नवीन अपडेट – महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील 706 पदांच्या भरतीला हिरवा कंदील!! Nashik Fire Brigade Bharti 2023
Nashik Fire Brigade Bharti 2023
Nashik Fire Brigade Bharti 2023
Nashik Fire Brigade Bharti 2023: Fire And Health Department Vacancies In Municipal Corporation. Recruitment will be soon. After the state government has given the green light for recruitment through two companies ‘TCS’ and ‘IBPPS’, the administration has asked for proposals regarding recruitment from these two companies. In this regard, a letter has been sent to both the companies by the department from the general administration. After receiving proposals from these companies, one company will be finalized by the Municipal Corporation. Further details are as follows:-
राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर एक कंपनी महापालिकेकडून अंतिम केली जाणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Fire and Health Department Vacancy
fire and safety jobs in nashik, agnishamak bharti document, Nashik Fire Bharti 2023 Update are as given below :
महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे.
असा आहे मंजुरीचा प्रवास
शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत होती. परंतु, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली. दुसरीकडे सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.
परंतु, टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्विसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला गेला. यानंतर महापालिकेने या दोन्ही कंपन्यांना मंगळवारी (दि. २९ नोव्हेंबर) पत्र पाठवून त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भातील पदनिहाय सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिल्याने या भरती प्रक्रियेला चालना मिळाली.
राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेकडून टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर प्रस्ताव मागवण्यात आले असून, त्यानंतर एक कंपनीची भरतीसाठी निश्चिती केली जाईल.
– मनोज घोडे पाटील, उपायुक्त प्रशासन
महापालिकेत पदांची आकडेवारी…
- ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदे : ७,०८२
- सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्तपदे : २,६०० च्या वर
- सद्य:स्थितीत कार्यरत अधिकारी, कर्मचारी : ४,५००
Previous Update –
Nashik Fire Brigade Bharti 2023 – 208 Posts
Nashik Fire Brigade Bharti 2022 : Good news for job seekers!! The government has approved the Recruitment of 208 Firemen in the Fire Department. There are a total of 208 Fireman posts that will be filled soon in the Fire Department. The total of 299 Fireman posts sanctioned in Fire Department. Further details are as follows:-
महापालिकेच्या रखडलेल्या नोकरभरतीस शिंदे-फडणवीस सरकारने हिरवा कंदील दाखविला असून, पहिल्या टप्प्यात अतितातडीचे म्हणून अग्निशमन विभागातील २०८ फायरमनच्या भरतीचा शासनाने मार्ग मोकळा केला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या पदासाठी आवश्यक असलेल्या सेवा प्रवेश नियमावली तसेच आरक्षण बिंदू नामावलीस नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून, ही भरती थर्ड पार्टीमार्फत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार भरतीकरता मनपाने टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या संस्थांना पत्र पाठवून भरती करण्याबाबत विचारणा केल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेतील बहुप्रतिक्षित नोकरभरतीचा बिगूल वाजला आहे.
- नाशिक शहराचा विस्तार वाढत असल्याने तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अग्निशमन दल सुसज्ज करण्यासाठी नोकरभरती करणे आवश्यक आहे.
- महापालिकेत गेल्याने पंधरा ते वीस वर्षांपासून कुठल्याही प्रकारची सरळ सेवेने कायमस्वरूपी नोकरभरती झालेली नाही.
- महापालिकेत ‘क’ वर्ग संवगार्तील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्तपदांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे.
- सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे.
- शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे.
- कोरोनाकाळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन या महत्वाच्या विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती.
- परंतु, मनपाची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने भरतीप्रक्रिया रखडली होती.
- अखेरीस नगरविकास विभागाने पहिल्या टप्प्यात अग्निशमन विभागातील फायरमनच्या रिक्त २०८ पदांच्या भरतीला हिरवा कंदील दर्शवल्याने या पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली आहे.
- अग्निशमन विभागात फायरमनची २९९ पदे मंजूर आहेत.
- त्यापैकी सध्या ९१ पदे कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात या विभागातील २०८ पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली आणि आरक्षण बिंदू नामावलीला मंजूरी दिल्याने महापालिकेने भरती प्रक्रियेला सुरूवात केली आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील २०८ पदांच्या भरतीला परवानगी दिली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सेवा प्रवेश नियमावलीही मंजूर केल्याने २०८ पदांच्या भरतीसाठी टीसीएस, एमकेसीएल,आयबीपीएस या संस्थांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर योग्य त्या संस्थेबरोबर कार्यवाही केली जाईल.
– डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा
मनपातील अग्निशमन दलातील 209 पदांची भरती पुन्हा लांबणीवर!! जाणून घ्या Nashik Fire Brigade Bharti 2022
Nashik Fire Brigade Bharti 2023: There are a total of 209 posts vacant in the Nashik Municipal Corporation Fire Brigade Department. The recruitment will be soon. For more details about NMC Fire Department Bharti 2022, NMC Fire Department Recruitment 2022, Fire Department Nashik Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन या पदासह विविध संवर्गांतील पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार भरतीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू असतानाच, मनपा आयुक्त रमेश पवार यांची दांडी उडाल्याने या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत गरजेची असून, याबाबत नूतन आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
Nashik Fire Brigade Vacancy 2023
- राज्य शासनाने फायरमन, लीडिंग फायरमन, सबऑफिसर, चालक यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर या पदांसाठी सध्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त आणखी जागा नव्याने मंजूर केल्या आहेत.
- या मंजूर पदांपैकी फायरमन या पदाकरिताच सेवा प्रवेश नियमावली मंजूर असल्याने या पदांसाठी भरती करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली.
- फायरमन या संवर्गाच्या सध्या आस्थापनेवर 151 जागा असून, नव्याने 148 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.
- परंतु, सध्या केवळ 90 फायरमन असून, 209 जागा रिक्त आहेत. यासंदर्भातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.
- त्यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्यासमोर प्रस्ताव सादर करण्यात आला.
- भरती प्रक्रिया पारदर्शक होण्याकरिता एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- त्यानुसार प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच, राज्य शासनाकडून रमेश पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आणि भरती प्रक्रियेचा प्रस्तावही अधुराच राहिला.
- आता नवनियुक्त आयुक्त याबाबत काय आणि कशी भूमिका घेतात, यावरच फायरमन पदाच्या भरतीची दिशा ठरणार आहे.
Nashik Fire Brigade Driver Recruitment 2023
इतर विभागांचेच वाहनचालक
- राज्य शासनाने अग्निशमन विभागासाठी नव्याने 98 चालक यंत्रचालकाची पदे मंजूर केली आहेत.
- परंतु, भरतीच नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील इतर विभागांतील वाहनचालकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
- त्यामुळे कायमस्वरूपी वाहनचालक नसल्याने अग्निशमन विभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- तसेच वायरलेस ऑपरेटरची सहा पदेही शासनाने मंजूर केलेली आहेत.
NMC Fire Officer Bharti 2022
मनपाला फायर ऑफिसरच नाही
- फायरमन व्यतिरिक्त अग्निशमन विभागात लीडिंग फायरमनच्या 98 पैकी 14 जागाच भरलेल्या आहेत.
- सबऑफिसरचे 18 पैकी केवळ एक पद कार्यरत असून, स्टेशन ऑफिसरच्या सहापैकी एकाच पदावर समाधान मानावे लागत आहे.
- फायर ऑफिसरच्या दोन आणि डेप्युटी फायर ऑफिसरची एक जागा मंजूर असली, तरी या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर आजमितीस एकाही अधिकार्याची नेमणूक नाही.
new Update