Palghar Home Guard Bharti 2024: होमगार्ड खात्यात २०११ च्या कालावधीत भरती झालेली महिला मृत झाल्यानंतर त्या महिलेचा सनद क्रमांक (बॅज) वापरून अन्य महिला गेल्या काही वर्षापासून होमगार्ड पदावर कार्यरत असल्याचा प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे.या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे यांच्याअंतर्गत ऑगस्ट २०११ मध्ये पालघर तालुका होमगार्ड विभागात ५६ महिलांची भरती करण्यात आली होती. या महिलांचे प्राथमिक प्रशिक्षण ३ ते १८ ऑगस्ट २०११ च्या दरम्यान जिल्हा समादेशक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पालघर पथकातील मानसी राऊत यांची जुनी भरती २०११ रोजी झाली असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी तथा ठाणे होमगार्ड प्रशासकीय अधिकारी सुनीता शेलार यांनी माहिती अधिकारात दिली.
पालघर पथकातील २०११ चे समादेशक अधिकारी एकनाथ माळी यांची जुलै २०११ रोजी नाशिक येथे बदली झाली होती. त्यानंतर त्यांचे काम पालघर पथकातील अंशकालीन लिपिक हिरेंद्र ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. माळी यांच्या राजीनाम्यानंतर २० सप्टेंबर २०१२ रोजी दैनंदिन कामकाज हिरेंद्र ठाकूर यांच्याकडून काढून अंशकालीन लिपीक निलेश राऊत यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आले होते.
दरम्यान मानसी राऊत यांची कोणी व कधी भरती केली याची कुठेही नोंद नाही. याबाबत केंद्रनायक अजय गुरव यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मृत महिलेच्या भावाचा आरोप
पालघर होमगार्ड कार्यालयात बोगस भरतीचा प्रकार घडला असून या प्रकरणात ठाणे मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने मृत महिला होमगार्ड नीलम धांगडा यांच्या जागी मानसी राऊत यांना बोगस भरती केले आहे. मानसी राऊत या प्रभारी समादेशक अधिकारी निलेश राऊत यांच्या सख्ख्या वहिनी असून त्यांनी हेतूपुरस्सर बोगस भरती केले असून आम्हा भूमिपुत्रांना होमगार्ड सेवेतून डावलल्याचा आरोप त्यांनी मृत महिलेच्या भावाने केला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















