JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत “विधी सल्लागार व विषय तज्ञ” पदाकरिता भरती; अर्ज सुरु!! | Nashik Kumbha Pradhikarn Bharti 2026

Nashik Kumbha Pradhikarn Bharti 2026

Nashik Kumbha Pradhikarn Bharti 2026: Nashik Kumbha Pradhikarn, has published the notification for the Post of “Legal advisor and subject matter expert”. There is various vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 15th of April 2026. For more details about Nashik Kumbha Pradhikarn Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत “विधी सल्लागार व विषय तज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविधी सल्लागार व विषय तज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण कार्यालय, जुनी जिल्हा परिषद इमारत नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

Salary Details For Nashik Kumbha Pradhikarn Bharti Recruitment 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी सल्लागार व विषय तज्ञदरमहा रु.50,000/- (रु. 45,000/- मानधन + रु.5,000/- दूरध्वनी / प्रवास खर्च इतके मानधन देण्यात येईल.

How To Apply For Nashik Kumbha Pradhikarn Bharti Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2026 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For Nashik Kumbha Pradhikarn Job 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/AzBsI

 


Nashik Kumbha Bharti

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराच्या सर्वांगीण विकासाची मोठी संधी ठरणार आहे. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वच नव्हे, तर स्थानिकांसाठी रोजगाराचे नवे दरवाजे उघडणार आहेत. प्रशासनाच्या अंदाजानुसार, कुंभमेळा कालावधीत १५ हजारांहून अधिक स्थानिकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या रोजगार निर्मितीच्या उपक्रमांतर्गत स्थानिक नागरिकांना कौशल्य विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून ते मेळ्याच्या विविध सेवा, सुविधा आणि व्यवस्थापनात प्रभावीपणे सहभाग घेऊ शकतील.

नाशिकमध्ये होणारा हा सिंहस्थ कुंभमेळा ऑक्टोबर २०२६ ते जुलै २०२८ या २१ महिन्यांच्या कालावधीत पार पडणार असून, सुमारे पाच लाख साधू-महंत आणि दहा कोटींहून अधिक भाविक या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या भव्य आयोजनासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू असून, पायाभूत सुविधा, वाहतूक, निवास, स्वच्छता आणि सुरक्षा यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे.

नाशिक टुरिझम स्कील हबच्या माध्यमातून युवकांना गाइड, हॉटेल मॅनेजमेंट, भाषा, ड्रायव्हिंग आणि डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला बचत गटांसाठी फूड स्टॉल आणि क्राफ्ट मार्केट उभारण्याची योजना आहे. या माध्यमातून पंधरा हजारांहून अधिक स्थानिकांना थेट रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून हा कुंभमेळा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यंदाचा कुंभमेळा केवळ देवदर्शन नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचे शक्तिशाली इंजिन ठरणार आहे. एका पर्यटकाच्या भेटीतून शहरातील ४५ पेक्षा अधिक घटक जसे की ऑटोचालक, हॉटेल, रेस्टॉरंट, गाइड, फुलवाले, हस्तकला विक्रेते, फोटोग्राफर आणि टॅक्सी सेवा थेट लाभ होतात. म्हणूनच यंदाच्या सिंहस्थात नाशिकला येणारे भाविक, पर्यटक केवळ ‘येऊन जाऊ नये’ तर इथे थांबावा, सुखद अनुभव घ्यावा आणि त्यास पुन्हा यावेसे वाटावे, यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने ठोस उपक्रम हाती घेतले आहेत.

 

 

 


