PSI Physical 2020 : पोलीस उपनिरीक्षक प्रवेशपत्र जाहीर | MPSC PSI Admit Card
MPSC PSI Physical Exam Admit Card
MPSC PSI Admit Card
MPSC PSI Admit Card – Maharashtra Secondary Services, Non-Gazetted Group – B (Main) Exam 2020 Hall Ticket for Candidates appearing to Physical Test Conducted for the Cadre of Police Sub-Inspector has come to the profile. The hall tickets are available in the spam folder of the e-mail ID. Candidates can download PSI Physical Test Admit Card and can read important instructions given for MPSC PSI Physical Exam 2022 :
महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा 2020 या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गासाठी होणाऱ्या शारीरिक – चाचणीसाठी हॉलतिकीट उमेदवार च्या प्रोफाइल ला आलेले आहेत. e-mail ID च्या spam folder मध्ये हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC PSI Exam Time Table 2023
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शारीरिक चाचणीचे ठिकाण | शारीरिक चाचणी क्रमांक | दिनांक | वेळ |
Maharashtra Police Academy, Trambak Road, Nashik | 1434 | 13/02/2023 | 06:30 AM |
Important Instruction For PSI Physical Test 2023
1. उपरोक्त परीक्षेसाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणांस असे कळविण्याचा आदेश आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा 2020 या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गासाठी होणाऱ्या फक्त शारीरिक – चाचणीसाठी आपण स्वखर्चाने खाली नमूद केलेल्या ठिकाणी विहित दिनांकास व वेळेवर (सकाळी 6.30 वा.) हजर रहावे.
2. शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. 1434 13/02/2023 | 06:30 AM
3. विहीत केलेल्या ठिकाणी विहीत दिनांक व वेळेस (सकाळी 6.30 वा. ) हजर न झाल्यास आपली शारीरिक चाचणी घेण्याचे नाकारले जाईल. शारीरिक चाचणीसाठी निश्चित केलेल्या दिनांक व वेळेत बदल करण्याबाबतची विनंती अपरिहार्य असाधारण कारणाव्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही.
4. वैद्यकीय कारणास्तव शारीरिक चाचणीची तारीख बदलून देण्याची विनंती करणाऱ्या उमेदवारांनी गंभीर आजार, गंभीर दुखापत इत्यादी प्रकारचे अपवाद वगळता शारीरिक चाचणीच्या दिवशी शारीरिक चाचणीच्या मैदानावर वैद्यकीय प्रमाणपत्रासह वेळेवर (सकाळी 6.30 वा.) उपस्थित राहणे आवश्यक राहील. शारीरिक चाचणीच्या दिवशी उमेदवार उपस्थित राहिला नाही, तर त्याला पुन्हा शारीरिक चाचणीची संधी देण्यात येणार नाही.
5. गंभीर आजार किंवा दुखापत अशा पुरेशा व वाजवी वैद्यकीय कारणास्तव शारीरिक चाचणीची तारीख बदलून देण्याची विनंती करणाऱ्या उमेदवारांची तपासणी मैदानावर उपस्थित असलेल्या शासनाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. अशा उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी मैदानात हजर राहताना अस्वास्थ (Unfit) असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच त्यासंदर्भात वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेल्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट, निदान अहवालासह (उदा. एक्स-रे, एम. आर. आय., सिटी स्कॅन, रक्त चाचण्या, पॅथॉलॉजी रिपोर्ट इ.) सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याबाबत शारीरिक चाचणी मैदानावर वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील.
6. अपवादात्मक प्रकरणी उमेदवारांची शारीरिक चाचणी व मुलाखतीचा दिनांक वैद्यकीय कारणास्तव बदलून देण्याची विनंती
Scanned with OKEN Sca
आयोगाने मान्य केली आहे, अशा उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या सुधारित दिनांकास व ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक राहील, तद्नंतर वैद्यकीय कारणास्तव कोणतीही संधी देय राहणार नाही.
7. उमेदवारांनी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्रातील वैद्यकीय कारण खोटे असल्याचे आढळून आल्यास सदर उमेदवारावर आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा व निवडीसाठी आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधित (Debar) करण्याची कारवाई करण्यात येईल.
8. सोबतच्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट- ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण (50 गुण) आवश्यक आहेत. तेवढे गुण प्राप्त न केल्यास मुलाखत घेण्यास ‘अपात्र ठरविण्यात येईल.
9. शारीरिक चाचणीसाठी उपस्थित असलेल्या सर्व पुरुष उमेदवारांची प्रथम उंची व छाती यांची मापे व महिलांसाठी उंचीची मापे घेतली जातील. सदर मोजमापन चाचणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील शारीरिक चाचणीस प्रवेश दिला जाईल.
10. उंची छाती मापनाविषयी तक्रार असल्यास संबंधित उमेदवाराने त्याच दिवशी व त्याच ठिकाणी आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे आपला विनंती अर्ज करावा. याबाबत योग्य विचार करुन अशा उमेदवारांच्या उंची छातीचे फेरमापन त्याच केंद्रावर विहित दिवशी घेण्यात येईल. त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी त्याच ठिकाणी घेण्यात येईल.
11. शारीरिक चाचणीसाठी येतांना शक्यतो हाफ पॅन्ट व हाफ शर्ट परिधान करावा आणि उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पी कॅप घालावी असा त्यांना सल्ला देण्यात येत आहे. कॅनव्हास शूज घालून येणेही त्यांचे हिताचे होईल. तथापि, धावण्याच्या चाचणीसाठी Spike Shoes चा वापर कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही याची कृपया जाणीवपूर्वक नोंद घ्यावी.
12. शारीरिक चाचणीसाठी येताना उमेदवारांनी स्वत:ची ओळख (Identification) पटवून देण्याकरिता स्वत:चे आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसेंन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ) यापैकी “किमान एक ” ओळखपत्र मूळ प्रतीत व त्याच्या दोन स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
13. मोबाईल फोन, डिजीटल डायरी, मायक्रोफोन इत्यादी दूरसंचार साधने शारीरिक चाचणीच्या दिवशी शारीरिक चाचणीच्या परिसरात आणण्यास व स्वत: जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे.
14. “आयोगाचे अध्यक्ष, सदस्य किंवा अधिकारी यांच्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दडपण आणण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास अशा उमेदवाराला आयोगाच्या निवडीपासून अपात्र ठरविण्यात येईल” या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामधील सूचना क्रमांक 9.1 (19) मधील तरतूदीकडे आपले लक्ष विशेषत्वाने वेधण्यात येत आहे
. 15. शारीरिक चाचणीच्या सरावासाठी राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. तसेच पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल. यासाठी पोलीस मुख्यालयातील संबंधित पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधावा.
16. शारीरिक चाचणीस येताना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आल्याचे प्रस्तुत पत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
17. मुलाखत स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे. यास्तव, शारीरिक चाचणीतून मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
18. कोरोना विषाणूच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचना / आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
19. शारीरिक चाचणीच्या वेळी गैरप्रकाराचा प्रयत्न करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल आणि / किंवा इतर योग्य अशा शिक्षेला पात्र ठरेल या बाबीची विशेषत्वाने नोंद घ्यावी.
Instruction For PSI Appearing Candidates – Read Before Going For PSI Exam 2022