवण्याची संधी मिळणार आहे.
Age Limit For Parbhani Shikshak Bharti 2024
या निवडीसाठी कोणतीही परीक्षा नाही. परंतु, उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षा दरम्यान असावे लागणार आहे. या योजनेअंतर्गत झालेली निवड संबंधित आस्थापना यांच्यामार्फत तात्पुरत्या स्वरुपाची पुढील सहा महिन्यासाठी असेल.
Salary For Parbhani Teacher Recruitment 2024
डोएड धारकांना प्रति महिना आठ हजार रुपये तर बीएड धारकांना प्रति महिना दहा हजार रुपये मानधन दिला जाणार आहे.
निवड झाल्यानंतर दिलेल्या आदेशानुसार संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शैक्षणिक प्रक्रियेत सर्व नियुक्त उमेदवारांचा सहभाग राहणार आहे. उमेदवारांना निवडीच्या वेळी आपली मूळ टी.सी. संबंधित आस्थापनेकडे ६ महिने कालावधीसाठी जमा ठेवावी लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य पद्धतीने निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी ता. २३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता, जिल्हा परिषद सभागृह, दुसरा मजला, जिल्हा परिषद नवीन इमारत, परभणी येथील शिक्षण विभागात आपल्या मूळ व साक्षांकित कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण अधिकारी आशा गरुड यांनी केली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