Nashik Kumbha Pradhikana Bharti – The government has approved the proposal to create 76 posts of officers and employees for the independent authority established for the Simhastha Kumbh Mela under Nashik Kumbha Pradhikana Bharti. Out of these, 52 regular and 24 posts will be filled through external mechanisms. Apart from this, there will also be an independent Kumbh Mela cell at the ministry level. This will now give a real boost to Simhastha work. Simhastha Kumbh Mela is being held in Nashik and Trimbakeshwar in 2026-27. For this, the government has enacted a law and established an independent Kumbh Mela Authority. Divisional Commissioner Dr. Praveen Gedam has been appointed as the chairman of this authority and Shekhar Singh has been appointed as the Kumbh Mela Commissioner. Simhastha work was started through officers from the municipal corporation and related government departments. But since the authority does not have a separate officer and employee class for its work, as per the provisions of the Authority Act, Chairman Dr. Gedam had submitted the proposal for creation of posts for the government’s approval. The government has approved the creation of 52 regular posts under the Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority, Nashik, and the creation of 76 posts through 24 external human resource services by the end of the period of organization and implementation of the Simhastha Kumbh Mela. So it will will good option as Nashik Kumbha Mela Jobs.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र प्राधिकरणासाठी शासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ७६ पदनिर्मितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामध्ये ५२ नियमित व २४ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. याशिवाय मंत्रालय स्तरावर देखील स्वतंत्र कुंभमेळा कक्ष असणार आहे. यामुळे सिंहस्थ कामांना आता खऱ्या अर्थान वंध सिंहस्थाचे चालना मिळणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येत्या २०२६-२७मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यासाठी शासनाने कायदा करत स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची तर कुंभमेळा आयुक्तपदी शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका तसेच संबंधित शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सिंहस्थ कामांना सुरुवात केली गेली. परंतु प्राधिकरणाकडे कामकाजासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी वर्ग नसल्यामुळे प्राधिकरण कायद्यातील तरतुदींनुसार अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन तसेच अंमलबजावणीचा कालावधी संपेपर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण नाशिक अंतर्गत ५२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच २४ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे अशाप्रकारे ७६ पदांच्या निर्मितीला शासनाने मंजुरी दिली आहे.

nashik kumbh mela jobs

ही पदे प्रतिनियुक्ती, निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून किंव इतर मार्गान आणि कंत्राटी पदे थेट जाहिरातीद्वारे किंवा मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमार्फत नियुक्त केली जाणार आहेत. नियमित पदांच्या भरतीसाठी प्राधिकरणामार्फत शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थासाठी मंत्रालयातही स्वतंत्र कुंभमेळा कक्ष स्थापन केला जाणार आहे. या कक्षासाठी अवर सचिव – १, कक्ष अधिकारी – १, सहायक कक्ष अधिकारी – २, लिपिक टंकलेखक- २ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे सिंहस्थकामांना आता वेग येणार आहे.

नियमित पदे अशी
१. कुंभमेळा आयुक्त कक्ष
कुंभमेळा आयुक्त (भाप्रसे)-१, लघुलेखक (उच्चश्रेणी) / (निम्नश्रेणी) / लघुटंकलेखक- १, लिपिक/वरिष्ठ लिपिक किंवा इतर विभागातील समकक्ष – ४.
२. सर्वसाधारण संनियंत्रण व धार्मिक बाबी
भाप्रसे किंवर अप्पर जिल्हाधिकारी किंवा सह आयुक्त, नगरविकास २, मुख्याधिकारी (गट-अ) (निवडश्रेणी) / मुख्याधिकारी (गट-अ) / उपजिल्हाधिकारी किंवा इतर विभागातील समकक्ष- ३, मुख्याधिकारी (गट-अ)/ तहसीलदार किंवा मुख्याधिकारी (गट-ब) / नायब तहसीलदार किंवा समकक्ष – ४, मुख्याधिकारी (गट-ब) / प्रशासन अधिकारी / कार्यालयीन अधीक्षक-१, लघुलेखक (उच्चश्रेणी) / लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक-३, सहा. महसूल अधिकारी/महसुल सहायक किंवा लिपिक-४.
३. गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यस्था
भापोसे किंवा अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त १, पोलिस निरीक्षक, सपोनि – २, वरिष्ठ लिपीक, लिपिक- २.
४. निधीचे सुयोग्य नियोजन व खर्च
उपायुक्त (नियोजन) किंवा जिल्हा नियोजन अधिकारी १, मुख्य लेखा व वित्त अधिकारी- १, वरिष्ठ लेखाधिकी – १, उपलेखापाल २, वरिष्ठ लिपिक, लिपिक- ३.
५. गुणवत्ता नियंत्रण
अधीक्षक अभियंता / कार्यकारी अभियंता १, कार्यकारी अभियंता / उपअभियंता – २, उपअभियंता / शाखा अभियंता २, संशोधन अधिकारी १, लिपिक / वरिष्ठ लिपिक- ३.
६. सोशल मीडिया व पीआर टीम
जिल्हा माहिती अधिकारी किंवा माहिती अधिकारी- १

बाह्ययंत्रणेमार्फत पदभरती
सोशल मीडीया व पीआर टीम-८, सल्लागार व विषय तज्ज्ञ८, शिपाई- ८, भाडे तत्त्वावर वाहनचालकासह वाहन उपलब्धता आवश्यकतेनुसार

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड