NEET Exam Update
NEET-PG 2026 परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस’ (NBEMS) द्वारे रविवारी देशभरात घेण्यात आलेली ‘NEET-PG 2026’ परीक्षा २.६३ लाखांहून अधिक उमेदवारांसाठी यशस्वीपणे पार पडली. मात्र, राजस्थानमधील जयपूर येथील दोन परीक्षा केंद्रांवर अंतर्गत वीजपुरवठा खंडित झाल्याने २,४४५ उमेदवारांची परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही. या बाधित उमेदवारांना दिलासा देत NBEMS ने ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे.
NEET-PG 2026 परीक्षेदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडाची आता गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राजस्थानमधील जयपूरच्या सीतापुरा येथील ‘आयऑन डिजिटल झोन’मधील केंद्र क्रमांक ४१६८२ आणि ४१६८३ येथे तांत्रिक भागीदार व परीक्षा घेणारी एजन्सी असलेल्या ‘टीसीएस लिमिटेड’च्या अंतर्गत वीजपुरवठ्यातील त्रुटीमुळे परीक्षा प्रभावित झाली. या प्रकाराची गंभीर दखल घेत एनबीईएमएसने संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, बाधित उमेदवारांसाठी फेरपरीक्षेचे केंद्र आणि नवीन प्रवेशपत्रे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.
परीक्षेसाठीचे नियोजन
- परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी ७०० हून अधिक भरारी पथक तैनात करण्यात आले
- देशभरात १६ प्रादेशिक कमांड सेंटर्स कार्यान्वित करण्यात आले
- नवी दिल्लीतील द्वारका येथील मुख्यालयातील कमांड सेंटरवरून थेट सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात आले
- डमी उमेदवार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET-UG परीक्षा भविष्यात पेन-अँड-पेपर पद्धतीऐवजी संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. याबाबत केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. NEET-UG परीक्षा JEE Main प्रमाणे ऑनलाइन म्हणजेच Computer Based Test (CBT) पद्धतीने घेता येईल का, याचा सध्या विचार सुरू आहे. मात्र, या बदलाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय कार्यगटाच्या शिफारशींच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
या प्रकरणावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सर्व याचिकाकर्त्यांना आपले उत्तर आणि सूचना दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’च्या वतीने वकील तन्वी दुबे यांनी परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतल्यास तो शक्य तितक्या लवकर जाहीर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कारण सध्या विद्यार्थी जुन्या पेन-अँड-पेपर पद्धतीनुसार परीक्षेची तयारी करत आहेत.
NEET-UG साठी CBT पद्धतीचा विचार का?
NEET-UG परीक्षेतील पेपरफुटी, गैरप्रकार आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी रोखण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्याची गरज व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले की, परीक्षेच्या आयोजनात सर्वसमावेशक सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. भविष्यात परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरही भर दिला जात आहे. मात्र, NEET-UG परीक्षा ऑनलाइन घेण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. उच्चस्तरीय कार्यगटाच्या शिफारशी आल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट
NEET परीक्षेच्या भविष्यातील स्वरूपाबाबत शिफारशी करण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट कार्यरत आहे. या कार्यगटामध्ये तंत्रज्ञान, अंतराळ, गुप्तचर आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेतील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी दूर करून अधिक सुरक्षित परीक्षा व्यवस्था उभारण्याबाबत या समितीकडून शिफारशी अपेक्षित आहेत.
पेपरफुटीनंतर परीक्षा व्यवस्थेत बदल
NEET-UG परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांनंतर परीक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यानंतर परीक्षेची सुरक्षा वाढवणे, प्रश्नपत्रिका वितरणाची प्रक्रिया अधिक सुरक्षित करणे आणि गैरप्रकारांना आळा घालणे यावर सरकारने भर दिला आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदीही अधिक कडक केल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाचा तपास सध्या CBIकडून करण्यात येत आहे. तसेच याचिकाकर्त्यांकडून NTAच्या पुनर्रचनेची आणि भविष्यातील परीक्षा अधिक सुरक्षित पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे काय?
NEET-UG परीक्षा CBT पद्धतीने घेण्याचा विचार सुरू असला तरी सध्या हा अंतिम निर्णय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत निर्णय येईपर्यंत विद्यमान परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास सुरू ठेवणे योग्य ठरेल. परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास त्याची अधिकृत माहिती केंद्र सरकार किंवा संबंधित परीक्षा प्राधिकरणाकडून जाहीर केली जाईल.
महत्त्वाचे मुद्दे
| मुद्दा | माहिती |
|---|---|
| परीक्षा | NEET-UG |
| सध्याची पद्धत | पेन-अँड-पेपर (ऑफलाइन) |
| विचाराधीन पद्धत | संगणक आधारित परीक्षा (CBT) |
| आधार | JEE Main प्रमाणे ऑनलाइन परीक्षा |
| उच्चस्तरीय कार्यगटाचे अध्यक्ष | नंदन निलेकणी |
| पुढील सुनावणी | 19 ऑगस्ट |
| अंतिम निर्णय | उच्चस्तरीय कार्यगटाच्या शिफारशींनंतर |
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-यूजी परीक्षा पुढील वर्षापासून म्हणजेच २०२७ पासून पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणकाधारित चाचणी (सीबीटी) स्वरूपात घेण्यासाठी आपण सज्ज असल्याचे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) ने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. केंद्र सरकारशी सल्लामसलत करून हा बदल अमलात आणला जाईल, असेही स्पष्ट केले.
नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ३ मे रोजी झालेली परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एनटीएने न्यायालयात ही माहिती दिली. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा, न्या. आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनटीएने म्हटले आहे की, उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने (एचएलसीइ) नीट-यूजी परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याची शिफारस केली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, एनटीएच्या प्रमुख परीक्षांपैकी केवळ नीट-यूजी २०२६ ही परीक्षा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) धोरणानुसार पेन-पेपर पद्धतीने घेण्यात आली होती. एनटीएच्या इतर सर्व महत्त्वाच्या परीक्षा आधीच सीबीटी पद्धतीने घेतल्या जात आहेत. उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने नीट यूजी परीक्षा सीबीटी पद्धतीत रूपांतरित करण्याची शिफारस केली असून, संकल्पनाही सुचविली आहे.
या आहेत भविष्यातील उपाययोजना
प्रश्नपत्रिका तयार करणारे, परीक्षक, अनुवादक, प्रूफरीडर आदी संवेदनशील जबाबदाऱ्यांमध्ये निवड पद्धती आणि फेरबदल धोरण अधिक प्रभावीपणे लागू केले जाईल. तसेच, किमान ८५ टक्के भाषांतर प्रक्रियेसाठी एआय आधारित साधनांचा वापर होईल.
‘सीट मॅट्रिक्स विस्कळीत होणार नाही’
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील जागांचे वाटप (सीट मॅट्रिक्स) विस्कळीत होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन वेळेत पार पाडण्याचे निर्देश समितीने अधिकाऱ्यांना दिले असे सूत्रांनी सांगितले
पेपर फुटू नये यासाठी उपाययोजना
नवी दिल्ली: नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांनी संसदीय समितीला तपासातील प्रगतीची माहिती दिली. तसेच २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठीच्या उपाययोजनांची माहितीही मांडली.
NEET Exam Update
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या शुल्क परताव्यासाठी उमेदवारांनी बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत २२ जूनपर्यंत वाढवली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि ती पुन्हा घेतली जाणार आहे. आतापर्यंत सुमारे १३ लाख उमेदवारांनी बँक खात्याचे तपशील अद्ययावत केले आहेत.
एनटीएने स्पष्ट केले होते की, नव्याने होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















