Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नागपूर युनिव्हर्सिटी हिवाळी २०१९ परीक्षा पुढे ढकलल्या..

Nagpur University Winter 2019 Exam Postpone

Nagpur University Winter 2019 Exam Postpone – New Timetable Winter 2019

Nagpur University Winter 2019 Examinations papers on 21st October & 22 October 2019 are postponed due to the Elections. The New Timetable of RTMNU Winter 2019 will be available Soon here. For More updates keep visiting us at www.MahaBharti.in.

विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले असून नवीन वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात आले आहे.
विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान केंद्र म्हणून साधारणत: निवडणूक आयोगाकडून शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्यात येतात. केवळ मतदानाचा दिवसच नाही तर त्याअगोदरचे २ दिवस व नंतरचा १ दिवसदेखील तेथे निवडणुकांचे काम सुरू असते. यात मतदानाची तयारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेची आखणी तसेच मतदानानंतरचे सोपस्कार यांचा समावेश असतो. दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना ३ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. १०० हून अधिक विषयांच्या परीक्षा नेमक्या २१ ऑक्टोबर रोजीच रोजीच आल्या आहेत. अद्याप निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्र नेमकी कुठली राहतील याची कुठलीही यादी आलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा विद्यापीठाने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सद्यस्थितीत २१ व २२ आॅक्टोबरचे सुमारे १५० पेपर ‘पोस्टपोन’ करण्यात आले आहेत.

RTMNU New Timetable 2019

नवीन वेळापत्रक लवकरच
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणुकांच्या वेळी परीक्षा केंद्रांवरील मतदान लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा जरी मतदानाच्या कालावधीत येत असल्या तरी निवडणुका होणेदेखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल. २० ऑक्टोबरला रविवारची सुटी आहे. यानंतर २१ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. २२ तारखेलादेखील मतदान केंद्रांवर प्रशासकीय प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे दोन्ही दिवशीचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Pooja meshram says

    Microbiology B. SC IV seem paper 1. Date plz

  2. Anklet gaydhane says

    Time table b.com 2 year

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड