होमगार्ड खात्यात २०११ च्या कालावधी भरतीबाबत अपडेट – पालघरमध्ये बोगस होमगार्ड भरती । Palghar Home Guard Bharti 2024

Palghar Home Guard Bharti 2024

Palghar Home Guard Bharti 2024: होमगार्ड खात्यात २०११ च्या कालावधीत भरती झालेली महिला मृत झाल्यानंतर त्या महिलेचा सनद क्रमांक (बॅज) वापरून अन्य महिला गेल्या काही वर्षापासून होमगार्ड पदावर कार्यरत असल्याचा प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे.या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे यांच्याअंतर्गत ऑगस्ट २०११ मध्ये पालघर तालुका होमगार्ड विभागात ५६ महिलांची भरती करण्यात आली होती. या महिलांचे प्राथमिक प्रशिक्षण ३ ते १८ ऑगस्ट २०११ च्या दरम्यान जिल्हा समादेशक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पालघर पथकातील मानसी राऊत यांची जुनी भरती २०११ रोजी झाली असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी तथा ठाणे होमगार्ड प्रशासकीय अधिकारी सुनीता शेलार यांनी माहिती अधिकारात दिली.

पालघर पथकातील २०११ चे समादेशक अधिकारी एकनाथ माळी यांची जुलै २०११ रोजी नाशिक येथे बदली झाली होती. त्यानंतर त्यांचे काम पालघर पथकातील अंशकालीन लिपिक हिरेंद्र ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. माळी यांच्या राजीनाम्यानंतर २० सप्टेंबर २०१२ रोजी दैनंदिन कामकाज हिरेंद्र ठाकूर यांच्याकडून काढून अंशकालीन लिपीक निलेश राऊत यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आले होते.
दरम्यान मानसी राऊत यांची कोणी व कधी भरती केली याची कुठेही नोंद नाही. याबाबत केंद्रनायक अजय गुरव यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मृत महिलेच्या भावाचा आरोप
पालघर होमगार्ड कार्यालयात बोगस भरतीचा प्रकार घडला असून या प्रकरणात ठाणे मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने मृत महिला होमगार्ड नीलम धांगडा यांच्या जागी मानसी राऊत यांना बोगस भरती केले आहे. मानसी राऊत या प्रभारी समादेशक अधिकारी निलेश राऊत यांच्या सख्ख्या वहिनी असून त्यांनी हेतूपुरस्सर बोगस भरती केले असून आम्हा भूमिपुत्रांना होमगार्ड सेवेतून डावलल्याचा आरोप त्यांनी मृत महिलेच्या भावाने केला आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड