महत्वाचा अपडेट! यंदा राज्यात ‘बीएड सीईटी’ होणार नाही!! नवीन BEd प्रक्रिया राहणार! – No ‘B.Ed CET’ in the State This Year!!
No 'B.Ed CET' in the State This Year!!
मित्रांनो, जर आपण BED करण्याचा विचार करत असाल तर एक महत्वाची बातमी. प्रताप माहिती नुसतं महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बीए-बीएड आणि बीएस्सी-बीएड या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रिया न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यंदापासून बीएड सीईटीऐवजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा (एनसीईटी) घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. हि प्रक्रिया केंद्रीय असल्याचे समजते.
राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात बीएडसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होणार नाही. परिणामी, यापूर्वी चार वर्षांच्या बीए-बीएड आणि बीएस्सी-बीएड अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आता एनसीईटीसाठी अर्ज करावा लागणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी https://ncet2025.ntaonline.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा लागेल. यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी याआधी बीएड प्रवेश परीक्षेचे शुल्क भरले आहे, त्यांना हे शुल्क परत केले जाणार आहे. शुल्क परताव्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल, असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.