Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NEET SS मॉप-अप फेरीत पुन्हा सहभागी होण्याची याचिका SC ने फेटाळली!!

NEET SS 2022

Neet Super Specialty Mopup Round

NEET SS 2022 : Supreme Court petition filed for re-participation in Neet Super Specialty Mopup Round dismissed. Further details are as follows:-

नीट सुपर स्पेशालिटी २०२१ मधील ९२ सेवा जागांसोबत नवीन जागा जोडण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ मे रोजी सर्व स्ट्रे / रिक्त सुपर स्पेशालिटी जागांसाठी मॉप-अप फेऱ्या आयोजित करण्यास परवानगी दिली होती. मात्र यापूर्वीच्या फेरीत सहभागी झालेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले होते. आम्ही निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.

  • नीट सुपर स्पेशालिटी २०२१ (NEET SS 2021) मधील ९२ सेवा जागा नवीन जागांसोबत जोडण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला.
  • या जागा तामिळनाडू राज्याने सोडल्या होत्या.
  • पहिल्या राऊंडमध्ये उपस्थित असलेल्यांसह सर्व उमेदवारांसाठी या जागा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
  • ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
  • न्यायमूर्ती सीटी रविकुमार आणि सुधांशू धुलिया यांच्या सुट्टीतील खंडपीठाने या प्रकरणावर निर्देश दिले.
  • सर्वोच्च न्यायालयाने ९ मे रोजी सर्व स्ट्रे / रिक्त सुपर स्पेशालिटी जागांसाठी मॉप-अप फेऱ्या आयोजित करण्यास परवानगी दिली होती.
  • मात्र यापूर्वीच्या फेरीत सहभागी झालेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले होते.
  • आम्ही निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
  • जेव्हा एखादी विशिष्ट सूचना असते तेव्हा आपण ते करू शकत नाही.
  • जेव्हा या न्यायालयाने कायदा तयार केला आहे.
  • आता तुम्ही या निर्णयाच्या बाजुने नाही म्हणून कायदा बदलता येणार नाही.

खंडपीठाने पुढे म्हटले की, या न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात जाऊन याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या युक्तिवादांवर आम्ही पुढे जावे असे आम्हाला वाटत नाही. याचिकाकर्त्याला अशी विनंती करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशी रिट याचिका फेटाळली पाहिजे. कविरासन खासदार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठ सुनावणी करत होते. याचिकाकर्त्याने तामिळनाडू राज्याने सोडलेल्या नीट सुपर स्पेशालिटी, २०२१ च्या सेवा जागांमधील ९२ नवीन जागांसह जोडण्याची आणि सर्व उमेदवारांना त्यात सहभागी होण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. राज्याच्या सेवा-कार्य कोट्यातील ९२ अपूर्ण जागा या वर्षी ऑल इंडिया कोटा (All India Quota, AIQ) कडे सुपूर्द केल्या जातील असे ९ मे २०२२ रोजी तामिळनाडूच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.

  • तामिळनाडू एआयक्यूला सरेंडर केलेल्या ९२ सुपर स्पेशालिटी जागांच्या अंतर्गत प्रवेशासाठी एक मॉप अप राउंड आयोजित करेल असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले होते.
  • सर्व स्ट्रे/ रिक्त सुपर स्पेशालिटी जागांसाठी मॉप अप फेरी आयोजित केली जाईल.
  • या अटीच्या अधीन राहून, पहिल्या फेरीत सीटवर उपस्थित असलेल्या कोणत्याही डॉक्टरने मॉप अपमध्ये भाग घेतला असेल तर तो मॉप-अप फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसेल, असेही ते म्हणाले.
  • दरम्यान मॉप राउंड आयोजित केला जात असल्याने प्रवेश पूर्ण करण्यासाठी योग्य मुदतवाढ दिली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

NEET SS 2022 Exam Postponed

NEET SS 2022 : National Eligibility cum Entrance Test Super Specialty Exam 2022 has been postponed. The new revised exam dates will be available soon. Further details are as follows:-

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट सुपर स्पेशालिटी परीक्षा म्हणजेच नीट एसएस २०२२ लांबणीवर टाकण्यात आली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायंसेस (National Board of Examinations in Medical Sciences, NBEMS) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट सुपर स्पेशालिटी (NEET SS 2022) परीक्षा स्थगित केली आहे.
  • नीट एसएस ( NEET SS 2022) १८ आणि १९ जून रोजी आयोजित केली जाणार होती.
  • विविध DM किंवा MCh आणि DNB सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट एसएस परीक्षा ग्राह्य धरली जाते.
  • एनबीई नीट एसएस परीक्षेच्या नव्या तारखा, अर्ज आणि निकालाच्या तारखांची घोषणा लवकरच करणार आहे.
  • एनबीईने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की नीट एसएस २०२२ परीक्षेसाठी इच्छुक सर्व उमेदवारांना सूचित केले जाते की नीट-एसएस २०२२ च्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

एनबीईएमएसने उमेदवारांसाठी कँडिडेट केअर सपोर्ट नंबर ०११-४५५९३००० देखील जारी केला आहे. सोबतच नीट एसएस परीक्षार्थी एनबीईएमएससाठी वेब पोर्टलच्या माध्यमातून माहिती घेऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट – exam.natboard.edu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड