फायरमन भरतीला हिरवा कंदील; स्थायी समितीची 45 प्रशिक्षणार्थींना नियुक्त करण्यास मान्यता- Nashik Fire Brigade Bharti 2023
Nashik Fire Brigade Bharti 2023
Nashik Fire Brigade Bharti 2023
Nashik Fire Brigade Bharti 2023: 28 firefighters who have completed training in the fire brigade that is available for firefighting from the incident of fire that has caused a loss of 22 million people have been appointed by the permanent committee on Friday (24th) to save them. Until regular vacancies are filled, these trainees will have the opportunity to serve in the municipality. The expansion of Nashik city is increasing significantly. Permission has been granted to build buildings up to 90 meters high. However, even if this is the case, the condition of the fire brigade is only severe. 299 firefighters have been approved in the Nashik Municipal Fire Department.
बावीस लाख लोकसंख्येला आग लागण्याच्या घटनेपासून वाचविण्यासाठी अवघे २८ फायरमन उपलब्ध असलेल्या अग्निशमन दलात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थींना नियुक्त करण्यास स्थायी समितीने शुक्रवारी (ता. २४) मान्यता दिली आहे. नियमित रिक्त पदांची भरती होईपर्यंत या प्रशिक्षणार्थींना महापालिकेत सेवा करण्याची संधी मिळणार आहे. नाशिक शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जवळपास ९० मीटर उंचीपर्यंत इमारती बांधण्यास परवानगी दिली आहे. परंतु असे असले तरी अग्निशमन दलाची अवस्था मात्र बिकट आहे. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागात २९९ फायरमनची पदे मंजूर आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मात्र आतापर्यंत रिक्त पदे भरण्यास परवानगी नव्हती, त्यामुळे निवृत्त व अन्य कारणामुळे सद्यःस्थितीमध्ये २८ फायरमन उपलब्ध आहे. राज्य शासनाने कोविडकाळात वैद्यकीय व अग्निशमन दलाची तातडीची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे, त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमार्फत पदे भरली जाणार आहे.
मात्र या प्रक्रियेला कालावधी लागणार असल्याने अग्निशमन विभागाने राज्य शासनाच्या अग्निशमन सेवा संचालकांशी पत्रव्यवहार करून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सहा महिन्यांचा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींची भरती करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार ९० प्रशिक्षणार्थी फायरमन नियुक्त करण्याचे मान्य करण्यात आले. मात्र आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात ४५ प्रशिक्षणार्थी फायरमन उपलब्ध झाले आहे. त्यांना मानधनावर भरती करून घेण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली. सहा महिन्यांसाठी नियुक्ती राहणार असून, प्रशिक्षणार्थी फायरमंडला मासिक आठ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
नाशिक महापालिकेची फायरमन संवर्गातील भरती प्रक्रिया सध्या रखडली आहे. त्यामुळं नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक अग्निशामक दलामध्ये सध्या केवळ 90 अग्निशामक कर्मचारी कार्यरत आहेत. शहरात इमारतींची संख्या उंची वाढत असल्यानं त्यानुसार अग्निशमन जवानांची गरज भासणार आहे. मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहराचा विस्तार झपाट्यानं होत आहे. सध्या नाशिकची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास आहे. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम महापालिका करते. मात्र शहरातील अग्निशमन विभागाकडं केवळ 118 कर्मचारी आहेत. त्यामुळं नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मोठी आग लागल्यास कर्मचार्यांवर १२ तास किंवा त्याहून अधिक तास काम करण्याचा ताण येतो. अग्निशमन विभागात आणखी 299 पदे भरणे आवश्यक असताना ही भरती लालफितीत अडकली आहे.
अग्निशमन जवानाची गरज : नाशिक शहरात शिंगाडा तलाव, म्हसरूळ, नाशिकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी अशी सहा अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या 60 फायरमन, 30 लँडिंग फायरमनसह 28 ड्रायव्हर कार्यरत आहेत. त्यांच्यावर संपूर्ण नाशिक शहराची सुरक्षा अवलंबून आहे. नाशिक महापालिकेच्या पहिल्या आराखड्यात फायरमन संवर्गातील 299 पदे मंजूर झाली आहेत. सेवानिवृत्ती तसंच स्वेच्छानिवृत्तीमुळे चालक सोडून केवळ 90 अग्निशमन कर्मचारी कार्यरत आहेत. 272 पदे रिक्त असून चालक, वायरलेस ऑपरेटर, ड्युटी फायर ऑफिसर, सब ऑफिसर, स्टेशन ऑफिसर आदी पदंही रिक्त आहेत. शहरात 12 मजल्यांपेक्षा उंच इमारती बांधण्यात येत असून त्यानुसार अग्निशमन दलाची अधिक गरज भासणार आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कर्मचाऱ्यांच्या समस्या : गेल्या 10 वर्षात नाशिकची लोकसंख्या वाढली. मात्र पण शासनानं अग्निशमन दलात कोणतीही भरती केली नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. सध्या 90 कर्मचारी, वाहन चालक 30 अशी कर्मचारी संख्या आहे. अशात पुढील वर्षी 20 ते 22 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळं अजून कर्मचाऱ्यांचा ताण वाढणार आहे. 12 तासाहून अधिक काम करूनही अधिक मोबदला दिला जात नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.
लवकरच रिक्त पदे भरणार : अग्निशामक विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच महानगरपालिका जाहिरात काढणार आहे. अधिकारी, कर्मचारी संख्या पुरेशी झाल्यानंतरच सर्वांचाच कामाचा ताण हलका होईल, असं मुख्य अग्निशमक अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितलं.
अग्निशमन वाहने देखील भंगारात : नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडं सद्यस्थितीत एकूण 33 वाहनं असून त्यात नऊ वाहनं स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. कारण त्या वाहनांना घेऊन पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. तसंच उंच इमारतीमध्ये आग लागली, तर करायचं काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. अग्निशामन दलाकडं 22 मीटर उंचीची शिडी आहे. त्याद्वारे 90 मीटर उंचीपर्यंत आग विझवली जाऊ शकते. म्हणजे साधारण नऊ ते दहा मजल्याच्या इमारतीवर आग लागल्यास ती विझवणे शक्य आहे. मात्र, यापेक्षाही जास्त मजल्याच्या इमारती नाशिक शहरात राहत आहेत. त्यामुळं भविष्यात यापेक्षाही जास्त उंचीच्या शिडीची गरज भासणार आहे.
शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या वर पोचत असताना अवघे २८ फायरमन कार्यरत असून, २७१ फायरमनचे पदे रिक्त आहे. रिक्त पदांची भरती होत नाही. त्यामुळे ४५ प्रशिक्षणार्थी फायरमन भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महासभेवर तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहराचा विस्तार व विस्ताराबरोबरच लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रातदेखील वाढत होत आहे. त्याअनुषंगाने अग्निशमन दलाचे काम वाढले आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलास आजमितीस अंदाजे २५ लाख लोकसंख्या असलेल्या नागरिकांना आग, अपघातप्रसंगी व बचाव कार्य करण्यासाठी त्वरित घटनास्थळी कमी वेळेत पोचणे बंधनकारक आहे. तातडीने मदतकार्य करावे लागते. दिवाळीमध्ये फटाके स्टॉल्स, नवरात्रामध्ये सप्तशृंगी गड, कालिका देवी मंदिर, प्रदर्शन, व्हीआयपी दौरे, गणपती विसर्जन याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन विभागाकडील बंब व स्टाफ स्टॅन्डबाय ठेवावा लागतो. अग्निशमन दलाकडे आजमितीस मनुष्यबळाचा खुपच तुटवडा आहे.
१९९४ नंतर या विभागाकडे मोठी भरती झाली नाही. त्यातच बरेचसे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून १२-१२ तास ड्यूटी करून घ्यावी लागते. अनेक कर्मचाऱ्यांचे वय आजमितीस ५० ते ५५ वर्षाच्या पुढे आहे व काही जण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने कामकाजामध्ये फार मोठया अडचणी निर्माण होतात.
अग्निशमन विभागामध्ये फायरमनची एकूण २९९ मंजूर पदे असून, त्यापैकी फक्त २८ फायरमन कार्यरत आहेत. २७१ फायरमनची पदे रिक्त असल्याने तसेच अग्निशमन सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांना सेवा देणे गरजेचे आहे. त्यामुळे ९० प्रशिक्षणार्थी फायरमन मानधनावर भरती करण्यात आयोगाने मान्यता दिली आहे.
Nashik Fire Brigade Bharti 2023: The fire department, which is considered essential services in the municipal corporation, has a large number of retiring employees. A total of 90 firemen, including 45 trainee students who have completed the fireman course from the state fire training centre and 45 trainee students who have completed the fireman course of the All India Local Government Administration, will be recruited on stipend to fill the shortage of vacant seats.
महापालिकेत अत्यावश्यक सेवेत गणल्या जाणाऱ्या अग्निशमन विभागात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रिक्त जागांची कमतरता भरण्यासाठी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी असे एकूण नव्वद फायरमनची भरती विद्यावेतनावर केली जाणार आहे.
नाशिक महापालिकेच्या पहिल्या आकृतिबंधात फायरमन संवर्गात २९९ पदे मंजूर करण्यात आली आहे. निवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे सद्यःस्थितीत अवघे २८ फायरमन कार्यरत आहे. फायरमनची २७१ पदे रिक्त आहेत. महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. शहराचा विस्तारदेखील वाढला आहे. इमारतींची संख्या व उंचीदेखील वाढत असल्याने त्याअनुषंगाने फायरमनची अधिक गरज भासणार आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने अग्निशमन विभागाच्या सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
सुदैवाने अद्यापपर्यंत दुर्दैवी घटना घडलेली नाही. मात्र, भविष्यात अशी घटना घडल्यास अग्निशमन विभागाच्या रिक्त पदांचे पितळ बाहेर पडू शकते. कोविडकाळात राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय व अग्निशमन या दोन विभागातील पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या.
‘मनपाचा गोदाकिनारी स्वच्छोत्सव’! ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या अनुषंगाने गोदाघाटावर विशेष स्वच्छता मोहीम. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेने ‘टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस’ मार्फत पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. सदर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या प्रक्रियेला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या दरम्यान फायरमनची गरज भागविण्यासाठी अग्निशमन विभागामध्ये ९० प्रशिक्षणार्थी फायरमन नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेले ४५ प्रशिक्षणार्थी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून फायरमन अभ्यास पूर्ण केलेले ४५ प्रशिक्षणार्थी असे एकूण ९० फायरमनची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. त्यांना आठ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
If we consider the fire department, this department has become the most miserable in the view of Nashik Municipal Corporation under Nashik Fire Brigade Bharti 2023. In the first development plan of the Municipal Corporation, 161 posts in various cadres were sanctioned. Due to retirement and other reasons, 118 fire departments including 90 firemen and leading firemen, 27 drivers and one officer are currently handling the fire safety of the city. As an essential service, the state government has approved filling up of posts in medical and fire department. Accordingly 348 new posts have been sanctioned. These posts will be filled through Tata Consultancy Services Bharti process 2023 in Nashik City. Further details are as follows:-
महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागातील जवळपास ७०४ पदे भरण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला असला तरी अद्यापही त्या जागा भरल्या जात नाही. परिणामी दोन्ही महत्त्वाच्या व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यात अग्निशमन विभागाचा विचार केल्यास वीस लाख लोकसंख्येची अग्नीसुरक्षा अवघ्या ११८ अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या हाती असल्याचे भयावह वास्तव आहे. शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सेवा- सुविधा भक्कम करणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सेवांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. या सेवांचे सक्षमीकरण मनुष्यबळाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. अग्निशमन विभागाचा विचार केल्यास नाशिक महापालिकेच्या दृष्टीने सर्वाधिक दयनीय अवस्था या विभागाची झाली आहे. महापालिकेच्या पहिल्या विकास आराखड्यामध्ये १६१ विविध संवर्गातील पदे मंजूर होती. सेवानिवृत्ती व अन्य कारणामुळे सध्या ९० फायरमन व लीडिंग फायरमन तसेच २७ ड्रायव्हर व एक अधिकारी असे ११८ लोक अग्निशमन विभागांसह शहराच्या अग्नी सुरक्षेचा भार सांभाळत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून राज्य शासनाने वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नवीन ३४८ पदे मंजूर करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस माध्यमातून ही पदे भरली जातील.
नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
जुलै महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होईल. त्याअनुषंगाने अग्निशमन विभागाच्या पदांचा आढावा घेतला असता एक लाख लोकसंख्येमागे सहा अग्निशमन कर्मचारी असल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाऱ्यांसंदर्भातील सदर परिस्थिती गंभीर असून तातडीने पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
ही महत्त्वाची पदे आहेत रिक्त
फायरमॅन, लीडिंग फायरमन, चालक किंवा यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर, सब ऑफिसर्स, स्टेशन ऑफिसर, फायर ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर. अग्निशमन विभागात आकृतिबंधातील १६१ पदे व नव्याने मंजूर करण्यात आलेली ३४८ असे एकूण ५०९ पदांचा आकृतिबंध निर्माण झाला आहे.
सद्यःस्थितीत जवळपास ३९१ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने लवकर रिक्त पदांची भरती झाल्यास अग्निशमन यंत्रणा कोलमडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
“अग्निशमन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार टीसीएस कंपनीच्या माध्यमातून रिक्त पदे भरली जातील. मात्र जोपर्यंत पदे भरली जात नाही तोपर्यंत परिस्थिती चिंताजनक आहे.”
राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर एक कंपनी महापालिकेकडून अंतिम केली जाणार आहे.
Fire and Health Department Vacancy in Nashik
fire and safety jobs in nashik, agnishamak bharti document, Nashik Fire Bharti 2023 Update are as given below :
महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे.
असा आहे मंजुरीचा प्रवास
शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत होती. परंतु, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली. दुसरीकडे सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.
परंतु, टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्विसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला गेला. यानंतर महापालिकेने या दोन्ही कंपन्यांना मंगळवारी (दि. २९ नोव्हेंबर) पत्र पाठवून त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भातील पदनिहाय सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिल्याने या भरती प्रक्रियेला चालना मिळाली.
राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेकडून टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर प्रस्ताव मागवण्यात आले असून, त्यानंतर एक कंपनीची भरतीसाठी निश्चिती केली जाईल.
– मनोज घोडे पाटील, उपायुक्त प्रशासन
महापालिकेत पदांची आकडेवारी…
- ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदे : ७,०८२
- सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्तपदे : २,६०० च्या वर
- सद्य:स्थितीत कार्यरत अधिकारी, कर्मचारी : ४,५००
Previous Update –
Nashik Fire Brigade Bharti 2023 – 208 Posts
Nashik Fire Brigade Bharti 2022 : Good news for job seekers!! The government has approved the Recruitment of 208 Firemen in the Fire Department. There are a total of 208 Fireman posts that will be filled soon in the Fire Department. The total of 299 Fireman posts sanctioned in Fire Department. Further details are as follows:-
महापालिकेच्या रखडलेल्या नोकरभरतीस शिंदे-फडणवीस सरकारने हिरवा कंदील दाखविला असून, पहिल्या टप्प्यात अतितातडीचे म्हणून अग्निशमन विभागातील २०८ फायरमनच्या भरतीचा शासनाने मार्ग मोकळा केला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या पदासाठी आवश्यक असलेल्या सेवा प्रवेश नियमावली तसेच आरक्षण बिंदू नामावलीस नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून, ही भरती थर्ड पार्टीमार्फत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार भरतीकरता मनपाने टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या संस्थांना पत्र पाठवून भरती करण्याबाबत विचारणा केल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेतील बहुप्रतिक्षित नोकरभरतीचा बिगूल वाजला आहे.
- नाशिक शहराचा विस्तार वाढत असल्याने तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अग्निशमन दल सुसज्ज करण्यासाठी नोकरभरती करणे आवश्यक आहे.
- महापालिकेत गेल्याने पंधरा ते वीस वर्षांपासून कुठल्याही प्रकारची सरळ सेवेने कायमस्वरूपी नोकरभरती झालेली नाही.
- महापालिकेत ‘क’ वर्ग संवगार्तील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्तपदांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे.
- सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे.
- शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे.
- कोरोनाकाळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन या महत्वाच्या विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती.
- परंतु, मनपाची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने भरतीप्रक्रिया रखडली होती.
- अखेरीस नगरविकास विभागाने पहिल्या टप्प्यात अग्निशमन विभागातील फायरमनच्या रिक्त २०८ पदांच्या भरतीला हिरवा कंदील दर्शवल्याने या पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली आहे.
- अग्निशमन विभागात फायरमनची २९९ पदे मंजूर आहेत.
- त्यापैकी सध्या ९१ पदे कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात या विभागातील २०८ पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली आणि आरक्षण बिंदू नामावलीला मंजूरी दिल्याने महापालिकेने भरती प्रक्रियेला सुरूवात केली आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील २०८ पदांच्या भरतीला परवानगी दिली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सेवा प्रवेश नियमावलीही मंजूर केल्याने २०८ पदांच्या भरतीसाठी टीसीएस, एमकेसीएल,आयबीपीएस या संस्थांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर योग्य त्या संस्थेबरोबर कार्यवाही केली जाईल.
– डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा
मनपातील अग्निशमन दलातील 209 पदांची भरती पुन्हा लांबणीवर!! जाणून घ्या Nashik Fire Brigade Bharti 2022
There are a total of 209 posts vacant in the Nashik Municipal Corporation Fire Brigade Department. The recruitment will be soon. For more details about NMC Fire Department Bharti 2022, NMC Fire Department Recruitment 2022, Fire Department Nashik Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन या पदासह विविध संवर्गांतील पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार भरतीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू असतानाच, मनपा आयुक्त रमेश पवार यांची दांडी उडाल्याने या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत गरजेची असून, याबाबत नूतन आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.
Nashik Fire Brigade Vacancy 2023
- राज्य शासनाने फायरमन, लीडिंग फायरमन, सबऑफिसर, चालक यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर या पदांसाठी सध्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त आणखी जागा नव्याने मंजूर केल्या आहेत.
- या मंजूर पदांपैकी फायरमन या पदाकरिताच सेवा प्रवेश नियमावली मंजूर असल्याने या पदांसाठी भरती करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली.
- फायरमन या संवर्गाच्या सध्या आस्थापनेवर 151 जागा असून, नव्याने 148 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.
- परंतु, सध्या केवळ 90 फायरमन असून, 209 जागा रिक्त आहेत. यासंदर्भातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.
- त्यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्यासमोर प्रस्ताव सादर करण्यात आला.
- भरती प्रक्रिया पारदर्शक होण्याकरिता एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- त्यानुसार प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच, राज्य शासनाकडून रमेश पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आणि भरती प्रक्रियेचा प्रस्तावही अधुराच राहिला.
- आता नवनियुक्त आयुक्त याबाबत काय आणि कशी भूमिका घेतात, यावरच फायरमन पदाच्या भरतीची दिशा ठरणार आहे.
Nashik Fire Brigade Driver Recruitment 2023
इतर विभागांचेच वाहनचालक
- राज्य शासनाने अग्निशमन विभागासाठी नव्याने 98 चालक यंत्रचालकाची पदे मंजूर केली आहेत.
- परंतु, भरतीच नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील इतर विभागांतील वाहनचालकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
- त्यामुळे कायमस्वरूपी वाहनचालक नसल्याने अग्निशमन विभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- तसेच वायरलेस ऑपरेटरची सहा पदेही शासनाने मंजूर केलेली आहेत.
NMC Fire Officer Bharti 2022
मनपाला फायर ऑफिसरच नाही
- फायरमन व्यतिरिक्त अग्निशमन विभागात लीडिंग फायरमनच्या 98 पैकी 14 जागाच भरलेल्या आहेत.
- सबऑफिसरचे 18 पैकी केवळ एक पद कार्यरत असून, स्टेशन ऑफिसरच्या सहापैकी एकाच पदावर समाधान मानावे लागत आहे.
- फायर ऑफिसरच्या दोन आणि डेप्युटी फायर ऑफिसरची एक जागा मंजूर असली, तरी या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर आजमितीस एकाही अधिकार्याची नेमणूक नाही.
Table of Contents
Nashik Fire Brigade Bharti 2023 नवीन अपडेट, अर्ज करा
new Update